Posted by: vmbhonde | नोव्हेंबर 13, 2011

मराठी टाईमपास …………………………

मराठी टाईमपास …………………………
 
जब्र्याक्स विनोद :

माल्कीण – काय ग …. ३ दिवसापसून कामाला नाही आलीस, तेही न सान्गता?
मोल्करीण – ओह म्याडम ….. फ़ेस्बूक वर स्टेटस अप्डेट करुन गेले होते गावला जाते
म्हणुन ….. साहेबानी कोमेन्ट पन दिलि कि ‘कम सून ….. मिस यू!’
——————–
याला म्हणतात पोपट …..

चिंगी (ऐटीत): माझ्या एका एका श्वासावर पोर मारतात.
पक्क्या: मग तू एखादी चांगली टूथपेस्ट का नाही वापरत?
——————–
चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे भारताचे शत्रू उत्तरेलाच का आहेत?
…..
…..
कारण, दक्षिणेला रजनीकांत आहे!
——————–
लई भारी SMS …..

दोन स्त्रियांशी विवाह का केला या प्रश्नावर एका अर्थशास्त्रज्ञाने मांडलेली २ मत.
पाहिलं मत: मक्तेदारी मोडली जाते.
दुसरं मत: स्पर्धा निर्माण झाल्यामुळे सेवा सुधारते.
——————–
लई भारी SMS …..

अशा मजेशीर गोष्टी भारतातच होऊ शकतात,
२० वर्षापूर्वी वडापाव १ रुपया आणि STD कॉल ७ रुपये होता …. आणि आता वडापाव ७
रुपये आहे आणि STD कॉल १ रुपया झालाय.
——————–
सासू: अग सूनबाई, बोलवत नाही तरी पण राहावल जात नाहीये म्हणून विचारते, माझा नातू
माझ्या मुलासारखा दिसत नाही?
सुनबाई (कसबस सावरत): अहो सासूबाई, मी पण एक स्त्री आहे, फोटो कॉपी मशिन नाही,
सारखीच कॉपी काढायला.
——————–
चिंगी: पप्पा, मी आई बनणार आहे.
पप्पा: अग कार्टे, काय मुर्खासारख बडबडते आहेस.
चिंगी (लाडात): मुर्खासारख काय हो पप्पा, तुम्हीच म्हणालात ना, जो पर्यंत तू काही
बनून दाखवत नाहीस तोपर्यंत तुला ‘स्कूटी’ घेऊन देणार नाही.
——————–
पोलीस: पण स्वताच्या वाहिनीला मारायचं कारणच काय?
संता: ती लफडेबाज आहे, तीची बाहेर प्रेमप्रकरण आहेत.
पोलीस: तुला कसं कळल?
संता: मी जेव्हा पण मित्रांना विचारायचो कि फोनवर कोणाशी बोलत आहात?  तर ते
म्हणायचे तुझ्या वाहिनी बरोबर.
——————–
पक्क्या बारमध्ये गेला आणि त्याने मॅनेजरला बियरची किंमत विचारली
मॅनेजर: २० रुपये
पक्क्या: काय २० रुपये? एवढी स्वस्त? मग तर चाकण्याला पापलेट घेऊ शकतो, त्याची
किंमत किती?
मॅनेजर: १० रुपये
पक्क्या: काय?  एवढं स्वस्त?  या बारचा मालक कुठेय?
मॅनेजर: वरच्या माळ्यावर, माझ्या बायको बरोबर.
पक्क्या: तुझ्या बायको बरोबर तो काय करतोय?
मॅनेजर: तेच जे मी त्याच्या धंद्याबरोबर करतोय.
——————–
कॉलगर्ल जुली ने सखाराम बापूंच्या दर्शनाला गेली …..
जुली: बापूजी, हे प्रेम, इश्क, त्याग वैगरे सगळ काय असत?
सखाराम बापूं: तू त्या भानगडीत पडू नकोस, हे सगळे फुकटात ‘छंद’ पुरवायचे बहाणे
आहेत.
——————–
मुलं नेहमी “प्रेमात पडला” असं का म्हणतात?
…..
कारण “प्रेमात उभा राहिला” असं म्हटलं तर डबल मिनिंग होतं ना …..
——————–
मंग्या चिंगीला घेऊन बागेत बसला होता …..
चिंगी (लाडात): जानू, अस काही तरी बोल ना कि माझ्या हृदयाची धडधड वाढेल, मन बेचैन
होईल.
मंग्या: पळ लवकर, तुझ्या टकल्या बाप येतोय …..
——————–
उंदिरांची टोळी तलवारी घेऊन धावत होती …..
रस्त्यात वाघाने विचारल, का रे?  का धावताय?  राडा काय आहे?
उंदिर: आईच्या गावात, तिकडे हत्तीच्या आयटमला कोणीतरी प्रपोज केला आणि नाव आमच्यावर
आलंय …..
——————–
गणु: माझी आई म्हनती घरातली एक पोरगी शिकली कि त्या घरातली चार लोक शिकतात.
दिनू: च्या मायला, पण ह्या पोरी शाळेत यायला लागल्यापासून आपण सगळे नापास व्हायला
लागलो त्याच काय?
——————–
 लई भारी वात्रटिका …..
 
शौचाला बसलो होतो,
पार्श्वभागावर बसला डास,

…शौचाला बसलो होतो,
पार्श्वभागावर बसला डास,

असा भयंकर सोडला वास,
तिथेच त्याने सोडला श्वास …..
——————–
लई भारी SMS …..
आयुष्यातील तणाव कमी करण्यासाठी Alt + Ctrl + Delete चा वापर आयुष्यात सुद्धा
करावा.
स्वतः ला Control करावे,
Alternative उपाय शोधावे, आणि
तणाव निर्माण करणारे वाईट विचार मनातून Delete करावे …..
——————–
सासुरवाडीला गेलेल्या पक्क्याला रात्री बायकोला जवळ घ्यायचा ‘मूड’ झाला …..
बायको (घाबरून): अहो काय करताय, हे माझ्या वडिलांचं घर आहे.
पक्क्या (वैतागून): च्यायला, माझ्या बापच घर म्हणजे काय रेड लाईट एरिया आहे, कि
तिथे रोज रात्री रंगात येतेस …..
——————–
मांजर आणि नवरा कुठेही सोडले तरीही संध्याकाळीपरत येतात …..
…..
…..
…..
बोका आणि बायको कितीही लाड केलेत तरीही तेवढेच गुरगुरतात.
——————–
एकदा एका माणसाने जळती सिगारेट हवेत भिरकावली..
……
ती एका ग्रहावर जाऊन पडली.
…..
तो ग्रह धडाडून पेटला …..
…..
त्यालाच आता आपण सूर्य म्हणतो …..
…..
सिगारेट फेकणा-या माणसाचं नाव सांगायलाच हवं का?
…..
पेहचान कौन?
——————–
एकदा एका नेपाळी माणसावर देव प्रसन्न झाला.  देवाने त्याला ३ ईच्छा विचारल्या.
…..
नेपाळी म्हणाला:

१. खुप मोठ्ठा बंगला.
…..
२. त्यात एक खुप श्रीमंत माणुस.
…..
आणि …..
…..
३. त्या बंगल्याचा गुरखा मला बनव.
——————–
पोलीस कॉन्स्टेबल (मुलाला): तुझा रिझल्ट फार कमी लागलाय आज पासून तुझे खेळणे व
टीव्ही ….. बघणे बंद!
…..
मुलगा: हे घ्या १०० रुपये व प्रकरण इथेच संपवा.
——————–
नवरा: राजा दशरथाला ३ राण्या होत्या.
बायको: मग?
नवरा: मी पण २ लग्न करू शकतो आजून.
बायको: विचार करा द्रौपदीला ५ नवरे होते.
नवरा: गम्मत केली मी.
——————–
६० वर्षांचे एक गृहस्थ एका हॉटेलात आले होते. मध्यरात्री त्यांच्या दारावरची बेल
वाजली. त्यांनी दार उघडताच त्यांना बाहेर एक सुंदर युवती दिसली, त्या गृहस्थांना
पाहताच ती म्हणाली, “सॉरी हं, चुकीच्या खोलीवर आले.”
गृहस्थ: ‘तुझी खोली बरोबर आहे, पण तू आलीस चाळीस वर्षे उशिरा.
——————–
एकदा एक मनीमाऊ आराम करीत असते.  तेवढ्यात एक पिटुकला उंदीर येतो आणि तिच्यासमोर
जोरजोरात नाचायला लागतो.
मनीमाऊ: “ए चिपळ्या!  काय झालं रे तुला नाचायला?”
उंदीर (नाचतच): “आपल्या घरातला डॉबरमन कुत्रा आहे ना, मी त्याला ‘फेसबुक’वर ‘फ्रेंड
रिक्वेस्ट’ पाठवली होती.  त्याने आज ती ‘अॅक्सेप्ट’ केलीय.
——————–
बॉस: तू अगदी माझ्या तिस-या बायको सारखी दिसतेस.
सेक्रेटरी: तुम्हाला किती बायका आहेत सर?
बॉस: दोन.
——————–
 ठिकाण: सदाशिव पेठ: – दु. १२ ते १ ची वेळ

भिकारी (पुण्याचा अभिमान असावा): जोशी काका १ रु. द्याना.
जोशी काका (हे पण पुण्याचे): कशाला पाहिजे.
भिकारी: तीन दिवस जेवलो नाही.
जोशी काका (खवचटणे) : १ रुपयाचे काय करणार?
भिकारी (त्यांच्या पेक्षा जास्त खवचटणे): वजन करून बघीन तीन दिवसात किती कमी झाले
आहे ते.
——————–
 जपानी: आमच्या देशातील मासे कराटे खेळतात.
अमेरीकन: आमच्यादेशातील माकडे पण संशोधन करतात.
रशीयन: आमच्यादेशतील कुत्री सुद्धा अंतराळात जाउन आलेली आहे.
भारतीय: हे तर काहीच नाही .. आमच्याकडे रजनीकांत आहे.
सगळे गप्पं.
——————–
विनोद एम.बी.ए. चा अर्ज भरत असतो ….. तो तेथील चौकीदाराला विचारतो.
विनोद: कसे आहे कॉलेज?
चौकीदार: छान आहे ….. मी पण इथूनच एम.बी.ए केले आहे.
——————–
जीवशास्त्राच्या तासाला आपला बंड्या…..
शिक्षक: पक्ष्याचे पाय बघून नाव सांगा बर त्याचं …..
बंड्या : उउमम नाही सांगता येत सर.
शिक्षक: गाढवा, एवढंही येत नाही?  नाव काय तुझ?
बंड्या: माझे पाय बघा ना सर.
——————–
मन्या: बाबा बाबा, मला सर्कस दाखवा ना!
बाबा: मला श्वास घ्यायला फुरसत नाहीये रे मन्या!
मन्या: असं हो काय करता बाबा? मी ऐकलंय त्या सर्कशीत एक तरुण मुलगी अंगावर एकही
कपडा न घालता एका चित्त्याच्या पिंजऱ्यात शिरते आणि चित्त्याला जेवण भरवते!
बाबा (टुणकन् उडुन) : काय सांगतोस?  अरे मग आज संध्याकाळीच जाऊसर्कस बघायला.  मी
बरेच दिवसांत चित्ता नाही बघितलेला.

 

ranjit tekale” ranjittekale@hotmail.com  25-2-2011 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: