Posted by: vmbhonde | नोव्हेंबर 13, 2011

माझी शाळा

अडगळीच्या खोलीमधलं
दप्तर आजही जेव्हा दिसतं
मन पुन्हा तरूण होऊन
बाकांवरती जाऊन बसतं 

प्रार्थनेचा शब्द अन शब्द
माझ्या कानामध्ये घुमतो
गोल करून डबा खायला
मग आठवणींचा मेळा जमतो

या सगळ्यात लाल खुणांनी
गच्च भरलेली माझी वही
अपूर्णचा शेरा आणि
बाई तुमची शिल्लक सही

रोजच्या अगदी त्याच चुका
आणि हातांवरले व्रण
वहीत घट्ट मिटून घेतलेत
आयुष्यातले कोवळे क्षण

पण या सगळ्या शिदोरीवरंच
बाई आता रोज जगतो
चुकलोच कधी तर तुमच्यासारखं
स्वतःलाच रागवून बघतो

इवल्याश्या या रोपट्याची
तुम्ही इतकी वाढ केली आहे
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा
सवय आता गेली आहे

चांगलं अक्षर आल्याशिवाय
माझा हात लिहू देत नाही
एका ओळीत सातवा शब्द
आता ठरवून सुद्धा येत नाही

दोन बोटं संस्कारांचा
समास तेवढा सोडतो आहे
फळ्यावरच्या सुविचारासारखी
रोज माणसं जोडतो आहे

योग्य तिथे रेघ मारून
प्रत्येक मर्यादा ठरवलेली
हळव्या क्षणांची काही पानं
ठळक अक्षरात गिरवलेली

तारखेसह पूर्ण आहे वही
फक्त एकदा पाहून जा
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा

 

 

 

 

“suhas patil” <surapasa@hotmail.com     7-10-2010

 

Advertisements

Responses

  1. Namskar

    Thanks Vilas Marathei biloc karata’

    Puneri Ekdam Mast

    Baburao Marathe


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: