Posted by: vmbhonde | मार्च 26, 2013

धपाटे खा !

Inline image 1

 
खारीच्या पाठीवर रामाच्या हाताची बोटं असतात तर धपाट्यांच्या पाठीवर ते करणा-या गृहिणीच्या हाताची बोटं उमटलेली असतात. त्याशिवाय धपाट्याची भट्टी काही जमत नाहीत. धपाटा तयार होतानाच अशी खारीसारखा आपल्या कर्त्यांची शाबासकी घेऊन येतो. त्यामुळे तो खाणा-यालाही दाद द्यावीच लागते. पण हीच गृहिणी वैतागते तेव्हा आपल्या मुलांच्या पाठीतही ‘धपाटे’ घालते. ते मात्र रुचकर आणि खमंग नसतात, तर कडूझार असतात. पण पाककौशल्यात निपुण असणा-या गृहिणीला असे धपाटे घालायची वेळ कधी कधी यावी आणि रुचकर-खमंग धपाटे करायची वेळ मात्र सदासर्वदा यावी यासाठी काहीतरी करायला हवं, नाही का?
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही घरोघरी ज्वारीबाजरीडाळीचं पीठ समप्रमाणात घेऊन धपाटे केले जातातप्रवासाला निघतेवेळी ग्रामीण भागात शिदोरी म्हणून धपाटेच बांधून दिले जातातकोकण वगळता महाराष्ट्राच्या सर्वच भागात न्याहारीला धपाटे करायची पद्धत आहे.
धपाटे हा तसा खरं तर थालीपीठाशी नातं सांगणारा पदार्थधपाटे आणि थालीपीठातला फरक म्हणजे धपाटे पातळ असतात तर थालीपीठ जाड असतं.
मराठवाडय़ात धपाटा तयार करताना बाजरीगहू आणि हरभरा वापरला जातोया भागात बाजरी अधिक प्रमाणात पिकत असल्यानं कदाचित तिचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असावापश्चिम महाराष्ट्रात गहूज्वारीबाजरीहरभ-याची डाळ आणि उडदाचा वापर धपाटे बनवताना केला जातोतर खान्देशात बाजरीगहू आणि चणाडाळ वापरली जाते.
पण इतर प्रांतांपेक्षा खानदेशातील धपाटय़ांनी ख-या अर्थानं लोकाश्रय मिळवला आहेइथल्या हॉटेल व्यावसायिकांनी घरोघरी बनवल्या जाणा-या धपाट्यांना मार्केटमध्ये आणलं आहेखानदेशातील जवळजवळ सगळीकडे ही धपाटा संस्कृती’ पाहायला मिळते.खानदेशात मेथी मोठय़ा प्रमाणावर पिकवली जातेत्याचा धपाट्यात मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातोत्यामुळे इथं हिरव्यागार मेथीचे धपाटे बनवले जातातत्यासोबत जाडसर दहीशेंगदाण्याचं कुटकच्च्या हिरव्या मिरच्या असतील तर मग काही विचारायलाच नकोधपाट्याची मजा चाखायची असेल तर खानदेशातील गावरान वातावरणात जायला हवंपुरचुंडीत गुंडाळलेले धपाटे शेताच्या बांधावर बसून खाण्यात वेगळीच मजा असते.
सोलापुरातलं बार्शी हे गावही धपाटय़ासाठी प्रसिद्ध आहेबार्शीतल्या खाद्यसंस्कृतीवर मराठवाडाकर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्र या ती प्रांतांचे संस्कार आहेतबार्शी कर्नाटकच्या सीमेच्या जवळ असल्यानं धपाटय़ात चिंचगुळाचा वापर आणि कोल्हापूरचा झणझणीतपणा आढळतोलालभडक चटणीत्यांच्या जोडीला सायीचं दही असा फक्कड बेत बार्शीत पाहायला मिळतोबार्शीमध्ये भुक्र्याबरोबर धपाटे खाल्ले जातातबार्शीप्रमाणेच बीडही धपाटय़ासाठी प्रसिद्ध आहे.
मराठवाडाखानदेशविदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र अशा संपूर्ण महाराष्ट्रात आवडीनं खाल्ला जाणारा हा पदार्थ कोकणात मात्र आढळत नाहीत्याचं काय कारण असावं ते ठाऊक नाही.
धपाट्यात वेगवेगळ्या प्रकारची धान्यं असतातत्यामुळे तो पौष्टीक आहेधपाटय़ाचं पीठ मळताना त्यात ठेचाहळदमीठ टाकलं कीचवदार धपाटे तयार करता येतातएकदोन धपाटे खाल्ले कीचांगला नाश्ता होतोपंजाबमध्ये पराठा खाल्ल्यानंतर लस्सी पितात तशी धपाटा खाल्ल्यानंतर ताक पिण्याची पद्धत आहेउन्हाळ्याच्या दिवसात हा धपाट्याचा नाश्ता मस्त असतोकाही भागात भाजणीचेही धपाटे बनवले जातात.
कोल्हापूरच्या धपाटय़ांना वेगळा स्वाद असतोअसं कोल्हापूरकर म्हणतातकोल्हापुरी धपाटे तयार करण्यासाठी तांदूळगहूज्वारी,हरभरा डाळधणे आणि जिरे हे छान भाजून त्याचं बारीक पीठ केलं जातंत्यात हिरवा मसालाकोथिंबीरलसूणहिरव्या मिरच्या वाटून टाकल्या जातातपीठ मळताना त्यात थोडी हळदचवीपुरतं मीठ टाकून पातळ सलसर मळलं जातंनंतर हातानं थापटून धपाटे बनवले जातातभाजताना मारलेल्या पाण्याच्या हबक्यानं धपाटा खुसखुशीत तर होतोचपण तव्याकडच्या बाजूला कुरकुरीतही बनतोया धपाटय़ाबरोबर काळ्या वाटाण्याची उसळही करतात.
काही ठिकाणी दह्यातील धपाटेही तयार केले जातातहे धपाटे तयार करताना ज्वारीचं पीठबेसनमुगाचं पीठकणीकजीरे पूड,ओवा पूडतीळसुकी कोिथबीरलाल तिखटवाळलेली पुदीन्याची पानं याचा वापर केला जातोतर धपाटय़ाचं पीठदही आणि दूधात मळलं जातंते खूपच खमंग लागतात.
धपाटे बनवताना उरलेल्या भाज्यांचाही वापर केला जातोआदल्या दिवशी उरलेल्या कोणत्याही भाजीत विविध धान्यांचं वा डाळींचं पीठ एकत्र करून धपाटे थापले जातातहुरडय़ाच्या दिवसात खास हिरवा हुरडा वाटून त्याचेही हिरवेगार धपाटे थापले जातातकाही ठिकाणी काकडी किंवा डांगराचे धपाटे करतात.
धपाटे करण्याची पद्धत सर्वत्र सारखीच आहेगहूज्वारीबाजरी आणि हरभ-याचं पीठ समप्रमाणात घ्यावंत्यात धणेजि-याची जाडसर पावडरमीठहिरवी मिरची चिरून किंवा ठेचा तसंच आलंलसूण ठेचून टाकावाहे मिश्रण पाणी टाकून सलसर मळावं.चांगलं मळल्यावर पोळपाटावर ओलं फडकं ठेवून त्याच्यावर हात ओला करून धपाटे थापावेतथापून झाल्यावर त्याला पाचसहा छिद्रं पाडावीतनंतर तव्यावर थोडं तेल सोडून फडक्यासह धपाटा तव्यावर टाकावातो टाकल्यावर फडकं वरून अलगद काढून घ्यावं आणि धपाटा ताटलीनं झाकून ठेवावाखालची बाजू चांगली भाजली कीतो उलटावा आणि दुसया बाजूनं भाजायचाधपाटय़ाला भोक पाडल्यानं भोकांच्या कडा चांगल्या भाजल्या जातात आणि धपाटाही मस्त खरपूस होतोधपाटय़ात काही ठिकाणी आडवा चौकोनी कांदा टाकला जातोधपाटा थापताना त्यावर हाताची चार बोटं उमटलीच पाहिजेतनाहीतर धपाटा चांगला जमला नाहीअसं समजलं जातं.
धपाटे हा वीक पॉइंट असणारे अनेक खवय्ये आढळतीलजाडसर दही नाही तर लोणीशेंगदाण्याची चटणी आणि हिरव्यागार ताज्या मिरच्या यांच्याबरोबर गरमागरम धपाटे खाण्याचा अनुभव शब्दात व्यक्त करता येण्यासारखा नाहीतो प्रत्यक्षातच घ्यायला हवा.

 

suhas patil <surapasaa@gmail.com       7-8-2012

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: