Posted by: vmbhonde | मार्च 26, 2013

आंतरराष्ट्रीय महिलादिन

जगातील समस्त ज्ञात अज्ञात महिलांना “आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या” हार्दिक हार्दिक शुभेच्छा

उद्या दिनांक ८ मार्च २०१३ रोजी महिलादिन आहे. त्या निमित्ताने महिलांच्या समस्यांवर काही विचारवंत उहापोह करतील, समाजात स्त्रीचे स्थान, “स्त्री”भ्रूण हत्या (या वाक्प्रचाराला माझा विरोध आहे,भ्रूण हत्या एवढेच म्हणावे) वगैरे विषय लिहिले जातील. याशिवाय  वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रगण्य स्थानी असलेल्या, आपल्या बुद्धी चातुर्याने अथवा आपल्या हिमतीवर समाजात विशेष ठसा उमटविणाऱ्या महिलांचे कौतुक केले जाणारे लेखही लिहिले जातील. ते लेख वाचून समजतील सुजाण “वाचक”वर्ग आपापल्यापरीने त्यातील अर्थ काढेल. या सगळ्यानंतर मुख्य मुद्धा उरतोच जागतिक महिलादिन साजरा करायची वेळ का यावी? J

चराचर सृष्टीमध्ये बहुपेशीय (युकरिओट्स) सजीव हे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग या २ गटात विभागले आहेत. यामध्ये मनुष्य प्राण्यामध्ये नपुसकलिंगी नावाच्या एका नव्या गटाचा उत्कर्ष झाला. निसर्गाच्या नियमानुसार सर्व सजीवांमध्ये विभिन्न लिंगा बद्धल आकर्षण हे साहजिक मानले जाते. परंतु यातही मानवाने समलिंगी आकर्षण असणार्यांचा एक स्वतंत्र वर्ग स्थापन केला आहे. अजून एका गोष्टीचा अभ्यास केला असता असे लक्षात येते कि, मनुष्य प्राणी सोडून इतर सर्व सजीवांमध्ये स्त्रीला नैसर्गिक रित्या / सहजतेने सन्मानाने वागविले जाते. या सजीवांचे संपूर्ण जीवन हे “स्त्री”च्या भोवती फिरते. उदाहरणादाखल गांधीलमाशी आणि मुंगी यांमध्ये “राणी” माशी / मुंगीला अतिशय महत्वाचे स्थान असते. उलट ती जगावी यासाठी इतर पुरुष जात जन्मभर अविरत कष्ट करीत असते. याशिवाय सिंह, हत्ती, वाघ या प्राण्यांमध्येहि “स्त्री” जातीला जास्ती सन्मान असतो. सिंह आणि वाघीण शिकारीचे काम करीत असल्या तरी प्रथम शिकार खाण्याचा मानही त्यांनाच असतो. मनुष्य आणि इतर साजीवांमधील स्त्री-पुरुष यांमधील आणखी एक फरक म्हणजे मनुष्य प्राणी सोडला तर इतर कुठल्याही सजीवांमध्ये स्त्रीची अब्रू जबरदस्तीने लुटली जात नाही. यामुळे महत्वाचा मुद्दा असाच ठरतो कि मनुष्य प्राण्यामध्ये असे वेगळे काय आहे कि ज्यामुळे “स्त्री”ला समाजात स्थान मिळवून देण्याची वेळ यावी लागली?

मनुष्यप्राणी इतर प्राणी यांच्यात काही मुलभूत गोष्टी या प्रकर्षाने वेगळ्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे, अन्न-वस्त्र-निवारा या मनुष्याच्या प्राथमिक गरजा आणि मनुष्य या गरजा भागविण्यासाठी करीत असणारी बौद्धिक तसेच शारीरिक उठाठेव. दुसरी भिन्नता म्हणजे मनुष्याने अवगत केलेले अप्रतिम “संभाषण कौशल्य”. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा वेगळेपणा महणजे मनुष्याचे स्त्रीच्या बाबतीत असलेले वैयक्तिक मत आणि समाज मत या मध्ये असलेली तफावत.

आज समाजात स्त्रीला स्वातंत्र मिळायला हवे, पुरुषांकडून स्त्रीचे होणारे अत्याचार थांबायला हवेत, असे समाजाचे मत आहे. परंतु ते तसे मिळायला पाहिजेत का? अथवा कितपत मिळायला पाहिजे? या मध्ये समाजमत आणि वैयक्तिकमत यामध्ये फरक वाटतो. शिवाय स्त्रियांना स्वातंत्र मिळणे म्हणजे स्त्रीची उन्नती होते असे नाही तर या स्वातंत्र्याचा “स्त्री” समाजात कसा उपयोग करते यावर तिची आणि पर्यायाने समाजाची उन्नती अवलंबून आहे. पुरुषाकडून स्त्रियांना सहजतेने समानतेची वागणूक मिळणे महत्वाचे आहे.

सध्या चालू असलेल्या “स्त्रियांवरील बलात्कार” या समस्येचाच विचार केला तर, काही गोष्टी स्त्रियांकडून दुर्लक्षिल्या जात आहेत असे “मला” प्रकर्षाने जाणवते. पुरुषाने स्त्री वर बलात्कार करणे हा एक अक्षम्य अपराध आहे आणि या बद्धल त्याला कठोरात कठोर शिक्षा (फाशीची) झाली पाहिजे यामध्ये समाजाचे दुमत असण्याची गरजच नाही, परंतु असे अपराध का वाढीत आहेत, ते होऊ नये यासाठी स्त्री-आणि पुरुष या समाजाच्या दोनही घटकांनी काय करायला हवे यावर विचार व्हायला हवा. फाशीची शिक्षा देणे, स्त्रियांना कराटे शिकविणे, स्त्रियांसाठी बचावात्मक “स्प्रे” बनविणे हे उपाय म्हणजे आजारावर जुजबी उपाय केल्या सारखे आहे.

पुरुष हा मुळातच शारीरिकदृष्ट्या स्त्रीपेक्षा मजबूत / ताकतवान असा आहे. होर्मोन्स आणि लैंगिकतेच्या शास्त्रानुसार पुरुषावर कुठलीही बंधने नाहीत अथवा त्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही. देवाने पुरुषाची जडणघडण मुद्दामच सोपी केली असावी कारण पुरुषाकडे स्त्री एवढी सहनशक्ती, नीटनेटकेपणा आणि कणखरपणा दिलेला नाही, (हे मी प्रांजळपणे मान्य करतो) आणि कदाचित त्यामुळे नैसर्गिकरित्या स्त्री पेक्षा पुरुष हा लैंगिक आकर्षणाच्या बाबतीत थोडा हट्टी आणि आक्रमक आहे आणि यापुढेही राहणार. याउलट स्त्रीची जडण घडण होर्मोन्स आणि लैंगिकतेच्या शास्त्रानुसार काहीशी जटील , गुंतागुंतीची आणि स्त्रीला पुरुषापासून वेगळे असल्याचे दाखवून देणारी आहे. मुळात स्त्री हि लैंगिकतेच्या बाबतीत पुरुषापेक्षा कमी आक्रमक आणि तुलनेने समजूतदार आहे. यादोनही नैसर्गिक गोष्टींचा विचार केला तर असे लक्ष्यात येईल कि पुरुषाला स्त्री विषयी वाटणारे आकर्षण हे जरी काही प्रमाणात आतताईपणाचे वाटत असले तरी ते नैसर्गिक आणि साहजिक आहे. या आकर्षणाला अवास्तव खत पाणी मिळाले (अजाणतेपणी अथवा जाणतेपणी) कि मग पुरुषाचा तोल जातो आणि त्याच्या कडून बलात्काराचे कृत्य होते. (कृपया याचा अर्थ मी या कृत्याचे समर्थन करतो आहे असा घेऊन नये, योग्य आहे कि अयोग्य हा मुद्दा नसून हे सत्य आहे आणि आपण ते स्वीकारायला हवे). आता हे खतपाणी कुठून घातले जाते हे वेगळे सांगायला नको. आज समाजात प्रतिष्ठेचे स्थान मिळविणाऱ्या स्त्रियांचा ज्या समाजाकडून सन्मान, सत्कार केला जातो आहे, तसाच हे खत पाणी घालणाऱ्या स्त्रियांना चार समजुतीचे बोल सुनाविण्याचे कामही त्याच समाजाने करायला हवे. हे काम पुरुष जात सामुहिक रित्या करीत नाही आणि करणारही नाही ; त्यामुळे पुन्हा हि जवाबदारी स्त्रियांकडेच येते.

एकीकडे अंतराळात जाऊन येणारी सुनिता विल्यम्स जशी स्त्री आहे, तशीच दुसरीकडे बलात्कार म्हणजे “surprise sex” असे म्हणणारी सनी लीओनही स्त्रीच आहे. एकीकडे जगातील सर्वात जास्ती आय.क्यू. असणारी नेहा रामू हि स्त्री आहे, तर दुसरी कडे ट्विटर सारख्या “सोशल नेट्वर्किंग साईट” नग्न फोटो उपलोड करणारी शर्लीन चोप्राही स्त्रीच आहे. एकीकडे ऑलम्पिक मध्ये मेडल जिंकणारी सायना नेहवाल स्त्री आहे तर दुसरी कडे वर्ल्डकप जिंकल्यावर विवस्त्र नाचेन असे म्हणणारी मॉडेल पूनम पांडे हि सुद्धा स्त्रीच आहे. ज्यावेळी उत्साहाने सुनिता, नेहा, सायना यांची स्तुती समाजाकडून केली जाते त्याचवेळी सनी लिओन, विणा आणि पूनम यांचा निषेध आणि कानउघडणी समाजाकडून व्हायला हवी. दुर्दैव असे आहे कि आज सुनिता वगैरे सारख्या स्त्रियांपेक्षा पूनम, विणा सारख्या स्त्रियांची यादीच जास्ती मोठी होते आहे. आणि यातहि स्त्रिया या प्रवृत्तीला “व्यक्ती स्वातंत्र्याचे” गोंडस नाव देत आहेत.

बलात्कारास प्रवृत्त करणाऱ्या अश्या अनेक घटना समाजात घडत आहेत. पुरुषाची स्त्रीकडे बघण्याची दृष्टी बदलत आहे. पुरुषाचा स्त्री बद्धलचा दृष्टीकोन आदरपूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न करणे हि समाजाची सामुहिक जवाबदारी असली, तरी पुरुषावर लहानपणीच स्त्रीजाती बद्धल आदराची भावना निर्माण करणे हि जवाबदारी समाजाच्या “कुटुंब” या संस्थेची आणि त्यातही प्रामुख्याने कुटुंबातील “आई” या पात्राची आहे असे प्रकर्षाने जाणवते. पुरुष हि अशी भावना निर्माण करण्यास असमर्थ आहे या एकाच कारणामुळे ती जवाबदारी स्त्रीनेच स्वीकारावी या मताचा मी आहे.

आज समाजात ज्या वेळी दिल्लीतील बलात्कार प्रकरणातील तरुणी बद्धल जेव्हा चर्चा होते, तिला ब्रेक गर्ल वगैरे उपमा दिल्या जातात, तेव्हा राहून राहून मला , हा अक्षम्य अपराध करणाऱ्या मुलांच्या मातेच्या मनात चालू असलेली घालमेल अस्वस्थ करते. “मी तर माझ्या मुलावर असे संस्कार केले नाहीत … मग तो असा झाला याला जवाबदार कोण? मी कि हा समाज?” हा तिच्या मनातला प्रश्न शेवटी अनुत्तरीतच राहणार हे नक्की.

असो, माझ्या मनातील स्त्री चे स्थान हे अत्युच्च राहावे हीच ईश्वराकडे प्रार्थना. घरी येणारी कामवाली आणि ऑफिस मध्ये पगार देणारी “बॉस” या दोघींनाही महिला या नात्याने समान नजरेतून बघणारा आणि आदराची वागणूक देण्याचा प्रयत्न करणारा मी जगातील सर्व ज्ञात अज्ञात महिलांना “जागतिक महिला दिनाच्या” हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.

आपल्याच समाजातील सुजाण पुरुष वर्गाचे नेतृत्व (अघोषितJ) करणारा एक पुरुष

अक्षय फाटक

९८७०९८५९०१

विशेष सूचना: या सर्वात पुरुषाची समाज व्यवस्थेतील जवाबदारी मी मुळीच नाकारत नाही. पुरुषांमधील विकृती जाण्यासाठी मुलांवर (मुलगे) लहानपणीच योग्य संस्कार व्हायला हवेत.

 

 

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: