Posted by: vmbhonde | नोव्हेंबर 13, 2011

आईस्क्रीम : बचके रहना …

 

आईस्क्रीम : बचके रहना …

 

 

 

आईस्क्रीम खायला तसं सगळ्यांनाच आवडतं. आणि आता तर उन्हाळाच काय पण १२ महिने आईस्क्रीम खायची एक संस्कृती तयार झाली आहे. मधुमेही रुग्णांसाठी देखील शुगर फ्री पर्याय उपलब्घ झाले आहेत. बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कदाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत.

मध्ये एका मिटींगसाठी आमच्या एका सरांनी मला हॉटेलमध्ये बोलावलं होत. तेव्हा माझ्या आधी सरांची अजून एका माणसाबरोबर मिटींग चालू होती. मी त्यांच्या मिटींगचा प्रेक्षक झालो गेलो. तो माणूस आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे आउटलेट उघडायचे आहे. त्यासाठी फायनांस करा म्हणून तो त्या सरांना पटवत होता. तो जे काही सांगत होता ते ऐकून मी उडालोच.

त्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे काही कंपन्यांनी विकत घेतली असून सध्या मार्केटमध्ये लोकांना खूप आवडताहेत. ते आवडणाऱ्यात मीही एक होतोच.

तो म्हणाला ; “आता मी लेमन आईस्क्रीम मध्ये ४ नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे मला कुठल्याच कंपनीला विकायचे नाहीयेत. हे फ्लेवर्स लोकांना खूप आवडणार आहेत. ज्याचा आपल्याला आउटलेट उघडून फायदा उठवता येईल. ”

त्यावर सरांनी त्याला एक साधा प्रश्न विचारला की ; “समजा आपण आउटलेट उघडलं आणि तुझा हा लेमन फ्लेवर लोकांना आवडला नाही तर तू त्या लेमन फ्लेवरचे जे उत्पादन करशील ते किती दिवस राहू शकत? लोकांना ते आवडेपर्यंत जो काळ जाईल तोवर ते आईस्क्रीम वाया जाणार मग ते नुकसान कुणी सोसायच? ”. पुढे सरांचे अनेक प्रश्न होतेच. वीज खर्च, दुध , कच्चा माल इत्यादी.

त्यावर तो आपले तंत्रज्ञान किती भारी आहे हे सांगताना म्हणाला की ; “त्याची काही काळजी करू नका. मुळात हे आईस्क्रीम कधीच खराब होत नाही. अगदी आठ दिवस लाईट नसले तरीही… ”

आम्ही चकित झालो . सरांनी विचारलं ; “ते कस काय? दुध आहे ते खराब होणारच.”

तो तत्काळ म्हणाला ; “छे छे. दुधापासून आईस्क्रीम बनवण्याचे दिवस केव्हाच संपलेत. ”

“मग कशापासून बनवतोस बाबा आईस्क्रीम ?”

“डालडा तुपापासून!”

“डालडा तूऽऽऽऽप?”

“आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्या तर सगळे डालडाच वापरतात आणि त्यामुळेच ते परवडतं. आता आईस्क्रीम मध्ये एकही थेंब दुध नसतं. डालडाला थोडी प्रोसेस केली आणि त्यात फ्लेवर्स मिक्स केले की कळतही नाही की डालडा तूप आहे. शिवाय ते दुधाच्या आईस्क्रीमपेक्षा खाताना जास्त मऊ लागतं. आणि तेच लोकांना आवडतं. डालडा आईस्क्रीम जिभेवर येताच त्वरित विरघळते आणि गिळले जाते. शिवाय थंडपणा आणि तुपकटपणा यामधून तोंडात जे तयार होते ते नक्की काय आहे हा विचार लोक करीत नाहीत. पण तेच लोकांना आवडते. लोक अशाच स्वादाला पसंती देतात. ”

तो भरात येऊन त्याच्या तंत्राच मार्केटिंग करत होता आणि आम्ही आमचा इतिहास पोटात ढवळत बसलो होतो.

पुढे तो सांगत होता; “डालडा आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं की ते डालडा सामान्य तापमानात कितीही काळ राहिला तरीही अजिबात खराब होत नाही. याउलट दुधाला मात्र सारखं फ्रीजिंग लागतं. शिवाय दुधाच्या आईस्क्रीमला ८-१० दिवसांनी वास येतो. आणि १५ दिवसात ते खराब होऊन जातं. त्यामुळे खर्च वाढतो. डालडा आईस्क्रीम २ वर्ष फ्रीजच्या बाहेर राहिलं तरी फरक पडत नाही, त्याचे फ्लेवर्सही खराब होत. नाहीत.

डालडा आईस्क्रीमसाठी लाईट खुपच कमी लागते. १० डिग्री तापमानातही त्याचा आईस्क्रीम फील येतो. तर दुधाच्या आईस्क्रीमसाठी उणे तापमानाची (नक्की किती ते लक्षात नाही.) गरज असते. सहाजिकच दुधाच्या आईस्क्रीमच्या विजेचा खर्च वाढतो.

शिवाय दुधापेक्षा डालडा कच्चा माल म्हणून जास्त स्वस्त आहे. तस ते हाताळणी आणि प्रोसेसलाही खूप सोपे आहे. दुधाचे रोजचे कलेक्शन, त्याचे फ्रीजिंग आणि साठवण याचा विचार करता त्याची जी बेसिक किंमत होते. त्या किंमतीतही लोकांना ते आईस्क्रीम खाण परवडू शकत नाही. डालडा आईस्क्रीम मध्ये खूप मोठे प्रोफिट मार्जिन आहे. म्हणूनच आजकाल इतके पॉश आईस्क्रीम आउटलेट निघू शकतात. ”

“डालडा आईस्क्रीम उत्पादनाचा आणखी एक फायदा असा आहे की एकच प्रोडक्शन युनिट चालवून भारत भर कुठेही आपण याचे वितरण करू शकतो. तेही कमी खर्चात. दुधाच्या आईस्क्रीमला तो बेनिफिट नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन युनिट सुरु करावे लागेल.”

तो रंगात आला होता. त्याने त्याचे नवीन लेमन फ्लेवर टेस्ट करायला दिले. मला डालडा आईस्क्रिम खाल्ल्यामुळे नक्की काय तोटा होतो ते माहीत नाही. पण त्यानंतर आईस्क्रीम खायची मजा निघून गेली इतकं नक्की.  

mgkaluskar@gsfcltd.com     24-6-2011

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: