Posted by: vmbhonde | नोव्हेंबर 13, 2011

चला हसू या

एकदा एका शिक्षकाची आदिवासी शाळेत बदली होते.
तिथल्या मुलांना शिक्षक पहिला प्रश्न विचारतो : मुलांनो, तुमचे जुने
शिक्षक कसे होते?
सगळी मुले एका स्वरात उत्तर देतात : “स्वादिष्ट!!”

************************************************************************************************

लग्नाआधी…..
प्रेयसी : जानू,    चंद्र कुठे आहे ?
प्रियकर : प्रिये, दोन ठिकाणी आहे, एक तू आणि दुसरा आकाशात..

लग्नानंतर…..

बायको : जानू, चंद्र कुठे आहे ?

नवरा : म्हशे, डोळे फुटले का? वर आकाशात कोण तुझा बाप torch घेऊन उभा आहे ….?
************************************************************************************************

दारू मुले आयुष्य उध्वस्त झालेल्या बेवड्याला बियर च्या बाटल्यांचा खच दिसला..

१ बाटली फोडून तो म्हणाला, तुज्यामुळे माझी बायको मला सोडून गेली…

२ बाटली फोडून तो म्हणाला, तुज्यामुळे माझा जॉब गेला…

३ री बाटली फोडण्यासाठी उचलली ती भरलेली होती, ती पिशवीत ठेवत तो
म्हणाला, तुझा काही दोष नाही, तू चल घरी…

************************************************************************************************

स्थळ : सदाशिव पेठ, पुणे……..

जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?

तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!

जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?…

तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !

************************************************************************************************

भिमाकाकू सिनेमा हॉल मधे पेप्सीची बाटली घेवुन गेल्या होत्या, थोड्या
थोड्या वेळाने घोट घेत होत्या,आवाज येत होता, त्यामुळे शेजारी बसलेल्या
माणसाला राग आला. त्याने बाटली हिसकावून घेतली आणि एका घोटात सगळी बाटली
संपवली

माणूस : अस पितात कोल्डड्रिंक ..

भिमाकाकू : अरे बाळा पण मी कोल्डड्रिंक पीत नव्हते, पान खाऊन त्या
बाटलीमधे थ…ूकत होते.

************************************************************************************************

व्हॅक्युम क्लिनर सेल्समनचा जॉब लागल्यापासून संता उत्साहात होता,
भिमाकाकुंच्या घरात शिरला आणि ती काही बोलण्याच्या आतच खिशातुन एक पिशवी
काढुन त्यातले शेण जमिनीवर टाकल आणि म्हणाला : मॅडम ह्या व्हॅक्युम
क्लिनरने हे जमिनीवरचे शेण ५ मिनीटात साफ होईल नाही तर मी स्वत: ते खाऊन
टाकेन.

भिमाकाकुं (उत्साहात) : तु ते शेण पावाबरोबर खाणार की चपातीबरोबर?

संता (दचकून) : का ?

भिमाकाकुं : कारण आता लाईट गेले आहेत..

************************************************************************************************
 
एक कवी कविता ऐकवित होता. पण तो जसा कविता सांगायला सुरवात करीत असे
त्याच्या तोंडातली कवळी बाहेर यायची. असं बराच वेळ चालत राहालं.

शेवटी कंटाळून एक श्रोता म्हणाला, ” ओ महाशय काही कविता सांगता की नुसती
कॅसेटच बदलत राहाता.”

************************************************************************************************

मंग्या कानात बाळी घालून फिरत होता,

चंद्या : कानात बाळी? हि नवीन फॅशन तू कधी पासून सुरू केलीस?

मंग्या : अरे बायको माहेरी जाऊन आल्यापासून..

चंद्या : म्हणजे वहीनीनी माहेरून तुझ्यासाठी बाळी आणली की काय ?

मंग्या : नाही रे गाढवा !!! ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली, आता
माझीच आहे सांगितलं म्हणून झक मारत घालावी लागतेय..

************************************************************************************************

शाळेत मराठीचा क्लास चालू होता.

बाई : हे बघा मुलांनो , मराठी मध्ये प्रत्येक वाक्याचे २ अर्थ काढता येतात!!

दिघ्या : बाई काढून दाखवा ना !!!!!

बाई ( लाजुन ) : खाली बस वेडया ! तुझ्या या वाक्याचे देखील २ अर्थ निघतात!
************************************************************************************************

नवरा : तू मला आत्ता कुत्रा म्हणालीस?

बायको लक्षच देत नाही,

नवरा पुन्हा विचारतो.

काहीच उत्तर नाही.

तो पुन्हा विचारतो.
बायको : नाही म्हणाले पण आता भुंकणे थांबवा जरा!!

************************************************************************************************
 
Income tax officer हसत होता..

क्लार्क : काय झाल साहेब?

ऑफिसर : मल्लिका शेरावत ची फाईल आहे..

क्लार्क : मग? त्यात हसण्यासारख काय आहे?

ऑफिसर : कपडे तर घालत नाही आणि laundry bill दाखवलय ८ लाखाच..
************************************************************************************************

बंड्या देवाजवळ तपस्या करत असतो. एक दिवस देव प्रगट होतो,

देव : मी प्रसन्न झालोय वत्सा, बोल तुला काय पाहिजे आहे …

बंड्या : हे देवा, मला असे वरदान दे की मला काहीच करायला नको, सगळे काही
लोक करतील पण पैसे मात्र मला देतील ….

देव : अरे गाढवा सरळ सांग ना तुला “सुलभ-शौचालय” पाहिजे आहे….

तथास्तु …..

************************************************************************************************
 पती : आपल्या बिल्डींग मधला राजू काय काय बडबडत होता..

पत्नी : काय म्हणत होता ?

पती : तो म्हणत होता. आपल्या बिल्डींगमधील एक बाई सोडून सगळ्या बायकांशी
त्याच लफड आहे म्हणून. कोण असेल ती एक बाई ?

पत्नी : देशपांडे आजी असतील.

************************************************************************************************

कॉलेजचा पहिला दिवस, कॉलेजच्या कट्ट्यावरील काही टपोरी मुले चिंगीला अडवतात.

पहीला मुलगा : काय ग तुजे नाव काय आहे?

चिंगी : मला सर्वजण ताई बोलतात.

दुसरा मुलगा : कमाल आहे !!! काय योगा-योग आहे .. मला सर्वजण भाऊजी बोलतात..

************************************************************************************************
एका गावात वाघाने उच्छाद मांडला होता, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी
शिकारयाला बोलावण्यात आल.

शिकारी : आज रात्रीच मी त्या वाघाचा बंदोबस्त करतो, मला गाईच कातड आणून
द्या, ते पांघरून जंगलात जातो, गाय आहे समजून वाघ धावून येईल मग मी
त्याला ठार करतो.

मध्यरात्रीनंतर शिकारी गावात धावत आला, अंगावरच कातड फाटलं होत,

गावकरी : मारला? वाघ… मारला?

शिकारी : वाघ राहू द्या, आधी हे सांगा जंगलात बैल कोणी सोडला होता?

************************************************************************************************
 शीला आजीनी मंदिरातल प्रवचन संपवून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली,
रिक्षावाल्याने डेक सुरु केला आणि गाण लागल,

शीला…. शीला कि जवानी…..
…शीला आजी ( वैतागून ) : मेल्या बंद कर ते आधी, तरुण होते तेव्हा आमचे
हे पण कधी प्रेमाचे दोन शब्द नाही बोलले आणि आता तू लागलाय इम्प्रेस
करायला..
************************************************************************************************

भारतात मुलींचं प्रमाण हे सरासरी १००० मुलांच्या प्रमाणत ८४२ एवढं आहे,
त्यामुळे मुली वाचवा, वाघ नंतर पण वाचवता येईल,
बाईकवर पाठीमागे कोण हव? मुलगी कि वाघ?

************************************************************************************************
जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली,
रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल?
जुली : बॉस ने विचारला ” आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल हो……
रिसेप्शनिस्ट : वॉव, मग?
जुली : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला…

************************************************************************************************

“kiran pandit” <10.kiran@gmail.com      17-4-2011

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: