Posted by: vmbhonde | जानेवारी 24, 2011

विनोद

संत्या रिक्षावाल्याला म्हणाला, “सदाशिव पेठेत येतोस का?”
रिक्षावाला म्हणाला, “चाळीस रुपये होतील.
संत्या म्हणाला, “दहा रुपये देतो.” …
रिक्षावाला म्हणाला, “दहा रुपयात कोण नेईल?”
संत्या म्हणाला, “मागे बस. मी नेतो!!!!

एका सरकारी कार्यालयात पाटी लिहिलेली असते,
कृपया शांतता राखा.
एक जण त्याच्या खाली लिहून जातो,
नाहीतर ह्या कुंभकर्णाची झोपमोड होईल…!!!
   
ऐन उन्हाळ्यामध्ये….
बायको: “अहो ऐकलत का…?? डॉक्टरांनी मला सांगितलंय कि तब्येतीमुळे हवापालट करण्यासाठी जरा एक महिना थंड हवेच्या ठिकाणी जाऊन या.
तर मग आपण कोठे जायचं? महाबळेश्वर कि माथेरान??
नवरा तेवढ्याच तत्परतेने म्हणतो, दुसऱ्या डॉक्टरांकडे J
   
एक भिकारी जोशी काकांना : मालक एक रुपया द्या…..तीन दिवसापासून काही खाल्ले नाही ….
जोशी काका (खोचकपणे) : अरे ३ दिवसापासून उपाशी आहेस तर मग एक रुपयाचं काय करशील ?
भिकारी तेवढ्याच खोचकपणे म्हणतो : वजन करून बघेन किती कमी झालंय ३ दिवसात..

पुणेरी किस्सा : एक मुलगा कर्वे रोडवरून प्रचंड जोरात गाडी चालवत होता.
एक माणूस त्याला म्हणतो, “काय कर्वे??”
तो मुलगा गाडी स्लोव करून म्हणतो, “माझे आडनाव कर्वे नाहीये.
तो माणूस : “मग बापाचा रस्ता असल्यासारखा गाडी का चालवतोस….??????”..

नवीन जन्माला आलेल्या बाळाला(नवजात अर्भक) नर्स विचारते,
बाळा तू नाश्त्याला काय घेणार? पोहे की साबुदाण्याची खिचडी??? “
बाळ म्हणत, ” च्यायला, परत पुण्यातच आलो वाटतं L”   JJJ

साला एक झाड नाही या रस्त्यावर! लाजिरवाणी गोष्ट आहे”,
भरधाव सुटलेल्या बसचा ड्रायव्हर स्टीअरिंग व्हीलवर मूठ आदळत ओरडला.
भाबडे बाई डोळे मोठ्ठे करून पापण्यांची पिट पिट पिट पिट करीत म्हणाल्या,
कौतुकच आहे हो तुमचं. पर्यावरणाचा, सामाजिक हिताचा इतका विचार कोण करतं आजकाल!
पर्यावरण?” ड्रायव्हर संतापून महणाला, “अहो, बाई, ब्रेक फेल झालाय बसचा !!!!”

प्रेम होतं का करावे लागते?
मुलगी सुंदर आणि Honda Activa वर असेल तर प्रेम होतं
आणि मुलगी Honda City चालवत असेल तर करावे लागतं J

 राजेसाहेब (टाळी वाजवुन) : कोण आहे तिकडे?
सेवक : मी महाराज..
राजेसाहेब (रागावुन) : मुर्खा, मी महाराज? का तु महाराज?  J
 

बायकोकाय हो, स्वर्गात म्हणे नवराबायकोला एकत्र राहू देत नाहीत.खरे आहे का हे?
नवरा हो खरे आहे.
बायको पण का हो असे?
नवरा अगं त्यामुळेच तर त्याला स्वर्ग म्हणतात.
 
“Ratnakar Kadikar” <ratnakar.kadikar@ymail.com   4-1-2011
Advertisements

Responses

 1. very nice jokes ! enjoyed a lot.

  MUKUND KALUSKAR

 2. Very nice jokes. Would like you to update such jokes regularly for lighter moments in life.

 3. I think doctor should prescribe such jokes on his/her prescription as a remedy to control the Blood Pressure of patients……very good starters….

 4. Very Nice…. Must Read…. Crazy Marathi Jokes….

  परीक्षेच्या RESULT नंतर:

  जर चांगले गुण मिळून पास झाला तर…

  शिक्षक: मी शिकवलंय म्हणून
  आई: सगळी देवाची कृपा
  बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच …
  मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू…

  आणि…

  जर नापास झाला तर….

  शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही
  आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय
  बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस.

  पण मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू

  खरंच….

  सगळे बदलतात पण मित्र नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: