Posted by: vmbhonde | मे 11, 2010

स्वाध्याय परिवार

स्वाध्याय परिवार

लाखो अनुयायांचे जीवन परिवर्तन करणार्या प.पू. पांडुरंग शास्त्री आठवलेंना कोण ओळखत नाही !  १९ ऑक्टोबर १९२० रोजी रोहे  या छोटाशा गांवी कोंकण महाराष्ट्रांत पांडुरंगाचा जन्म झाला. त्या आधी त्यांच्या आजोबांनी व एका संन्याशाने भाकीत केले होते की हा मुलगा एका महापुरुषाचा अंश आहे. लहानपणी मुलगा फार मस्तीखोर पण खूप हुशार होता. त्याने गांवांतच संस्कॄत भाषेचं शिक्षण घेतलं. पांडुरंग सर्व गोष्टी बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहात असे व मगच विश्वास ठेवत असे. १९ वर्षाच्या वयाला त्याने इंग्लीश साहीत्यावर प्रभुत्व मिळविलं. शास्त्री कुटूंबांत जन्म झाल्याने भारतीय संस्कॄति व तत्वज्ञानाचा अभ्यास प्रथमच झाला होता. कोंकणाहून मुंबईला येऊन वडीलांची तब्येत खराब झाल्याने त्यांनी भगवद गीतेवर प्रवचनं करणं सुरु केलं आणि तेव्हा पासून भारत उत्थाना साठी संस्कॄति चा प्रचार प्रसार करणे हा उपाय नक्की झाला.

जपान मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान परिषदेंत दिलेले भारतीय संस्कॄति विषयी चे भाषण ऐकून पश्चिमी देशांतील मोठ्या तत्वज्ञांनी  पांडुरंग शास्त्रींना अमेरीकेंत येऊन भाषणे करण्यास सांगितले व त्यासाठी लाखो रुपये देण्याचे पण कबूल केले. पण शास्त्रीजींना तर भारतीय समाज उद्धारचं काम करयचं होतं. मार्च १९९७ मध्ये त्यांना १२ लाख पौंडांचा टेंपल्टंट पुरस्कार मिळाला. त्याशिवाय जगन्मान्य रेमन मॅगेसेसे पुरस्कार [ १९९६ ], भारत सरकारा कडून पद्मविभूषण सारखे अनेक पुरस्कार, पदव्या, मान सन्मान पण मिळाले. डॉ. राधाकॄष्णन, विनोबा भावें सारखे महान तत्वज्ञ पण शास्त्रीजींच्या कर्मयोगाने प्रभावित झाले होते. कोणा कडून ही हाथ पसरून पैसे मागितल्या शिवाय त्यांनी तत्वज्ञान विद्यापीठ आणि स्वाध्याय परिवाराचं प्रचंड कार्य उभं केलं. २५ ओक्टोबर २००३ मध्ये त्यांनी नश्वर देह त्यागला. त्यांचं आयुष्य म्हणजे ॠषितुल्य जीवनाचं अवतार कार्यच. निस्वार्थ बुद्धीने ईश्वरावर संपूर्ण विश्वास ठेऊन मानवमात्राच्या सर्वांगीण उन्नति साठी केलेलं हे काम ईशकार्यच  म्हणता येईल. त्यांनी भाव भक्तिला कॄति भक्ति मध्ये जोडून कर्म कांडांत अडकलेल्या भक्तीला कार्यरत केली. कॄति भक्ति तर्फे मनुष्य जीवनाचा सर्वांगीण विकास केला, सामाजिक उच्चनीचता कमी करविली. एक आदर्श सुसंस्कॄत स्वशासित समाज अस्तित्वांत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचं काम कोळी लोकं, वनवासी, शेतकरी, वाघरी, नागरी, शिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत – सर्वांसाठी आहे.

त्यांचे निरनिराळ्या प्रकारचे प्रकल्प खालील प्रमाणे आहेत—

१] पंचरंग क्रांतिः– सामाजिक, राजकिय आणि आर्थिक क्रांति बरोबर  भावनिक व अध्यात्मिक-सांस्कॄतिक क्रांति पण त्यांनी जोडली.

२] अमॄतालय- कुटीर मंदिरः- [३०५] –  गांवांचं आर्थिक -सामाजिक शक्तिकेंद्र, जेथे जाति , पंथ व धर्माच्या वर उठून भाव भक्ति व कॄति भक्ति होते.

३] योगेश्वर भाव कॄषिः- [४३००] स्वतःची जमीन नांगरतात , त्याप्रमाणे गांवांतील सर्व शेतकरी देवासाठीची जमीन नांगरतील. योगेश्वर कॄषी मधून उत्पन्न होणार्या लक्ष्मीचा विनियोग गांवांसाठीच केला जातो. देणारा नारायण आणि घेणारा भक्त या कल्पनेने काम होतं.

४] मत्स्यगंधाः- [१०३] मासे मारणार्या सागर पुत्रांसाठी देवाची होडी[बोट] मत्स्यगंधा नांवाने तयार करण्यांत आली. शेतकर्यां प्रमाणे कोळी पण श्रम भक्ति करु लागले. कोळी समाजाची लाचारी गेली, वैरभाव मिटला, दारिद्र्य कमी झालं, व्यसनं गेली, नवं भांडवल उभं झालं.

५] त्रिकाल संध्याः– तीन वेळा हॄदय पूर्वक देवाचं स्मरण करणं आणि कॄतज्ञता व्यक्त करणे त्याचं नांव त्रिकाल संध्या.

६] सायं प्रार्थनाः- [६२ लाख परिवार ] कौटूंबिक ऐक्या साठी रात्री ८.३० वाजतां सर्वानी  एकत्र प्रभु प्रार्थना करणे.

७] घर मंदिरः- [२१५] प्रत्येक घरांत वाजत गाजत देवाचं आगमन जेणे करून ८ दिवसांसाठी ते घर मंदिर बनेल. मंदिराचं पवित्र वातावरण  घरांघरांतून पहायला मिळालं. भांडणं, व्यसनं, गैरवर्तन आपोआप कमी झाले.

८] याज्ञवल्क्य उपवनः- [२४] वॄक्ष मंदिराच्या कल्पने प्रमाणे गांवाच्या बाहेर श्रम भक्ति करून वॄक्षां मध्ये पण ईश्वर आहे या भावनेसह उपवनं तयार झाली.

९] श्री दर्शनमः- [१९] एका गांवाची योगेश्वर कॄषि तर २० गांवांची एकत्र केलेली कॄषी म्हणजे श्री दर्शनम, त्यामुळे सर्व गांवं एकत्र झाली.

१०] पतंजली चिकित्सालयः– वनवासी विस्तारां मध्ये वैद्यकीय साधनं व सुविधा पोहोचविण्या साठी स्वाध्यायी डॉक्टर्स आठवड्यांतून एकदा जातात.

११] मानव प्रतिष्ठा केंद्रः– समाजांतील उपेक्षित माणसाला पण प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी या केंद्रांची   स्थापना केलेली आहे. ज्यांत सुतारी काम, शिलाई काम , ईलेक्ट्रीक साधनांची दुरुस्ती इ. अभ्यासक्रम शिकविले जातात ज्यामुळे  स्वावलंबन वाढेल असे प्रयत्न केले जात आहेत.

१२] भाव भक्ति फेरीः- [३,२०,०००] या नंतर लाखो लोकं दर महीन्याला समाजाच्या गरीब, पददलीत, उपेक्षित माणसां पर्यंत पोहोचतात.

या शिवाय निर्मल नीर[२०००], एकवीर[१०], युवक केंद्र[१८४००], महीला केंद्र[२५५००], बाल संस्कार केंद्र[१४२००], हीरा मंदिर[१०], गोरस[१८] असे अनेक प्रयोग ठीकठीकाणी राबविले जात आहेत.

मानवांमध्ये अस्मिता जागॄत होईल, देवा विषयी आदरभाव राहील आणि प्रत्येकाचं जीवन तेजस्वी,   उत्साही व आनंदी होईल या साठी सांस्कॄतिक पुनरूत्थानाचं भगीरथ कार्य स्वाध्याय परिवार करीत आहे, तेव्हा अर्वाचिन युगाचे महर्षि अशा पूज्य दादांना शतशः प्रणाम.

विलास भोंडे

८-५-२०१०


Responses

 1. I MOST LIKE SWADHAY PARIWAR. IAM THE BIG FAN OF KENDRA . ME IN CHILD JOIN BALSCANSCAR KENDRA NOW MY EDGE IS 19 YEAR NOW ME JOIN YUVA KENDRA SO IM VERY IMPRESSED BY IT.

 2. jai yogeshwar

 3. I AM VERY HAPPY BECAUCE I AM RELATED TO SWADHYAY KENDRA. SWADHYAY KENDRA PROVIDE BEST WAY OUR LIFE .

 4. JAY YOGESHWAR

 5. Jay Yogeshhwar-
  I am very happy to join the swadhay pariwar. Because swadhay learn “how to enjoy our life with whitout tension” as well as how to perform’s our life with big coureg.
  Dhage vilas {kendra sanchalk-Bhoom}

  • jay yogeshwar
   Mala khu aanand hot aahe. karan swadhya privar ha vaishwik privar aa
   aahe. aaplya parivara sarkhe kutumbh kuthe hi pahayala milnar nahi.

   • thanks for your comments

 6. swadhayasi jodne he maze bhagy aahe

 7. I am provide of it. I am Swadhyai.

 8. Jay yogeshwar bhau

 9. I like yuva kendra & swadhay kendra

 10. वैदिक धर्माचे तुकडे”’
  वैदिक आर्य हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ ,संप्रदाय आहेत. परंतु ते सर्व एकोप्याने नांदत होते .
  परंतु अलीकडे इंग्रजांच्या डिवाईड अँण्ड रूल ह्या नियमाने सरकार ,संस्था ,आणि इतर प्रसिद्धी प्रिय
  असणाऱ्या लोभी लोकांनी त्यात वेगवेगळे संप्रदाय निर्माण करून आणखी हिंदू धर्माचे तुकडे केले .
  जय गुरुदेव ”’.स्वाध्याय”’ ,सत्संग ,गायत्री परिवार ,प्रजापिता ब्रह्मकुमारी ,सर्वे धर्म समभाव असे अनेक पंथ
  निर्माण करून लोकांना संभ्रमात पाडून मूळ वैदिक आर्य हिंदू धर्मामधून वेगळे केले आहे.अशा
  कार्यामुळे संस्थापकांनी वैदिक, सांख्य. आणि वैज्ञानिक तत्वांचा काला करून लोकांसमोर मांडला
  त्यात बरेच अज्ञानी बळी पडले.त्यांनी वेदशास्त्र ,पुराने अभंग गीता इत्यादीचे पुरावे सादर करून
  स्वमत सिद्धांत मांडले.
  ”’हिंदू संस्कृतीची आणि वारकरी संप्रदायाचा उपहास””””’
  ”’पांडुरंग वैजनाथ आठवले”’
  पांडुरंगशास्त्री आठवल्यांकडून तुकोबांविषयी खोटारडा प्रचार
  …म्हणे तुकाराम महाराजांपासून इश्वर दूरच राहिला
  ”’तुकोबांनी आठ-आठ जन्म घेऊनही ईश्वर त्यांच्यापासून दूरच राहिला”’, असा खोटा प्रचार आठवले करतात.
  पुस्तकातील ‘अवतार मीमांसा’ नावाच्या पहिल्याच प्रकरणात हा प्रकार आठवल्यांनी केला आहे. या विवेचनातील आठवल्यांचे शब्द पुढील प्रमाणे आहेत :
  ”’.ट्रान्समायझेशन म्हणजे म्हणजे उत्क्रांतीवादाच्या पद्धतीने विकास करीत दिव्यमानव बनून मनुष्याने वर येणे. उदाहरणार्थ, तुकाराम महाराज आठ आठ जन्म घेऊन स्वत:चा विकास करीत राहिले, परंतु ईश-चैतन्य मात्र स्वत: दूरच उभे राहिले.१”’
  कारणाशिवाय अवतार होत नाही. ‘न ऋतश श्रांतस्य सख्याय देवा:’ हा वैदिक सिद्धांत आहे. एकादशीच्या दिवशी सर्वांनी एकत्र जमून आक्रोश केला तरी प्रभू तो ऐकत नाही. ‘हा दगडाचा देव आहे’, अशा आक्रोशाने तो पाझरणार नाही…’
  अशा पद्धतीचे वाक्य ”’दशावतार”’ ह्या पुस्तकात अनेक ठिकाणी सापडतात
  नंदकिशोर म कुबडे


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: