Posted by: vmbhonde | मार्च 26, 2013

काही मजेशीर व्याख्या

काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या.
बघा आवड्तायेत का?

अनुभव – सभ्य शब्दात मांडलेल्या चुका

मोह – जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

शेजारी – तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो

सुखवस्तू – वस्तुस्थितीत सुख मानणारा

वक्तृत्व – मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे

लेखक – चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा

फ्याशन – शिंप्याच्या हातून झालेल्या चुका

पासबुक/ब्यांक्बुक – जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर
ब्यालेंस असेल तर)

ग्यालरी- मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा

लेखणी – एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन

छत्री – एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ

कॉलेज – शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन

परीक्षा – ज्ञान तपासून घेण्याचे एक ‘हातयंत्र’

परीक्षा – पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ

विश्वशांती – दोन महायुद्धांच्या मधला काळ

दाढी – ‘कुरुपपणा’ लपवण्याचे’ रुबाबदार’ साधन

थाप – आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात

काटकसर – कंजूषपणाचे एक ‘गोंडस’ नाव

नृत्य – पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला

घोरणे – नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री
घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी

मन – साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू

विवाहित माणूस – जन्मठेपेचा कैदी

विधुर – जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी

श्रीमंत नवरा – चालतं बोलतं atm कार्ड

श्रीमंत बायको – अचानक लागलेली लॉटरी

IT वाला – सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम

IT वाली – श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री

बुद्धिवादी – ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा

स्कार्फ – बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड
लपवायचे मुलींचे एक साधन

चुंबन – रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर

लग्नाचा हॉल – दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना

 

Kiran Pandit <10.kiran@gmail.com>      17-11-2012


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: