Posted by: vmbhonde | नोव्हेंबर 13, 2011

काही मजेशीर व्याख्या

अनुभव – सभ्य शब्दात मांडलेल्या चुका

ब्रह्मचर्य – कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग

विवाहित माणूस – जन्मठेपेचा कैदी

विधुर – जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी

मोह – जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

शेजारी – तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो

सुखवस्तू – वस्तुस्थितीत सुख मानणारा

वक्तृत्व – मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे

लेखक – चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा

फ्याशन – शिंप्याच्या हातून झालेल्या चुका

पासबुक/ब्यांक्बुक – जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर)

ग्यालरी- मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा

लेखणी – एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन

छत्री – एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ

कॉलेज – शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन

परीक्षा – ज्ञान तपासून घेण्याचे एकहातयंत्र

परीक्षा – पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ

विश्वशांती – दोन महायुद्धांच्या मधला काळ

दाढी –कुरुपपणालपवण्याचेरुबाबदारसाधन

थाप – आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात

काटकसर – कंजूषपणाचे एकगोंडसनाव

नृत्य – पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला

घोरणे – नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची
निसर्गाने बहाल केलेली देणगी

मन – साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू

श्रीमंत नवरा – चालतं बोलतं atm कार्ड

श्रीमंत बायको – अचानक लागलेली लॉटरी

IT वाला – सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम

IT वाली – श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री

बुद्धिवादी – ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा

स्कार्फ – बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड
लपवायचे मुलींचे एक साधन

लग्नाचा हॉल – दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना

मिसळपाव.कॉम – जगातील सर्वनमुन्यांचेएकत्रित पणे टेस्टिंग करणारी प्रयोगशाळा

 

“suhas patil” surapasaa@gmail.com          31-5-2011

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: