Posted by: vmbhonde | सप्टेंबर 30, 2010

पु.लं.चे विनोद !

१)त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे आणि
सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले “बाकी काही म्हणा, पण
मुलीने घराण्याचे नाव राखलं हो”.

२)माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत वाचली. त्यात
त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न ठरल्याची बातमी
कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले ‘हिने तर वर्मावरच घाव घातला’ .

३) वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,
तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली, “हा मझा
मित्र शरद तळवलकर”
“हो का? अरे व्वा!” पु.ल म्हणाले होते, “चांगला मनुष्य दिसतो! नव्हे, हा
चांगलाच असरणार!” “हे कशावरून म्हणतोस तू?” वसंतरावांनी पु.लं. ना
विचारलं. “अरे, याच्या नावावरून कळतेय ते!” पु.ल. म्हणाले. याच्या नावात
एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही. म्हणजे, हा माणूस सरळ
असणारच!”

४) पु.लं.च्या “उरलंसुरलं” ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद – ” मित्रा
कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा आवाज लगेच खाली
आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे भडकून मोठ्याने आवाज
चढवला की आपण इथनं फक्त, ‘ प्लीज जरा मोठ्याने बोलता का? ‘ असं म्हणायचं
की तो आऊट. दोन वाक्यात आवाज खाली येतो की नाही बघ.”

५) पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखविणारा आहे. ते पंधरा
वर्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चि. केळकराचं
व्याख्यान होत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा
होती. त्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा
चालु होती. शाळकरी पुरषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन
फेडरेशन स्वीकारावं, की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला. त्यावर
तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. “स्वीकारू नये, पण राबवावं” यावर पुरुषोत्तम
म्हणाला, “मला आपलं उत्तर कळलं नाही.” तेव्हा समजावणीच्या सुरात ते
म्हणाले, “बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा.”
ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला, “पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे”
तात्यासाहेबांच काही उत्तर
येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं.

६) एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.
बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. “तुमच्या घरी काय, तुम्ही आणी
सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार”. ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना
म्हणाले. “तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय
आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?”

७) पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या
जातात. ‘आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात
विविध
क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती. समोरच्या पंगतीत
‘किर्लोस्कर’ मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते. मधुनच ते
उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत
येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच
उद,गारले, “मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये.”

८) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं.
यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला. ते
म्हणाले,”रेडिओवरच्या मराठीतीन ‘अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल’ असं मी
जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना! आता
कळलं. ‘सुत्र’ हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही
माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं
असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती
‘मंगळसुत्रा’कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!”

९) माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका. एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ
त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही
मुलाखात ऎकत होते.
हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना,
त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, “तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी
कुठं झाली होती?”
लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ
करीत होत्या. ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं
म्हणाले, “अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या ‘वर्मा’वर नको रे बोट
ठेवुस!”

१०) कोल्हापूर आणी तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या
मर्मबंधातील ठेव. कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सागंताना
ते म्हणाले, ‘इथे रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगर्याच्या नंगारा
करतात. कोल्हापूरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या
छातीवर हात बडवायला लावील असं आहे. त्यानं शेतात ऊसं लावला’ याच इग्रंजी
रूपांतर इथल्या मुन्सफानं एकदा ‘ He applied U’S In his farm असं केलं
होतं आणि त्यावेळच्या शुध्दलेखनच्या नियमाप्रमाणं ‘यू’ वरती अनुस्वार
द्यायलाही तो विसरला नव्हता.

११) एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल.
चे ‘हसवणूक’ हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, ‘प्रिय ___हिस,
तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द
हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच___!’ त्यावर ही त्याची पत्नी
चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण
पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, ‘आपल्याकडे नवर्यानं
पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं
मिस्टर!”

१२) नवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे
शुध्दलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडाळात घाटत होतं. त्यावर
पु.ल. नी खालील छेद दिला, ‘मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं
मास्तर मुलांना शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, ‘पोरांनो लिवा.
कयाssssळs!’

१३) हिंदुह्र्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यानां काही कारणास्तव हिंदुजा
होस्पिटल मध्दे दाखल करण्यारत आले होते. ते ऎकताच पु.ल. उध्दारले,
‘त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता ‘गर्वसे कहो हम हिदंजा मे हे’ असं
लिहालया हरकत नाही.’

१४) साहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता.
पु.ल. ना आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असता- नांच
पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ‘ काय पडलं हो?’
‘नाटक दुसरं काय?’ पु.ल. उत्तरले.

१५) कोल्हापुरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी
एक मेत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सागंत
होती, काय सुदंर सुदंर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात., अप्रतीम
नमुने आणि सूदंर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की
दुसंर काहीच घालायला नको.’ हे ऎकत जवळपास असलेले भाई मीश्कीलपणे हळुच
म्हणाले, ‘खरं सागंतेस की काय?’ क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर
ऎत्रिणीचीं लाजुन व आमची हसुन मुरकुंडी वळली.

१६) ‘वॆद्यकातली एकच गोष्ट या क्रीकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती
म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चुर्ण व्हावे. गोट साफ.’ – इती पु.ल.

१७) एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले “हि मुलगी (सुनिताबाई)
म्हणजे एक रत्न आहे’. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले ‘म्हणुनच गळ्यात बांधुन
घेतलय!!

१८) एकदा आपली आणी सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की “मी
‘देशपांडे’ आणी ह्या ‘उपदेशपांडे”

१९) एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि
दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, “आफतच
आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!”

२०) एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता
देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या. सुनिताबाईंचा ‘सर्व काही जपुन
ठेवण्याचा ” स्वभाव माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली ” अगं,
एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?” त्यावर
पु.लं. पटकन म्हणाले “हो तर !! सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत
नाही … अंडी फुटतील म्हणुन !!!”

२१) पु.लं. चा वाढदिवस होता, एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने
त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला. पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले.
हे बघुन व्यापारी म्हणाला “काय राव, काय झाले येवढे”? पु.लं. म्हणाले,
“बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही” घरात हशा पिकला होता !

२२) एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला, तो त्याचां
चाहता होता. तो म्हणाला की माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक
ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही.
माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय. तर
पु.लं. म्हणाले “अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी
ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?”

२३) पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात
बांधून द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली “खोक्याचा चार्ज
पडेल”. त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), “अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?”

२४) एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी
त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर
बसतच त्या खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली. ओशाळलेले
प्रिन्सिपल पुलना म्हणाले, “माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या
सुतारांकडून नीट कामच होत नाही.” पुल मिश्किलीत म्हणाले, “अहो करवत (!)
नसेल”

२५) डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त
पु.लनी पाठविलेले पत्र. “आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा
महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा
दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता.”

२६) स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात,” मुलगी अगर
मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते
सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या
आहे”

२७) आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा
आपल्या पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले,” या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू
’उपदेश-पांडे’ आहेस.”

२८) भारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसीध्द्य विनोदी
कलाकाराची कन्या.त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणी दामू अण्णा तसे
दिसायला खास नव्हते!त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा
म्हणाले ” हि मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!”

२९) पु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले,
पु.ल. थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य नीर्मीती केली आहे. नंतर
त्यांच्या कडें बघत ते पुढे म्हणाले सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि
ल दोन्ही आहे,मग निर्मीतिस काय कमी?

३०) पुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले,” मी
कुठल्याही समारंभाला ‘बो’लावल्याशिवाय जात नाही.

३१) एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे
बघत ते म्हणाले,” आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!”

३२) पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला
पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातून उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा
पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून म्हणाले “अगदी बरोबर नाव
ठेवले आहे, भानुविलास!”

३३) ‘वाऱ्यावरची वरात’चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या
दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने
निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले…
‘प्रयोग संपेपर्यंत थांब!’ लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा
पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले
आणि प्रेक्षकांना म्हणाले, ‘उद्या याची ‘वरात’ निघणार आहे, पण तो आजच
‘वाऱ्यावर’ स्वार होऊन आला आहे’…आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट
केला.

३४) पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख
म्हणून कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे
निर्माते एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश
माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग . महात्मा
गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी
केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही
कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले “गांधाजींना मौन
प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू
नये.” यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.

३५) एकदा एक ‘कदम’ नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन
आले…..पु लं नि आशीर्वाद दिला ……. ‘कदम कदम बढाये जा’

३६) सुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू
असताना जेव्हा समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव
सुनीताबाईंना इंग्रजीत काही तरी सूचना करतात, हे ऐकून “पुलं’ म्हणतात,
“त्या गव्याला इंग्रजी समजत नाही म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात।’

३७) एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता.

’एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम
करताना दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या
स्वभावानुसार मी त्या शेतकराला विचारलं “काय हो शेतकरी बुवा, या झाडाला
कोणते खत घातले तर त्याला चांगले टॉमेटो येतील?” त्यावर तो शेतकरी चटकन
म्हणाला “या झाडाला माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच
येणार नाहीत कारण ते झाड वांग्याचे आहे।”

suhas patil” <surapasa@hotmail.com         7-8-2010

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: