Posted by: vmbhonde | मे 11, 2010

स्वामी श्री रामदेवजी महाराज – पतंजली योग पीठ

स्वामी श्री रामदेवजी महाराज – पतंजली योग पीठ

गेल्या १५ वर्षांत भारतभूमीने एक चमत्कार पाहीला आणि तो म्हणजे स्वामी श्री रामदेव बाबा. पुर्ण भारतवर्षाला ज्यांनी योगाचं अक्षरशः वेड लावलं, ते बाल ब्रह्मचारी , व्याकरण आयुर्वेदा बरोबर वैदिक  दर्शनाचे महान मनीषी आणि विद्वान ब्रह्मनिष्ठ संन्यासी आहेत. ते वेदांचे प्रकांड विद्वान , परम गौ भक्त , वितराग परम तपस्वी आणि पूजनीय अनासक्त संत श्री शंकरदेवजी महाराज यांच्या हस्ते संन्यास दिक्षा धारण केलेले आहेत. त्यांनी अष्टाध्यायी, महाभाष्य व दर्शन उपनिषद इत्यादि ग्रंथांचं शिक्षण गुरुकुळांत घेऊन हिमालयांत विचरण करीत गंगोत्रीच्या पवित्र गुहांमध्ये तपश्चर्या व ब्रह्माराधना द्वारा अध्यात्मिक शक्ति मिळविली. नंतर त्यांनी हरिद्वार मध्ये परम तपस्वी विद्वान आयुर्वेदाचे महान मनीषी शोधक आचार्य श्री बाळकॄष्णजीं बरोबर १९९५ मध्ये पावन कनखल मध्ये दिव्य योग मंदिराची स्थापना करून आरोग्य , अध्यात्मिक आणि शैक्षणिक सेवा कार्यांचा प्रारंभ केला. ते सरळ स्वभावी , स्नेहमय व्यक्तित्वधारी व सर्वांच्या श्रद्धेचं केंद्र आहेत. आज संपूर्ण भारतात वेद, योग व आयुर्वेदाचा त्रिवेणि संगम वाहात आहे. या संत महात्म्यांच्या दिव्य प्रभावानी करोडो लोकं शारिरिक आरोग्य, मानसिक शांति, बौद्धिक चेतना, आत्मिक उन्नति व अध्यात्मिक विकासाचा लाभ घेत आहेत. धर्म, योग , अध्यात्म, समाज सेवा, शिक्षण, लोक कल्याण इत्यादि सर्व क्षेत्रांमध्ये ते समान रूपाने कार्यरत आहेत. आणि ते पण, मी तर फक्त निमित्तमात्र आहे व जे होत आहे ते प्रभु इच्छा व दयेने, या भावनेने. 

एक दशका पेक्षा पण कमी वेळांत दिव्य योग मंदिरा तर्फे निरनिराळ्या सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून यशाची जी उत्तुंग शिखरं सर केली आहेत त्याला दुसरी कांही उपमा देता येत नाही. पतंजली योग पीठाच्या रूपांत ज्या बहु आयामी योजना मूर्तरूप धारण करीत आहेत, तो एक ईश्वर निष्ठा, समर्पण भाव, सेवा संकल्प आणि लोक कल्याणाच्या मंगल भावनेचा चमत्कार आहे. त्यांच्या कांही सेवा प्रकल्पांचा संक्षिप्त परिचय खालील प्रमाणे आहे.

 योग साधना आणि योग चिकित्सा शिबिरः पूज्य स्वामी रामदेव बाबांच्या सानिध्यांत भारतांत व परदेशांत पण आयोजित होणार्या या शिबिरांमुळे योग हा फक्त शारीरिक व्यायाम आहे हा भ्रम दूर केला आहे. स्वामीजींनी योगाला शारीरिक आरोग्य, रोग निवारण, मानसिक शांति, आत्म विकास, बौद्धिक चेतना आणि अध्यात्मिक उन्नतिचा आधार बनविला आहे. या शिबिरांमध्ये महर्षि पतंजली प्रणित अष्टांग योग — यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधि– यांचं शिक्षण देण्यांत येतं. त्याच्या बरोबर हठयोग दर्शन, उपनिषद, वेद, चरक, सुश्रुत आदि ग्रंथांवर आधरित उपयोगिता अनुसार क्रियात्मक अध्ययन व स्वाध्यायची व्यवस्था असते. आपणां सर्वांना माहितीच आहे की, या शिबिरांमध्ये हजारोंच्या संख्येत साधक लाभ घेत असतात. तसेच रोज सकाळी टीव्ही वर येणार्या त्यांच्या कार्यक्रमा द्वारा लाखो लोकं आरोग्य प्राप्ति करीत आहेत.

ब्रह्मकल्प चिकित्सालयः यौगिक षटकर्म– नेति, धौति, बस्ति, त्राटक, नौली आणि कपालभाति– यां बरोबर ध्यान योग व जप योग इ. क्रियात्मक प्रशिक्षण तसेच आयुर्वेदिक पंचकर्म — मॉलीश, स्वेदन, वमन, विरेचन आणि शिरोबस्ति,  जडीबुट्टी व रसायणं यांवर आधारित आय्र्वेदिक औषधं, आहार विहार, पथ्यापथ्य, सम्तुलित ब्रह्मचर्य, ॠतुचर्या व दिनचर्या सम्यक करून नव्या आणि जुन्या रोगांवर उपचार ब्रह्मकल्प चिकित्सालयाच्या माध्यमाने करण्यांत येतो. ऍक्युप्रेशर , योग व आसनं, प्राणायामाचं प्रशिक्षण निशुल्क देण्यांत येतं. जे लोकं पैशाच्या अभावाने औषधं विकत घेऊ शकत नाही , त्यांना ती मोफत वा कमी दरांत दिली जातात. पतंजली योग पीठांत हे चिकित्सालय निवासी स्वरूपाचे आहे.

दिव्य फार्मसीः विशुद्ध स्वरूपांत निर्मित गुणवत्तायुक्त परंतु स्वस्त औषधं उपलब्ध करविण्यासाठी आश्रमांतच दिव्य फार्मसीची स्थापना करण्यांत आली आहे. येथे शुद्ध शास्त्रोक्त पद्धतिने  स्वानुभूत योग, भस्म व पिष्टी, स्वर्णघटित योग व रस, रसायन, वटी, गुग्गुळ, चूर्ण, अवलेह, सत, क्वाथ, घॄत, तेल, लोह, मंडूर, पर्पटी वगैरे तयार करण्यांत येतं.  दिव्य योग मंदिर ट्रस्टचा एक वेगळा संशोधन विभाग आहे, ज्यांत परंपरागत औषधां शिवाय नवी औषधं शोधणं, बरेच वर्षांपासूनची अनुपलब्ध औषधं शोधणं, वनौषधींची गुणवत्ता पाहणं, शास्त्रोक्त पद्धतिने औषध निर्मिती सुनिश्चित करणं, साहीत्य प्रकाशन करणं इ. कामं होतात. हिमालय क्षेत्रा बरोबर देश विदेशांत उपलब्ध , उपयोगी, दुर्लभ आणि सुलभ जीवनदायीनी जडीबुट्टींचं ज्ञान संरक्षण व संवर्धन करण्यासाठी योग पीठांतच दिव्य औषधवाटीकेची स्थापना केली गेली आहे.

दिव्य गौशाळाः भारतीय जातिच्या देशी गायींचं संरक्षण, संवर्धन व औषधं तयार करण्यासाठी उपयोगी गोदुग्ध, गोघॄत, गोमय व गोमूत्र वगैरेंच्या प्राप्तिसाठी आणि गौवंश रक्षणाचे प्रकल्प करण्यांत येत आहेत. गोमय व गोमूत्रांतून जैविक खतं बनवून तसेच बायोगॅस प्लांट टाकून आश्रमाची व औषधालयाची आवश्यकता  पूर्ण करण्यांत येतात.

वैदिक गुरुकुळः हरयाणाच्या रेवाडी शहरा पासून ८ कीमी दूर किशनगढ-घासेडा या ठीकाणी वैदिक संस्कॄति, संस्काराला आदर्श मानणार्या उन्नत व आधुनिक शिक्षणयुक्त मोफत विद्यातीर्थ गुरुकुळाचं संचालन होत आहे. ज्यांत उच्चवर्गा बरोबरच गरीब विद्यार्थ्यांना पण सुसंस्कारा सह चांगले शिक्षण देण्यांत येते. 

पतंजली योग पीठः अंदाजे १००० बिघे जमीनीवर ही बहुआयामी योजना वेद, योग, आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारा साठी मूर्तरूप धारण करीत आहे, जेथे २५०० खोल्या, औषधालय, गौशाळा, जडीबुट्टी उद्यान, साहीत्य प्रकाशन वगैरे सर्व व्यवस्था पूर्णतया आत्मनिर्भर व स्वावलंबी परिसरांत होत आहे.

अशा आधुनिक ॠषि योगर्षि रामदेव बाबाने सादर प्रणाम !

विलास भोंडे

१०-५-२०१०


Responses

  1. I am an ardent follower of Baba Ramdevji.
    I hope to visit his Ashram some day.

  2. I like to know the update of Change India activity of Ramdevji, the great effort, and I wish him all the best, my prayers are there with him.

  3. मैं बाबा रामदेव का आदर करता हुं. मैंने भी सेंकडों भारतीयो कि तरह उनके बताये योग का अभयास का प्रयत्न किया है. मानव कल्याण में बाबा रामदेवजी का योगदान नोबल पुरस्कार से भी अधीक है. परंतु भार्तीय राजकार्णीयों ने अपने स्वार्थ हेतु कि रक्षा के लेये बाबा पे कई बार कीचड उडाया है. तत्पशच्यात बाबा ने भारत हित्शत्रुओ के विरुध्ध अपना युध्ध कायम रखा है. बाबा के इस निस्वार्थ कर्म को म्रेरा प्रणाम.

    जय बाबा रामदेव.

    जीतेंद्र

  4. बाबांचे कार्य चांगले आहे असेच काम चालु ठेवावे हम साथ् है


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: