Posted by: vmbhonde | ऑक्टोबर 4, 2010

माझी शारजाह वारी – २ [ अबुधाबी व इतर ]

grand mosque, Abu Dhabi

 

inside the mosque

 

heritage village, Abu Dhabi

 

Hatta Dam

 

tree of khajur

 

माझी शारजाह वारी –   [ अबुधाबी इतर ]

शारजाह हून पूर्वेकडे गेलं की अल धैद या गांवी फळ-भाज्यांची शेती/ बागा आहेत. सर्वत्र मधून मधून हिरवगार वातावरण पाहायला मिळतं. नंतर मसाफी व पुढे फोटो काढावे अशा डोंगररांगा पार करुन डीब्बा या लहान बंदरा पर्यंत जाता येतं. तेथे मासेमारी हा मुख्य धंदा आहे. रस्त्यांत मेंढ्यांचे कळप रस्ते क्रॉस करीत असतात. रस्त्याच्या कडेला बाजार भरलेला असतो. तेथे फळं, भाज्या, नर्सरीची झाडांची रोपं यापासून लाकडी-मातीच्या कोतरणी केलेल्या सुंदर वस्तु व मोठी कार्पेटस पण मिळतात. अल बदियाहला इमिरेटस मधील सर्वांत जुनी मशिद जी १४४६ एडी मध्ये बांधलेली, ती आहे. फुजीराह [हे पण एक छोटं राज्य-इमिरेटस आहे ] ला हल्ली नवीनीकरण केलेला जुना भुईकोट किल्ला आहे, जो पोर्तुगीज लोकांनी १६७० मध्ये बांधला होता. फलाज अल मौला सारख्या काही जागा-गांवं आहेत जेथे शेतीलायक जमीन आहे. तेथे आपल्याला शेती, फळ, भाज्या होतांना दिसतात. पुढे डोंगरांत लपलेल्या वादी [dry river bed ] पाहायला मिळतात.

अल एन शहराला गार्डन सिटी पण म्हणतात. अबुधाबी या राज्यांतील हे गांव जेथे युएई मध्ये सर्वांत जास्त हिरवळ दिसते. जातांना रस्त्यांत रणप्रदेशांतील दृष्य पहात हजार डोंगर रांगांच्यामधून आपण अल एन ला पोहोचतो. तेथे युएई तील सर्वांत मोठा ऊंटांचा बाजार आहे, जेथे पूर्ण गल्फ विस्तारांतून ऊंटांच्या खरेदी-विक्री साठी लोकं येतात. शहरांत नविनीकरण केलेला शेख झयेद यांचा जुना राजमहाल आहे. तेथे पॅलेस म्युझियम, नॅशनल म्युझियम, हील्ली गार्डन्स [ पुरातत्व विज्ञानासाठी प्रसिद्ध आहे], सुलतान कील्ला इ. पाहण्यासारख्या जागा आहेत. तेथील प्राणी संग्रहालय पण प्रख्यात आहे, ज्यांत रणातील गरुड पक्षी [जो स्वतःची मान २७० डीग्री पर्यंत वळवतो], पांढर्या सिंहांची जोडी, जिराफ, झेब्रा, शाहमृग, पाणघोडे असे ४३०० प्राणी आहेत. जवळच जबेल हफीत हे १२४० मीटर ऊंचीचे डोंगर शिखर आहे. शिखरावर फार मोठं पठार जेथून सूर्यास्त पाहण्याची फार मजा येते. मला स्वतःला सूर्योदय व सूर्यास्त पाहणं भयंकर आवडतं, मी तेथे तासनतास बसून राहू शकतॉ. लोकं तेथे पठारावर गाड्या घेऊन येतात, संगीत,नाच, बर्बेक्यु वर खाणं असा कार्यक्रम करतात. डोंगराच्या पायथ्याशी मिनरल स्प्रिंग [गरम पाण्याचे झरे-कुंड] आहेत.

एकदा आम्ही हत्ता या गांवी गेलो. ते हेरीटेज विलेज म्हणून सांभाळलं जातं, जे १६व्या शतकापासून हत्ता वादीच्य किनार्या वर वसलेलं आहे. पर्वताळ विस्तार, मधून हिरवी शेतं -झाडं पहात आम्ही एका छोट्या डॅम-धरणावर पोहोचलो. आपल्या येथील धरणांच्या मानाने पाणी अगदी कमी. पण सर्व बाजूंनी डोंगरांच्या मध्ये अडविलेलं पाणी युएई मध्ये पाहायला आवडलं. स्थळ फार भव्य वाटलं, दृष्टीसुख देणारं होतं. तसंच फुजिराह जवळ कोरफोकान नांवांचा समुद्र किनारा पण सुंदर आहे. रास अल खैमा व उम अल क्वैन ह्या दोन राज्यांत प्रेक्षणीय असं काही आढळलं नाही.

आतां राहीलं होतं अबुधाबी. हे युएईचं राजधानीचं शहर आहे. येथील शेख हे युएईचे राष्ट्रप्रमुख असतात. अबुधाबीला तेलाचे पैसे चांगले आहेत, त्यामुळे सर्वांवर यांचं वर्चस्व राहतं. अबुधाबीला अरेबियन ज्वेल पण म्हणतात. दुबई हून जातांना रस्त्यांत जबेल अली हे जगांतील सर्वांत मोठं मानवनिर्मित बंदर लागतं. युएई मधील सर्व हायवे वर रात्री लाईट असते. तसंच रस्त्याच्या कडेला तर कुठे मध्ये डीव्हायडर वर लॉन-हिरवळ तयार केलेली आहे. झाडांना पाणी टाकायला टपक पद्धति प्रमाणे मैलो न मैल लांब काळी प्लास्टीक ट्युब कायमची टाकलेली आहे.त्यांतून झाडांना पाणी मिळत राहतं. अबुधाबीचं वर्णन एकाने ” well laid out roads, surrounding lush greenery, beautiful parks, rows and rows of trees ” असं केलं आहे.

शहरांत शिरलं की मुख्य आकर्षण grand mosque [ शेख झायेद मशिद ] आहे. संपुर्ण आरसपहाण- संगम्रवर ची इमारत. याला मध्यपूर्वेतील ताजमहाल पण म्हणतात. जगांतील सर्वांत मोठी मशिद सौदी अरेबिया मध्ये आहे. त्या खालोखाल ही दुसर्या क्रमांकाची मोठी मशिद आहे. ईस्लाम धर्मियांशिवायच्या लोकांना जगांत फक्त याच मशिदींत प्रवेश आहे. लांबूनच पांढर्याशुभ्र रंगामुळे याची भव्यता जाणवते. रात्रीच्या प्रकाश योजनेंत जास्तच खुलतं. तसंच पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशांत न्हायलेली ही मशिद पाहणं हे अनुभवण्याचं दृष्य आहे. येथेच शेख झायेद बिन सुलतान अल नह्यान, युएईचे राष्ट्रपिता, यांचं दफन केलेलं आहे. या इमारतीला ५७ घुमट आहेत, सर्वत्र semi precious stones- रत्न वापरली आहेत. भिंतीवर कलाकुसरीची कामं आहेत व सर्व दारं मोठ्या मोठ्या कांचेने तयार केलेली आहेत, पूर्वीच्या राजांच्या महालांत रंगकाम केलेल्या कांचा असयच्या नं, तशा ! आंतील भागांत मुख्य प्रार्थना खंडांत जगांतील सर्वांत मोठी कार्पेट , जी १२५० इराणी कारागीरांनी हाताने बनविलेली आहे व जिचं वजन ४७ टन आहे, ती अंथरलेली आहे. नक्षीकाम, रंगसंगती, कार्पेटची जाडी व मऊपणा पाहून मन थक्क होतं. हे शेख झायेद म. गांधींना मानत असत. त्यांना येथील लोकं तारणहार मानतात कारण त्यांनीच युएई मध्ये ७ इमिरेटस-राज्यांना एकत्र आणलं.

तेथून पुढे आलं की लक्षांत येतं की अबुधाबी हे दुबई-शारजाह पेक्षा मोकळं आहे. मोठे मोठे लांब सरळ रस्ते, बाजूला हिरवळ, झाडं. रस्ते सुद्धां समांतर व एकमेकांना छेदणारे. गुजरातची राजधानी गांधीनगरची आठवण झाली मला येथील सेक्टर व स्ट्रीट पाहून. अबुधाबी हे बेट आहे. त्याला घेरून दुसरी पण यास, सादीयात, रीम, लुलु, सुवा, बिसरात, फहाद या नांवांची बेटं आहेत. सर्व बेटं हळु हळू विकसित होत आहेत. मग आम्ही मोठ्या कॉर्निश वर गेलो जे पोर्ट झायेद पासून हॉटेल इमिरेटस पॅलेस पर्यंत आहे. दोन्ही टोकांवरून अबुधाबीची skyline फार सुंदर दिसते. इमिरेटस पॅलेस हे जगांतील सर्वांत जास्त महाग हॉटेल आहे, जेथे आपले अमिताभ बच्चन, शाहरुखखान सारखी मंडळी राहतात. तांबड्या दगडांचं बांधकाम असलेलं हे हॉटेल gold plated आहे. मोठं कारंजं व भव्य घुमट हे पण येथील वैशिष्ट आहे. मागे हॉटेल च्या अतिथींसाठी १.३ कि.मी चा बीच आहे, ज्यावरील वाळू पूर्णपणे अल्जेरीयाहून आयात केलेली आहे. जवळच युएईच्या राष्ट्रप्रमुखांचा भव्य पॅलेस आहे, त्याला पण स्वतंत्र मोठा बीच आहे. पोर्ट झायेद जवळ ” हेरीटेज विलेज ” या नांवांने युएईच्या जुन्या लोकांची राहणी करणी जपून ठेवली आहे. त्यांच्या तेलामुळे आलेल्या समृद्धीच्या आधीचं जीवनाचं चित्र  तेथे उभं केलं आहे उदा. जुनी विहीर, पाणी पुरवठा पद्धति, जुने हुक्के, बोटी, तलवारी, घरं, जाड्या काठ्यांची दारं, एसी च्या ऍवजी घर थंड ठेवण्या साठीचे वार्याचे मिनारे इ.इ. त्यांचा जेमतेम २-३०० वर्षांचा इतिहास जपण्यासाठी ते किती प्रयत्न करतात आणि आपण राम-कृष्ण हा आपला इतिहास नाही असे म्हणतो.

अबुधाबी मध्ये १ दिरहामच्या तिकीटांत कुठेही बस प्रवास करतां येतो. येथे पण मोठे मोठे मॉल्स आहेत, पैकी सर्वांत मोठा मरीना मॉल. शिवाय अबुधाबी मॉल जेथे ४ मजले, ९ सिनेमा पडदे, संगीत कारंजी, २२० पेक्षा जास्त दुकानं आहेत. येथे दुबई सारख्या मोठ्या-ऊंच इमारती नाहीत. कॅपिटल गेट ही नवी ईमारत  लीनींग टॉवर ऑफ पिझा [इटली] पेक्षा जास्त झुकलेली आहे, तेव्हां भविष्यांत ते आठवं आश्चर्य म्हणून सांगितलं जाईल. कांही ठीकाणी कार पार्कींगचा फार त्रास होता. ते पाहून भारताची आठवण आली, कुठेही कशीही गाडी पार्क केली आहे. दुसरा पाहण्यासारखा अल हुस्न पॅलेस, जो अठराव्या शतकांत बांधलेला आहे. अबुधाबी दर्शन हेलीकॉप्टरने पण करतां येतं ज्याचं तिकीट दि. ५०० आहे.

मला वाटतं पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक ती माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांपैकी कोणाला आणखी काही विचारपुस करायची असेल, जास्त काही सांगायचे असेल तरी सर्वांचं स्वागत आहे.

इतक्या छोट्या छोट्या शेखांनी लोकांसाठी केलेल्या सोयी पाहून त्यांना सलाम करण्याचं मन होतं. आपले राज्यकर्ते केव्हां शिकतील ? शेख श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे खूप पैसा आहे, पण त्यांतील थोडातरी लोकांसाठी वापरावासा त्यांना वाटतो. येथे आम्ही स्वतःचेच खिसे भरण्याचे प्रयत्न करीत आहोत. आपला तर अल्लाह मालीक आहे ! !

                                                                                                     विलास भोंडे

                                                                                                         १०-९-२०१०


Responses

 1. Nice pictures.I could read it and understood most of it.It appears good description.

 2. Dada,
  Excellent information, looks like a professional travelogue or diary.
  Nice to know sch small relevant information beautifully interwoven in the prose.
  I need to learn atleast 1% writing skill from you & start my travel diary.
  Best regards,
  Hitesh


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: