Posted by: vmbhonde | मार्च 26, 2013

मराठी कविता

 ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक –कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला.

Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना ‘virus’ लागलाय
दु:खं send करता येत नाही

जुने पावसाळे उडून गेलेत
delete 
झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range 
नसलेया mobile सारखे

hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website

एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच ‘cute’
contact list 
वाढत गेली
संवाद झाले mute

computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन ‘mother’ नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय

floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet 
वर धागा नाही

विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook…………….

 

 

ashok.khandekar@gmail.com>    12-3-2013


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: