Posted by: vmbhonde | ऑक्टोबर 4, 2010

माझी शारजाह वारी – २ [ दुबई ]

desert safari local camp

 

Dubai creek park-colourful trees

 

Dubai creek park- greenery

 

burj khalifa- the tallest building in the world

 

माझी शारजाह वारी –    [ दुबई ]

शारजाहहून मोठं राज्य-इमिरेट म्हणजे दुबई, येथून १८ कि.मी. वर, पुर्णतः commercial city म्हणून विकसित केलें गेलेलं. आतापर्यंत ही युएई ची आर्थिक राजधानी म्हंटली जात असे, पण आता थोडा फरक झाला आहे. दुबई वर्ल्ड मध्ये मंदी मुळे फसलेले पैसे निघत नाहीत. त्यामूळे दुबईच्या शेखला अबु धाबीच्या मोठ्या शेख कडून अबजो डॉलर्सची मदत घ्यावी लागली आहे, त्यामुळे दुबईचं युएई मधील आर्थिक वर्चस्व कमी झालं आहे. मध्यपूर्वेतील सिंगापोर म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांना आत्तातरी थोडा अडथळा आला आहे.

दुबई क्रीक[खाडी] ही खूप जुनी जागा जेथे फार मोठा व्यापार होत असे. ही खाडी देयरा- दुबई यांमध्ये आहे.समोर जायला लहान बोटी[ एका वेळी २०-२५ जणं बसू शकतील अशा] एक दिरहामच्या भाड्याने चालतात, त्याला अब्रा म्हणतात. देयरा, बर दुबई, ओल्ड सूक इ. स्टेशनं[बोटीची] आहेत.  बर दुबई मध्येच किनार्यावर बॅंक ऑफ बरोडाची शाखा व झोनल ऑफीस आहे. मी त्यांचा जुना अधिकारी म्हणून आपुलकी. लागूनच दुबईची जुनी बाजारपेठ, ज्यांत जुन्या नावांची, जुन्या स्टाईलची दुकानं आहेत. त्यांत बरीच भरतीय नांवं-पेढ्या दिसतात, काही अरबी पण आहेत. लाकडी मंडप आहेत. रस्त्यावर बाजार- कपडे, gift articles- विशेषतः परदेशी पर्यटकांसाठी. सर्वजण तेथे इंग्लिश-हिंदी बोलतात. खाडीमध्ये water[wonder] buses [पाण्यावर व रस्त्यावर दोन्हीकडे चालतात ] व water taxi [२-३ जणांसाठी ] पण विदेशी पर्यटकांना आकर्षित करतात. खाडीला दोन्ही बाजूंनी संपूर्ण ऊंच बांधलेला काठ-रेलींग आहे. अब्रा मधून उतरण्या साठी नीट बांधलेली स्टेशनं आहेत. जवळच एक हिंदु मंदिर आहे, जुन्या घरांत पहील्या मजल्यावर. तेथे सर्व देव- गणेश, देवी, शंकर, राधाकृष्ण पासून सांईबाबा व जलाराम बापा[एक गुजराती संत] पर्यंत एकत्र गुण्या गोविंदाने राहतात. तेथेच वर शिखांचं गुरुद्वारा आहे. गल्ली बोळांतून मंदिरांत जावं लागतं. रस्त्याच्या/बोळाच्या दोन्ही बाजुला धार्मिक पुस्तकं, कॅसेट, सीडी, पूजेचं सामान, देवांच्या मूर्ति-फोटो इ. ची दुतर्फा दुकानं आहेत. अगदी अस्सल तीर्थक्षेत्री आल्यासारखं वाटतं. मंदिरांत पण मोठं भव्य मंदिर, कळस, गाभारा, सभामंडप असं कांही नाही. पण एकुलतं एक श्रद्धेचं स्थान म्हणून भारतीयांची बरीच गर्दी असते. शुक्रवारी[रजेचा दिवस] तर रांग लावावी लागते. युएई मध्ये ईस्लाम शिवायच्या दुसर्या धर्मस्थानांना परवानगी नाही.[आमच्या कडे प्रत्ये नुक्कड वर लाऊड स्पीकर सह मशिदी असू शकतात] संपुर्ण युएईत ह्या एकच मंदिराला परवानगी दिली आहे. चर्चेस मात्र ३-४ आहेत, त्यांच्या बाहेर बोर्ड वगैरे पण लावलेलं आहे. हिंदुंचाच कोणी वाली नाही हेच खरं!! येथे शुक्रवारी रजा म्हणून चर्च मध्ये पण तेव्हांच प्रार्थना होते. मी एका चर्च मध्ये एकावेळी ३००-४०० माणसं पाहीली, ज्यांत केरळी व फीलीपीनो जास्त होते. मंदिराच्या बाहेर तुळशीची रोपं मिळतात.

दुबई खाडीवर महीन्याभराच्या दुबई उत्सवांत रोज रात्री आतषबाजी होते व ३० दिवसांचा मेळा पण भरतो. देयरा मध्ये सर्वांत मोठं व जुनं गोल्ड सूक[सोन्याच्या दागिन्यांचा बाजार] आहे. रस्त्यावर शो केस मध्ये लटकविलेले दागिने- अगदी बांगड्या, नेकलेस, चेन पासून कंबरपट्ट्या पर्यंत- पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. तेथे फसविणं नसतं व सोन्याच्या शुद्धतेची १००% खात्री असते असं म्हणतात. आम्ही आपलं मध्यमवर्गीय महाराष्टीयन माणसाच्या पद्धतिप्रमाणे छोट्याशा कानातल्यांची शकुनाची खरेदी केली व खुष झालो. दुबईमध्ये ७०० हून अधिक सोन्याची दुकानं आहेत. जवळच मसाल्यांच्या पदार्थांचं वेगळ सूक आहे.खाडीला लागूनच देयरांत एक सात मजली मोठी इमारत आहे ज्यांत फक्त कार पार्कींग केलं जातं.

दुबईतील सर्वांत मोठी इमारत म्हणजे बुर्ज खलिफा, जी जगांतील सर्वांत ऊंच इमारत आहे. ती ८२८ मीटर ऊंच आहे. १६० व्या मजल्यावर अरमानी हॉटेल आहे, जे जगांतील सर्वांत ऊंगीवर असलेलं हॉटेल आहे.१२४ व्या मजल्यावर observation desk  आहे. तेथून आपण ढगांच्या वर असतो व दुसर्या इमारतींची ढगांत लपलेली टोकं तेवढी दिसतात. थोडक्यांत म्हणजे बुर्ज खलीफा ही सर्वांत ऊंच इमारत, सर्वांत ऊंच बांधकाम, सर्वांत ऊंच observation desk  आहे. दुसर्या इमारतींची तुलना केल्यास दुसर्या क्रमांकावर सीएन टॉवर्स टोरंटो[५५३ मीटर], नंतर तईपेन १०१[५०८ मी], पेट्रोनास मलेशिया[४५२ मी], सियर्स टॉवर शिकागो इ. येतात. बुर्ज खलीफा हे नांव सुद्धा शेवटच्या घटकेला नक्की झालं, आधी बुर्ज दुबई होतं. पण अबुधाबीच्या शेखने ,ज्याला खलीफा म्हणतात, आर्थिक मदत केल्याने त्याचं नांव ठेवलं गेलं. इमारतीच्या खाली मोठा तलाव आहे, ज्यांत संध्याकाळी संगीत कारंज्यांचा सुंदर शो असतो. बुर्ज खलीफा मध्ये टेहळणी साठी जाण्यास १०० दिरहाम चं तिकीट आहे, ते पण आधी बुकींग केलं तर. ऐन वेळी जाण्यासठी ४०० लागतात[ १ दिरहाम= रु १३/-] . ही इमारत शारजाहहून पण नीट दिसते.

जुमेराह बीच ही फार प्रसिद्ध जागा आहे. तेथे साधारणतः अरब व विदेशी पर्यटकच जातात. सुंदर निळाशार समुद्र. जवळच किनार्यावर जुमेराह हे पंचतारांकित हॉटेल आहे. या विस्तारांत मोठी सुंदर मशिद पण आहे. दुबईचा प्रेक्षणीय पॅलेस पण आहे. बाजुला बुर्ज अल अरब हे जगांतील एकमेव सप्ततारांकित हॉटेल आहे. त्याची ऊंची पण ३२१ मीटर आहे, जी जगांतील १२ व्या क्रमांकाची  ऊंच इमारत आहे. ती बोटीच्या शिडाच्या आकाराची आहे. तेथे पाहायला जाण्यासाठी  बुकींग करावे लागते, ज्याचं तिकीट दि. ३९५ आहे, ज्यांत फक्त दुपारचा चहा मिळतो. आंत जाण्यासाठी चांगल्या पॉश कारने जावे लागते. आपल्याकडे नसेल तर ते भाड्याने देतात. तसेच कपड्यांसाठी पण  ड्रेस कोड असतो. वाटेल ते कपडे परिधान करून आंत जाता येत नाही. हॉटेल वर एक टेनिस कोर्ट व हेलीपॅड पण आहे. बुर्ज अल अरब शेजारी वाईल्ड वादी नांवाचं मोठं वॉटर पार्क आहे, ज्यांत बर्याच वॉटर राईडस आहेत. त्याचं तिकीट दि. १९५ [पुर्ण दिवस] व वर्षाची फी दि.२०००/- आहे. तेथे २४ राईडस आहेत, शिवाय ८ master blaster व 2 flow rides आहेत, ज्यांचा आनंद काही आगळाच आहे. जवळच दुबईचं प्रख्यात म्युसियम जुन्या अल फाहीद फोर्ट मध्ये आहे. 

पुढे गेलं कि पाम जुमेराह ही नव्याने झालेली वसाहत लागते. ती जमीन कृत्रिम बेटं बनवून [मुंबईच्या reclaimation सारखं] समुद्रांतून तयार केली आहे. या वसाहतीचा आकार पाम वृक्षा सारखा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अपार्टमेंट आहेत. पुढे गेलं की स्वतंत्र बंगले सुरु होतात. प्रत्येक बंगल्याला स्वतःचा बीच आहे. फारच सुंदर दृष्य. काय पैसा ओतलाय!!  नंतर लगेचच हॉटेल अट्लांटीसची भव्य इमारत दिसते. त्याचं मुख्य द्वार जबरदस्त आहे, मोठ्या राजाच्या महाला सारखं, जे बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या द्वारा पेक्षा मोठं आहे. ते हॉटेल च्या खाजगी बीच साठी आहे. तो बीच देखील २-३ कि.मी चा असेल. हॉटेल मध्येच वॉटर पार्क आहे ज्याचं पूर्ण दिवसाचं तिकीट दि.२५० आहे. तसंच आतील मत्स्यालयाचं तिकीट दि.१०० आहे. हॉटेल मध्येच मोठा मॉल आहे. त्याचं इंटीरीयर प्रेक्षणीय आहे, डोळे दीपविणारं आहे. किती तरी दुकानं! एक art of sand चं दुकान नवीन होतं. निरनिराळ्या आकाराच्या कांचेच्या बाटल्यांमध्ये रंगीन वाळू भरुन त्यांतून चित्र तयार केलेली असतात. त्या अर्धा ते एक फूटाच्या बाटलीची किंमत १०००-१५०० दिरहाम आहे. आपण नुसतं पाहायचं व पुढे जायचं. हॉटेल ची मोनो रेल सेवा आहे, त्यांतून तुम्ही पम जुमेराहची ३० मि. ची सैर करु शकतां.

दुबई मॉल हा पुन्हां जगांतील सर्वांत मोठा मॉल आहे विस्ताराप्रमाणे. तसेच त्यातील फूड कोर्ट पण जगांत सर्वांत मोठं आहे. सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ तेथे मिळतात. बसायला पण खूप मोठी जागा. मॉल मध्येच Ice skating rink  आहे. आहे नं आश्चर्य? ५० डीग्री तापमानांत कृत्रिम बर्फ! इतकी मोठी रींक व ती पण सतत मेंटेन करणंसोपं आहे कां ! आंत मत्स्यालय पण आहे, ज्यांत १० मीलीयन लिटर पाण्यांत ३३००० प्रकारचे समुद्री जीव-वनस्पति आहेत. आंतील रस्ता असा आहे कि आपण दोन्ही बाजुला व डोक्यावर पण कांचेतून मासे पाहू शकतो अगदी शार्क पर्यंत. किती निरनिराळे प्रकार, रंग, आकार ! देवाची करामत पाहून मति गुंग होते. मानवाची पण कमाल आहे, दाद द्यावीशी वाटते. मॉल ऑफ इमिरेटस मध्ये Ski Dubai आहे, जेथे सोनमर्ग-गुलमर्गला करतो तसं बर्फावर स्कीईंग करता येतं. बर्फाने झाकलेले कृत्रिम डोंगर, झाडं.  आंत जाण्यासाठी वेगळा ड्रेस मिळतो. आपण बाहेरून कांचेतून सर्व पाहू शकतो. खरच दुबईच्या शासक शेखला सलाम करण्याचं मन होतं! त्याशिवाय बरजुमान मॉल, इबिन बटूटा सारखे कितीतरी मोठे मोठे मॉल्स आहेत. सर्वांची आंतील सजावट वेगवेगळी, प्रत्येकाची कांहीतरी विशेषता. इबिन बटूटा मध्ये २१ सिनेमा पडद्यांचे grand megaplex  आहे. तसेच चीन, भारत, पर्शिया,इजिप्त अशा नावांचे कोर्टस बनविले आहेत.

नंतर दुबईची मेट्रो ट्रेन- नवीनच झाली आहे. सर्व स्टेशनं फारच सुंदर-स्वच्छ-चकाचक. ५ डब्यांच्या या ट्रेन मध्ये वाहक नाही. तसेच स्वयंचालित सिग्नल प्रणाली आहे. ती सरसरी १०० कि.मी या वेगाने धावते. अंदाजे प्रत्येक १.५ कि.मी अंतरावर स्टेशन आहे. रेड लाईन हा रुट ५२.१ कि.मी चा आहे, ज्यासाठी १ तास १२ मिनीटं लागतात. पैकी ४.७ कि.मी रुळ जमिनीखाली आहेत. एकूण २९ स्टेशन पैकी २४ ऊंचावर, १ जमिनीवर व ४ भूमिगत आहेत. पूर्ण ट्रेन मध्ये एकावेळी ६४३ प्रवासी बसू/उभे राहू शकतात. ग्रीन लाईन हा नवा रुट तयार होत आहे, ज्यांत २० स्टेशनं- पैकी १२ ऊंचावर व ८ भूमिगत असतील. गेल्या ६ महीन्यांत ८०००० प्रवासी दिवसाला ट्रेन चा उपयोग करीत आहेत. ९९% वेळेवर धावते. ट्रेनमधून प्रवास करतांना दुबईतील प्रख्यात शेख झयेद रोडच्या skyline चं विहंगम दृष्य पाहावयास मिळतं.

दुबई दर्शन आपण बोटीने [cruise] ने घेऊ शकतो, ज्यांत रोमॅंटीक वातावरण, सूर्यास्त, संगीत, डान्स, जेवण, रात्रीचं दुबई दर्शन- अगदी अविस्मरणीय अनुभव. तिकीट दि.१५० फक्त. तसेच ४० मिनीटांची हेलीकॉप्टर राईड पण आहे, ज्यातून दुबईचा bird’s eye view  बघायला मिळ्तो. तेव्हां लक्षांत येतं कि तेथील शासनाने रणप्रदेशांत काय कायापालट केली आहे ते ! दूर दूर पर्यंत दिसणारे हिरवेगार गोल्फ कोर्सेस पाहीले की आपण वेडावून जातो.

डेझर्ट सफारी शिवाय दुबई प्रवास पूर्ण होत नाही. २२-५-१० रोजी आम्हाला ते  4×4  गाडीने रणप्रदेशांत घेऊन गेले, जेथे दूर दूर पर्यन्त वाळूशिवाय दुसरं कांही दिसत नाही. वाळू पण सोनेरी रंगाची, बारीक, चमकती, मऊ, हातांत ठेवली तर सरकून जाणारी अणि समुद्राच्या लाटांप्रमाणे पसरलेली. त्या लाटांवरून आपली गाडी तवेरा किंवा क्वालीस जाते , तेव्हां जीव मुठींत धरुन बसावे लागते. वाळूच्या डोंगरांच्या कडेवरुन गाडी तिरकी होऊन जाते[ की सरकते]  तेव्हां पोतांत गोळाच येतो. हा अनुभव प्रत्येकाने घ्यावाच. त्याला dune bashing म्हणतात. संध्याकाळी ते आपल्याला कॅंप साईट वर सोडतात. तेथे रणांतील सूर्यास्त पाहण्याची मजा कांही औरच असते. सूर्य लाल, त्यामुळे आकाशाची लाली व तसेंच वाळूची सोनेरी लाली– हा त्रिवेणी संगम आपल्याला कधी अनुभवायला मिळणार !! कॅंपवर sand boarding, desert scooter ride , camel ride इत्यादि खेळ आपण करु शकतो. शिवाय तेथे स्त्रियांसाठी मेहेंदी काढणे, पुरुषांसाठी शिशा [ arebic water pipe- एक प्रकारचा हुक्का ] असतो. युएईचा राष्ट्रीय पक्षी फाल्कन [ ससाणा-बाज पक्षी] हा आहे. तो आणून आपण हातावर बसवू शकतो. मग खाणं-पिणं चालु होतं- शाकाहारी-मांसाहारी. बारबेक्यु पण असतं, आणि मग बेले डान्स. अरबी गाणं समजत नाही पण कर्णप्रिय मात्र वाटतं. हे सर्व camp fire च्या आजुबाजूला चंद्र प्रकाशांत– नुसत्या कल्पनेनं पण मन सुखावतं ना !. शिवाय गिफ्ट शॉप व सॅंड आर्ट चं दुकान तर खरंच. रात्री तेथे राहण्याचा कार्यक्रम पण होऊ शकतो. तंबू मध्ये १००१ अरेबियन स्टार्स खाली रात्रीच्या थंडगार हवेत झोपण्याची कल्पना कशी वाटते ?

रणप्रदेशांत सुद्धा त्यांनी अल ममझर पार्क, क्रीक साईड पार्क,मुशरीफ पार्क, जुमेराह बीच पार्क सारखे किती तरी बागबगीचे तयार केले आहेत. सर्व मोठे मोठे आहेत अगदी १२४ हेक्टर जमिनी पर्यंत. त्यांत तलाव, सरोवर, दाट झाडी, मुलांसाठी खेळण्याची जागा, ऊंट-तट्टू सवारी, कारंजी, जॉगींग ट्रॅक, केबल कार, स्विमींग पूल इत्यादी सर्व सोयी केलेल्या आहेत. हे पाहून दुःख होतं की आपल्या भारतांत निसर्गाने मुक्तहस्ताने देऊन सुद्धा आम्ही सांभाळु शकत नाही.

दुबईंत बिग बस या खाजगी कंपनीच्या लाल रंगाच्या open- roof top  नाही अशा डबल देकर बसेस मधून पण फिरतां येतं. कुठेही बसा व उतरा, पुर्ण दिवसाचं एकच तिकीट. दुबईच्या पब्लीक  ट्रान्सपोर्ट मध्ये साधी बस, डबल देकर व जोड बस [ articular bus ]  आहेत. त्या खूपच सोईस्कर व आरामदायक आहेत. बस बरोबर बस स्टॅंड पण ए.सी. आहेत.

दुबई विषयी म्हंटलं जातं की येथे पूर्व पश्चिमेला भेटते. कोणीतरी खरंच सांगितलं आहे की,  visionery leadership of Dubai’s ruling Al Makatoum family  has transformed it from a small fishing village into a modern vibrant city full of surprises….. Dubai is all about SEA, SAND, SUN & SHOPPING.

                                                                                                                                               विलास भोंडे

                                                                                      १०-९-२०१०

burj khalifa and other skyline from shaikh zayed road

 

Dubai creek and Bar Dubai station of Abra

 

Hotel Atlantis-- gate and own beach


Responses

  1. फोटो खूब सुन्दर आहेत व सम्पुर्न लेख अतिशय चंगला लिहला आहे, मला खूप आवडला.

  2. Excellent rejoinder. Thanks.

  3. tHANKS FOR THE SPLENDED PHOTOS, I HAVE MISSED OPOTUNITY TO SEE ALL THIS WHEN MY SON WAS IN DUBAI. LETS HOPE TO VISIT ONCE IN LIFETIME


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: