Posted by: vmbhonde | नोव्हेंबर 13, 2011

मराठी माणसाला एक चान्स दिला होता.

आम्हाला नवा टि.व्ही. घ्यायचाच होता, पण तो मराठी माणसाकडून घ्यावा असे आम्ही ठरवले. निदान त्याच्याकडे विचारणा करावी आणि थोडाफार जास्त महाग असला तरी विकत घ्यावा असं मान्य केलं. थोडक्यातच मराठी माणसाला एकतरी चान्स द्यावा, ह्या मताचा मी होतो.

त्यामुळे इच्छा नसतानाही मी सौ. बरोबर एका जय सेल्स नावाच्या गुजराथ्याच्या दुकानात शिरलो. त्याने त्या टि.व्ही.ची किंमत १९,७०० सांगितली.

मी विचारलं, “इट्स कॉस्टली.”

तो मराठीत म्हणाला, “साहेब तुम्हाला ओळखतो आम्ही. जुना एक्स्जेंज करू.”

मी ओशाळत मराठीत प्रश्न केला, “जुन्या टि.व्ही.चे किती द्याल?”

तो म्हणतो, “२०००”

मी चकितच झालॊ. उद्या फसवणुकीचा आळ आपल्यावर येऊ नये म्हणून मी साळसूदपणे म्हणालो, “चालत नाही पण.”

तो म्हणाला, “असू द्या. २००० फिक्स. चालत असेल नसेल.”

मी म्हटलं, “म्हणजे हा टि.व्ही. १७,७०० रूपयाला पडेल.”

तो म्हणाला, “अगदी बरोबर! तुम्ही काय घेणार? चहा कॉफी? कोल्ड ड्रींक?”

सौ म्हणाली, “नको. बाहेरचं खाऊन पिऊन पोटं खराब होतात ह्यांची”.

तो म्हणाला, “मॅडम असू द्या. स्वीट लाईम सोडा आहे. पोट नाय खराब होणार यांचं.”

मी हो म्हणालो.

सोड्याची एक सिप घेत मी म्हटलं, “हे काय चिटकवलेलं आहे टि.व्ही.च्या मागे?”

तो म्हणाला, “हा हॉलोग्राम, कंपनीचं ग्यारण्टी कार्ड अन हे आहे स्क्रॅच कार्ड! श्युर फ्री गिफ्ट आहे ह्यात. मोटार मिळेल लक असेल तर.”

सौ. म्हणाली, “मोटार? ती जाऊ द्या. ह्यांचं लक सद्ध्या झोपलंय. कमीतलं कुठलं गिफ्ट मिळेल?”

तो म्हणाला, “घड्याळ.”

मी आणि सौ ने एकमेकांकडे बघितलं. ‘पुढचं मी बघते’, असा दिलासा तिच्याकडून मिळाल्यावर मी निश्वास सोडला.

सौ., “दहा घड्याळं घरी पडलीत नुसतीच. आम्हाला नको असेल तर? किती कमी कराल?”

तो, “बहनजी तुम्ही एवढं म्हणताय तर ५०० कमी करेन.”

सौ., “म्हणजे पूर्ण टि.व्ही. १७,२०० ला… महागच आहे तरी!”

तो, “मॅडम अहो फ्री डिलिव्हरी करेन घरी.”

सौ., “आम्ही नेऊ रिक्षात. काय कमी कराल?”

तो हसला, “ठिक आहे २०० करतो. १७,००० फिक्स.”

मी आणि सौ टि.व्हीविनाच दुकानाच्या बाहेर पडलो. मराठी माणसाला अजून चान्स द्यायचा होता. गुजराथ्याने जाता जाता त्याचं कार्ड मला दिलं. फोनवरती पण मागवता येत होतं म्हणे.

मी बाजूच्या श्री.गणेश ईलेक्ट्रॉनिक दुकानात शिरलो. मालक मराठी होता कारण दुकानातले सगळे टि.व्ही. “मी मराठी” चॅनल दाखवत होते. आत शिरलो तसं उकडू लागलं. ए.सी. बंद होता. आम्ही काऊण्टरवर उभे होतो.

“आम्हाला टि.व्ही. घ्यायचाय..”, मी विचारलं.

फोनवर गप्पा मारणारी रिसेप्शनिस्ट पूर्णपणे दुर्लक्षित करून म्हणाली, “हो एक मिनिट बसा.”

आम्ही बसलो.

बराच वेळाने झोपेतून उठलेला कुणीतरी आला.

तो, “ओके. टेल मी.”

मी, “टि.व्ही. घ्यायचाय”

तो, “विच वन?”

मी, “तुम्ही मराठी?”

तो, “हो. पण बिझीनेस ल्यांग्वेज बोलावी लागते क्लायणटशी म्हणून.”

मी हसलो. तो आम्हाला कस्टमर ऎवजी क्यायन्ट म्हणाल्याने मी प्रभावीत झालो होतो. सौ वर मात्र क्लायण्ट शब्दाचा काही फारसा फरक पडलेला नसावा. ती उकाड्याने हैराण होऊन म्हणाली, “टि.व्ही. दाखवा.”

तो, “सगळेच टि.व्ही. घ्यायला येतात इकडे. कुठला ते सांगा.”

मी, “हा एल्जी”

तो, “१९,७००”

मी, “काय?”

तो, “किंमत.”

मी, “माहितिये पण जुना एक्स्जेंज कराल का?”

तो, “चालतो का?”

मी, “नाही.”

तो, “सॉरी. मग भंगारात विका”

मी, “पण बाजूचा जय सेल्स २००० देतोय जुन्याचे”

तो, “मग त्याच्याकडूनच घ्या.”

मी हिरमुसलो.

सौ, “पण त्यावर गिफ्ट पण आहे. रीटर्नेबल.”

तो, “उल्हासनगरचा माल तिकडचा. गिफ्ट काय उद्या मोटार पण देईल.”

सौ, “ती पण देतोय”

तो, “ती पण उल्हासनगरचीच असेल.”

मी मात्र उल्हासनगरला टिव्ही पासून मोटारपर्यंत सगळ्याच गोष्टी कशा काय बनतात ह्याचे आकलन करू लागलो.

सौ, “शेवटचं सांगा.”

तो, “१९,७००”

मी, “होम डिलीव्हरी?”

तो, “रिक्षात घालून देतो. न्या.”

मी, “पण आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहतो. लिफ्ट नाहीय.”

तो, “तो आमचा प्रॉब्लेम नाही.”

सौ (चिडून), “अहो पण एवढं सगळं जय सेल्स देतं तर तुम्ही काहीच काय देत नाही.”

तो (निष्कर्म योगाने हनुवटी खाजवत), “ते लोकं टोल चुकवतात. डॉकवरचं स्मगल केलेलं सामान विकतात.”

मी, “पण त्यांच्या टि.व्ही.वर होलोग्राम आहे. शिवाय ग्यारन्टी कार्ड आहे ते वेगळच. बार कोडसहित.”

तो, “अहो तुम्ही गुजराथ्यावर विश्वास ठेवणार की मराठी माणसावर?” ……

… माणसाने खूप खोटं बोलू नये. मी त्याच्यावर विश्वास ठेवला होता पण नाईलाजास्तव सौ. च्या मतापायी उल्हासनगरचा १७००० मधलाच टि.व्ही. विकत घेतला. होम डिलिव्हरी केल्यावर चेकने पैसे पण देउन टाकले. डिल्हीवरी केलेल्या पोराने चुणचुणीतपणे माझ्या सौ.च्या मागणीनुसार सास बहुचे सगळे चॅनल्स पहिल्या दहात आणून दिले.

अकराव्यावर मी मराठी होती.

उगीचच श्री.गणेश मध्ये टाईमपास झाल्याने सौ कितीही रागावलेली असली तरी मी मात्र समाधानी होतो ….

… कारण मी मराठी माणसाला एक चान्स दिला होता.

– एक जुना जोक

 
 
suhas patil” <surapasaa@gmail.com      13-10-2010

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: