Posted by: vmbhonde | ऑक्टोबर 2, 2010

माझी शारजाह वारी – २ [ शारजाह ]

greenery

 

sharjah cornische

sharjah fort

 

माझी शारजाह वारी –    [ शारजाह ]

गेल्यावर्षी माझी शारजाह वारी मध्ये आपण शारजाह, दुबई व एकंदर  युएई ची भौगोलिक, सामाजिक, राजकीय इ. माहिती पाहीली. मुलगा तेथे असल्याने यावेळी परत जाण्याचा योग आला, तेव्हां विचार केला की आता पर्यटनाच्या दृष्टीकोनांतून कांही लिहावं व त्याप्रमाणे हा लेख प्रस्तुत करीत आहे. मी कांही सिद्धहस्त लेखक नाही, त्यामुळे भाषा सौंदर्य, कल्पनाविलास, उपमांचं पीक इत्यादी सर्व कदाचित आपणांस पाहावयास नाही मिळणार. पण एक सामान्य माणूस म्हणून युएई कसं दिसलं, काय काय पाहीलं त्याची नीट व्यवस्थित माहीती सर्वांना व्हावी म्हणून हा प्रयत्न. आशा आहे, आपण सर्व तो गोड मानून घ्याल. 

तर मुलगा[प्रसाद]-सुनेच्या[कल्याणी] आग्रहानूसार आम्ही दोघं, मी व सौ. वृषाली[पत्नी] १२-३-२०१०  रोजी स्थानिक वेळ सकाळच्या ११.३० वाजतां दुबई विमानतळावर उतरलो. विमानांतून बाहेर येण्यास केव्हढं चालावं लागतं, म्हणा सरकते पट्टे आहेत. पण विस्तार फार मोठा, त्यामुळे फार लांब वाटतं. सर्व सोपस्कार पार पाडून सामान घेऊन बाहेर आलो, मुलगा व नातू[सोहम] घ्यायला आले होते. नातू ३ वर्षांचा पण पूर्ण नाही, त्यामुळे आम्हाला बरेच दिवसांनी पाहून थोडा लाजला. विमानतळ किती मोठा, संपूर्ण ए.सी! टर्मिनल १-२-३. जगांतील सर्वांत मोठ्या विमानतळांमध्ये दुबईचा समावेश होतो. टर्मिनल १ वर सर्व मोठ्या फ्लाईटस, २ वर लो कॉस्ट व ३ वर इमिरेटस च्या फ्लाईटस. तेथे एक सुंदर अरबी घोडयाचं शिल्प आहे. पाण्याचे कृत्रिम धबधबे दृष्टीसुख देत होते. त्यावेळी जास्त फ्लाईटस नव्हत्या, त्यामुळे सर्व रीकामं रीकामं वाटत होतं. कुठेही गर्दी, गडबड- गोंधळ नाही. लांब लाईन, पण सर्वजण शिस्तीत उभे होते. तेथील अरबी माणसं थोडं थोडं हिंदी बोलतात, त्यामुळे इंग्रजी न येणार्यांना पण तितका त्रास नाही. शिवाय विमानतळावर बरेंच भारतीय पण नोकरीला आहेत. टर्मिनल १ व ३ ला मेट्रो ट्रेन चं connection आहे, आपण सरळ स्टेशन वरच उतरतो, त्यामुळे कार नसलेल्यां साठी अगदी सोईस्कर आहे. टर्मिनल १ वर जगप्रसिद्ध सर्वांत स्वस्त duty free shop आहे.

आम्ही टॅक्सीने घरी पोहोचलो. शारजहतील रोल्ला या विस्तारांतच प्रसादने नवं अपार्टमेंट[2 BHK] भाड्याने घेतलं आहे. गेल्यावेळी आलो होतो ते घर लहान होतं, हे मोठं आहे, मोकळ आहे, centrally A.C आहे. २४ तास सिक्युरीटी. ९ च मजले व प्रत्येकी ६ फ्लॅटस, तरीही २ लिफ्ट. एकंदर चांगलं वाटलं.

संध्याकाळी मी सोहमला घेऊन फिरायला निघालो, बागेकडे. बाग म्हणजे हिरवळ- lawn.  थोडी खजुरीची झाडं, पण खुप मोठ विस्तार, landscape करुन टेकडी सारखं– त्यावर फुलझाडं अशा आकारांत लावलेली आहेत की आपण वाचू शकतो ” SMILE, YOU ARE IN SHARJAH “. इंग्रजी व अरबी दोन्ही भाषेत हे लिहीलेलं आहे. मला ही कल्पना आवडली. स्वतःच्या गांवाविषयी असं लिहू शकणं, आपल्या येथील शहरांसाठी कठीण वाटतं नं! या रण प्रदेशांत इतकी हिरवळ पाहून आश्चर्य वाटतं. म्हणतात, त्यांनी माती व हे हिरवळीचे पट्टे आयात केले आहेत. मुख्य म्हणजे नंतर त्याची निगा ठेवणं, सांभाळ घेणं फार महत्वाचं, जे ते नीट करतात. मोठा विस्तार असल्याने तेथे बरेच कामगार वर्गांतील लोकं येतात. बरेच अविवाहित व forced bachelor आहेत. मल्याळी, हिंदी, गुजराती, मराठी, उर्दु, बंगाली, फिलिपिनो अशा बर्याच भाषा ऐकू येतात. कारण हा सर्व कामगार वर्ग भारत[मुख्यत्वे केरळ], पाकीस्तान, बंगलादेश व फिलीपीन्स येथील आहे. त्यांच्यासाठी ही भेटी- गांठीची जागा- meeting place आहे. त्यांच्या गप्पा, पत्ते खेळणं, लहान वयाच्या लोकांचं फूटबॉल खेळणं, काहींचे व्यायाम इ. सर्व प्रवृत्ति होत असतात. माझ्यासारखे बरेच आजी आजोबा नातवंडांना घेऊन येतात. मग त्यांचे बॅट बॉल, सायकली सर्वच येतं. नातवंडांचं खेळणं व आमच्या गप्पा असाही कार्यक्रम होतो. वातावरण मस्त असतं. एका बाजुला सतत वाहणारा शारजाह- दुबई हा रस्ता तर दुसर्या बाजुला central souq च्या २ विशिष्ट आकाराच्या इमारती – इन्डस्ट्रीयल इस्टेट मध्ये बसक्या अर्धगोलाकार शेडस असतात ना तशा. पण त्यावर कोरीव काम किंवा चित्र काम केलेलं असावं असं वाटणार्या टाइल्स लावलेल्या, त्यामुळे त्या सुंदर दिसतात. रात्री दिव्यांची रोषणाई केली जाते, त्यामुळे त्याचं सौंदर्य आणखी खुलतं. तिसर्या बाजूला एक मोठी भव्य मस्जिद व चौथ्या बाजूला उंच उंच इमारती. माझ्या ३ महिन्यांच्या वास्तव्यांत मला जेव्हा वेळ मिळाला, मी येथे येत असे.

अजून येथे गर्मी सुरु झालेली नाही. एप्रिल अखेर पर्यंत जास्तीत जास्त ३०/३१ डीग्री इतकं तापमान असतं, रात्री ए सी नसेल तरी चालतं, काही वेळा तर आम्हां म्हातार्यांना पांघरुण घ्यावसं वाटायचं. जुलै ते सप्टेंबर मात्र खूप गरम असतं, अगदी ५० डीग्री पर्यंत . मी सकाळ – संध्याकाळ फिरायला जात असे, कधी एकटा, तर कधी सोहमला घेऊन. वेगवेगळ्या दिशेला जाऊन निरनिराळे रस्ते- विस्तार पाहात असे, मला आवडतं नव्या ठिकाणी फिरायला. रस्ते रुंद, विस्तार स्वच्छ, त्यामुळे फिरायला चांगलं वाटे.

शारजाहला Pearl of gulf [ गल्फचा मोती ] म्हणतात, तसेंच UN तर्फे त्याला Heritage city चा दर्जा मिळाला आहे. शारजाहला UAE ची सांस्कृतिक राजधानी पण म्हणतात व म्हणून तेथे दारुबंदी आहे. येथे किंग फझल मशिद, जी UAE मधील एक मोठी मशिद आहे, शारजाहचा दुरुस्ती केलेला भुईकोट किल्ला जो येथील राज्य करणार्या शेखचं घर होतं आणि जो १८२० मध्ये बांधला  होता तेथेच आता हेरीटेज म्युझियम [बेट अल नबूदाह] आहे. त्याशिवाय सायन्स म्युझियम, मत्स्यालय, अरेबियन वाईल्ड लाईफ सेंटर, आर्कियोलोजी म्युझियम [ज्यांत अश्म/ताम्र युगांतील अवशेष आहेत], नॅचरल हिस्ट्री म्युझियम व डेझर्ट पार्क हे सर्व पाहण्यासारखे आहे. रण प्रदेशांत हिरवळी साठी, डोळ्यांना थंडावा देण्यासाठी अल जजीरा व अल कसबा हे २ amusement and  theme parks  आहेत. खरेदीसाठी सूक [बाजार] अल अरसा, अल मरकाझि, मजारा इ. आहेत, जेथे कार्पेट चा खजिना, दागदागिने व हस्तकलेच्या वस्तु मिळतात.

१९-३ ला आम्ही सर्वजण बुहेरा कॉर्निश[खाडीचा किनारा] ला गेलो. मानव निर्मित मोठी खाडी जिचा परीघ ६/७ कि.मी असेल, खूप सुन्दर प्रकारे सांभाळलेली, सर्व बाजुंनी संपुर्ण बांधलेली, किनार्याला कठडा, बाजूला चालायला/ जॉगींग साठी जागा-ट्रॅक, नंतर कार पार्कींग व रस्ते. येथे पण पुन्हा सर्वत्र हिरवळ, खजुरीची झाडं, फुल झाडं, निरनिराळ्या रंगाची फुलं- सदाफुली[बारमासी] व रणांतील गुलाब. फार मस्त दृष्य. रेलिंगला टेकून उभं राहीलं कि लांबच लांब पर्यंत पाणी, समोर  शारजाह स्कायलाईन, साधारणतः सर्व इमारतींना बाहेरून कांच. त्यामुळे संध्याकाळी सुर्यकिरणांचे परावर्तन होऊन पाण्यांत प्रकाशाचा लोट उठतो, ते दृष्य फारच सुखकारी होतं. किती फोटो काढु  असं होत होतं. पाण्यांत नौका प्रवास होऊ शकतो. किनार्यावर ३-४ चाकी सायकली भाड्याने मिळतात, ज्यावर लहान मुलांबरोबर मोठे पण बसु शकतात. म्हणून मी पण लहानपण अनुभवलं. एका किनार्याला अल जजीरा पार्क, ज्यांत भरपुर झाडी-वृक्ष, अगदी सावली देऊ शकतील, वड-पिंपळ सुद्धा. भरपूर हिरवळ. मुलांसाठी तेथे जायंट व्हील वगैरे पण आहे. साधारणतः लोकं घाण, कचरा कमी करतात, पण तरीही साफ सफाईला बरीच माणसं असतात, अगदी दिवसभर. दुसरं कॉर्निश बांधलं जातंय जेथे वॉटर स्कूटर्स सारखे पाण्यांतील खेळ खेळले जातात.

दुसर्या दिवशी जवळच एक कॅनॉल- अल कसबा येथे फिरायला गेलो. तेथे मानव निर्मित कॅनॉल वर मुलां साठी खेळायला, खाण्यासठी होटेल्स, फिरण्यासाठी रस्ते, हिरवळ इ. आहे. Eye of Emirates या नांवाने जायंट व्हील आहे. त्यांत बसून दुबई पर्यंतचं दृष्य पाहतां येतं. त्याची कॅबिन्स A.C. आहेत. जवळच Musical Lighting Fountains  आहेत. रात्री संगीता बरोबर छोटी-मोठी कारंजी पाहण्यास मजा येते. कालव्याच्या शेजारी बसायला जागा, खायला बरीच होटेल्स-रेस्टोरंटस. मस्त वाटलं.

एकदा सिटी सेंटर या मॉल मध्ये खरेदीला गेलो. येथे येऊन नव्या व्याख्या कळल्या. डीपार्टमेंटल स्टोर, त्याच्या पेक्षा मोठं सुपर मार्केट,  नंतर हायपर मार्केट व सर्वांत मोठा मॉल. मॉल मध्ये बरीच दुकानं, मुलांसाठी मॅजिक प्लानेट, सिनेमा थिएटर्स, फुड कोर्ट व एक हायपर मार्केट असतं.

आम्ही जेथे राहतो त्या रोल्ला विस्तारांत दुसर्या विश्वयुद्धांत इंधन घ्यायला अमेरीका-इंग्लंड ची युद्ध विमानं उतरत होती असं म्हणतात. जवळच शारजाह बीच व नंतर अजमान [ हे दुसरं लहान इमिरेट आहे ]  बीच आहे. यु ए ई मध्ये सर्व मोठी गांवं-शहरं समुद्र किनार्या वर आहेत, त्यामुळे सर्वांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळलेले बीचेस आहेत. बहुतेक ठीकाणी निळं स्वच्छ पाणी. समुद्र किनार्या वर भारतीय-पाकिस्तानी माणसं-कामगार वर्ग खूप येतो. त्यांच्या साठी हे एक फिरायचं-विरंगुळ्याचं स्थान आहे. रस्त्याला लागून खाजगी बोटी कार सारख्याच पार्क केलेल्या असतात. सर्व ठीकाणी बांधलेला कांठ-कट्टा, खजुरीची झाडं, लांबलचक लॉन, मुलांना खेळायला जागा. छान वाटतं.

                                                                                                                                                                                                                                               विलास भोंडे

                                                                                                                                                                                                १०-९-२०१०


Responses

  1. Vilas Rao,
    Chaan!!!!!! Atishay sadhya bhashet jagan baddal khupach upayukt mahiti dili aahe.Prayanat kautukaspad aahe.
    Pudhe hi likhan chalu theva.
    Best Wishes
    Suhas


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: