Posted by: vmbhonde | नोव्हेंबर 13, 2011

मी आहे ब्राह्मण कोकणस्थ

मी आहे ब्राह्मण कोकणस्थ
आम्ही कधीच बसत नाही स्वस्थ

रीतीरीवाजांमध्ये आमचा नंबर आहे
आमचीच पालखी प्रत्येक जण वाहे
बचतीचा मार्गच आम्हा डोहे
आम्ही कधीच नसतो अस्ताव्यस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!१!!

वंशपरंपरा आम्ही दांडीवर कपडे टाकतो
पण त्याचा क्रम कधीच बदलत नसतो
बदलला तर आम्ही लगेच पिसाळतो
दुस-या जातीची सून आली तर होतो त्रस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!2!!

एका काडीनेच गॅस पेटवितो
लगेच दुस-या गॅससाठी विझवून ठेवितो
वरण-भाताशिवाय आम्ही जेवत नसतो
त्यानेच जेवण होते मस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!3!!

लोकमान्य आमच्यातच जन्माला आले
सर्व क्रांतिकारक आमचेच झाले
स्त्रियांना अण्णासाहेबांनीच उद्धरले
साधू न होता राहावे नेहमी व्यस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!4!!

दादासाहेब फाळक्यांनी चित्रपटसृष्टीचा पाया घातला
राजा परांजपे यांनी देशभर पसरविला
माधुरीने त्यावर कळस चढविला
असे क्षेत्र नाही जेथे पोहोचत नाही अमुचा हस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!5!!

भांडणात आम्ही कमी नाही
तत्वांसाठी आमचे आयुष्य जाई
वाट्यांमध्ये झाडूची सुद्धा विभागणी होई
त्यासाठी आम्ही होत नाही त्रस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!६!!

लाचारी करून होत नाही दीन
व्यवहार करताना नडतो अभिमान
नेहमी असते आमची ताठ मान
खर्चावर असते आमची गस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!७!!

गॅस सिलेंडर वर तारीख लिहितो
आधी संपला तर उपास घडतो
तोच आमचा एकादशीचा दिवस असतो
उपासाचे कधीच खात नाही जास्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!८!!

महिन्याची पेपर रद्दी लावलेली असते
वाण्याला तागडीची गरजच नसते
त्याच पैशातून भिशी चालत असते
पै पैसा करून आम्ही घेतो खस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!९!!

चोव्वीस कॅरेट शिवाय सोने नाही घेत
पेठे-गाडगीळांशिवाय दुसरे दुकान नाही पाहत
दागिन्यांत आमची असते सर्वांवर मात
आता नाही वापरत तांबे-पितळ-जस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!१०!!

 

 

“SHYAM PADHYE” <sppmechengr@gmail.com     18-4-2011
Advertisements

Responses

 1. द्विजाची कैफियत

  हल्ली मी दहशत वाद्यांच्या विरोधात बोलायचे टाळतो,
  कारण बुरसटलेली विचारसरणी अशी हेटाळणी होईल
  हल्ली मी आंदोलनात भाग घ्यायचे टाळतो,
  कारण आंदोलनाचा पाठिंबा कमी होईल
  हल्ली मी आरक्षणावर बोलायचे टाळतो,
  कारण राजकारणी त्याचा फायदा घेतील
  हल्ली मी समाजसुधारकांचे नाव ही घ्यायचे टाळतो,
  कारण खोटा इतिहास सांगण्याचा खटला होईल
  हल्ली मी टिळक, सावरकरांचे लिखाण वाचणे टाळतो,
  कारण सनातनी विचारांचा शिक्का बसून जाईल
  हल्ली मी सभ्य, सुसंस्कृत पणे बोलणे टाळतो,
  कारण त्याला नपुंसकता समजले जाईल
  हल्ली मी समाजसेवा करण्याचे टाळतो
  कारण त्यातच आमच्या घरांची बरबादी, कुटुंबांची ससेहोलपट झाली
  हल्ली मी आडनाव घ्यायचे टाळतो,
  कारण त्यातून माझी जात ओळखली जाईल
  हल्ली मी चारचौघात विचार मांडणे टाळतो,
  कारण त्यात कुणालाही जातीय कावा दिसतो
  हल्ली मी देशभक्तीच्या घोषणा देणे टाळतो,
  कारण त्यात संघाचा प्रभाव दिसतो
  नाही दादोजींना इमान, रामदासांना चारित्र्य,
  शहिदांची जात येते वृत्तपत्रात मात्र
  हळू बोला,आपल्या जातीचे नाव कुणी घेवू नका,
  कृष्णाजीशिवाय कोणाचाही वारसदार स्वतःला मानू नका
  आम्हाला शिव्या दिल्या शिवाय इतर मागासलेले ठरत नाहीत,
  रात्री पुतळे हलवल्याशिवाय भ्रष्टाचारावरून जनतेचे चित्त हटत नाही
  ही जात इतकी बदनाम कशी,प्रश्न मला पडला आहे,
  जातीयतेच्या राजकारणात सारा देश सारा देश सडला आहे
  जरी म्हटलं या साऱ्या अफवा खोट्या आहेत,
  पण विषमता मिटली तरी आमच्या मनात मोठ्या दऱ्या आहेत
  आमचा जप करून पोट काहींचे भरते यात आनंद आहे,
  शेवटी त्यांच्या कडेही द्यायला शिव्या उरत नाहीत
  आतातर यासाठी विशेष धर्म, संघटना निघाल्या आहेत,
  भावी देशासाठी त्यांच्या आपापल्या घटना निघाल्या आहेत
  त्यांच्या या घटनांमध्ये एका जातीला स्थान नाही,
  म्हणून तिथे कवी कलशाला उल्लेखाचा ही मान नाही
  काय करणार शेवटी ही जातच बदनाम आहे,
  मान वर करून चालण्याची आमची काय बिशाद आहे
  धर्म तोडणार्यांना, सत्ताधीशांना आगीत तेल ओतावे लागते,
  त्यांच्या कडेही दुसरा फायद्याचा उपाय नाही
  वाघ, सिंहाच्या वाटेला कुणी भक्त जातो काय,
  यज्ञात बळी होतो बकरा, राजकारणात कोण होते पाहा,
  धरली तर चावते, सोडली तर पळते अशी ही जात आहे,
  ही तर कट्टरतेची माणुसकी वर मात आहे
  स्वातंत्र्यानंतरही घरे जळाल्यावर आम्ही मागे हटलो आहोत,
  समाजसेवा,परमार्थ करण्याला घाबरू लागलो आहोत
  सोडा आता विचार सारे, पूर्वजांच्या चुका पुन्हा करू नका,
  अहंगंडाच्या कोशात राहून वाट वाकडी धरू नका
  जिभेवर असली सरस्वती तरी सत्य बोलावत नाही,
  मानाने जगण्याचा हक्क ही आम्ही मागत नाही
  आम्हाला आदर न दिल्याने समाज कुठे चालला आहे,
  शिक्षणात पावित्र्य, समाजात नैतिकता, राजकारणात सौजन्याची ऐशी तैशी,
  जीवनात रामापेक्षा दामाची जागा झाली मोठी
  द्वेषाला द्वेषाने आम्ही उत्तर देत नाही,
  द्वेषाचा धंदा करणार्यांचे दुकान बंद होत नाही
  वोट बँक बनवल्याशिवाय प्रश्न कधी सुटणार नाहीत,
  पैसा, सत्ता आल्याशिवाय समाजाला तुम्ही चांगले वाटणार नाहीत
  शेंडी आणि जानव्याची ताकद अजून कमी झालेली नाही,
  हार मानण्याइतकी परिस्थिती हाताबाहेर गेली नाही
  सोडून सारे न्यूनगंड,हताशा, वर्तमानात जगूया,
  गेली संकटे, झाल्या चुका, बदलण्याची वेळ आहे.
  हिम्मतीने जगण्याचा हा काळ आहे.
  उज्ज्वल भवितव्य घडवायचे आहे,
  यश खेचून आणायचे आहे
  होऊन गेला भूतकाळ, भविष्य बाकी आहे,
  द्वेष कुणीही करो, राम आमच्या पाठीशी आहे

  – कवी योगेश


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: