Posted by: vmbhonde | मे 11, 2010

श्री रामचंद्र मिशन

श्री रामचंद्र मिशन

श्री रामचंद्र मिशन या संस्थेची स्थापना शाहजहांपूर, उत्तरप्रदेशाच्या श्री रामचंद्रजी महाराज यांनी १९४५ मध्ये त्यांच्या स्वतःच्या गुरुंच्या स्मॄति साठी केली. ही पुर्णपणे अध्यात्मिक संस्था आहे. ज्याचा उद्देश सामान्य मनुष्याला ईश्वर प्राप्तिचा मार्ग सरळ-सहज करून देणे हा आहे. मिशन प्रणित या साधना  पद्धतिला सहजमार्ग किंवा प्राकॄतिक मार्ग म्हणतात. ही एक अध्यात्मिकतेची व्यावहारिक तालीम देणारी पद्धति आहे. सहजमार्गाचं सत्व आहे राजयोगाचा [ मनाच्या योगाचा ] अभ्यास. ह्या अभ्यासाला सरळ करण्यांत आला आहे, जेणे करून तो सामान्य लोकांना शांति मिळविण्यांत, त्यांच्या जीवनांत संतूलन स्थापण्यांत आणि अध्यात्मिक रीतीने उन्नत होण्यास मदतरूप होईल. ही राजयोगाची प्राचीन पद्धति आहे, ज्यांत मनाचं नियमन, शुद्धीकरण व शेवटी दिव्यकरण करून आपल्याला आत्म साक्षात्कारा कडे घेऊन जाण्यांत येते. पतंजली ॠषींच्या प्राचीन राजयोग पद्धतिची जी आठ अंग होती ,त्यांत थोडा बदल करून, त्याला सरळ करुन , आधुनिक मनुष्याच्या, विशेषतः एका गॄहस्थाच्या राहणीच्या अनुरूप करून, जिज्ञासुला सरळच ध्यान करविण्यांत येतं. ह्या सहज मार्ग पद्धतिला स्वाभाविक वा प्राकॄतिक मार्ग पण म्हणण्यांत येतं कारण कोणत्याही प्रकारचा ताण किंवा बळ वापरल्या शिवाय तो मनुष्याच्या शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक पैलूंचं एकत्रीकरण करतो. ही पद्धति देह दमन, स्व चा निषेध, तपश्चर्या , सांसारिक त्याग वा ब्रह्मचर्य इत्यादिंचा निर्देश करीत नाही. सहज मार्ग ध्यानावर आधारित एक पद्धति आहे की ज्या मुळे मनाचं नियमन होतं आणि मन शुद्ध होऊन एक शक्तिशाली साधन बनतं. अध्यात्मिकते साठी गॄहस्थ जीवनाला आदर्श तालीम केंद्र मानलं जातं. येथेच आपल्याला धैर्य, स्वशिस्त, प्रेम व त्याग शिकायला मिळतो. अध्यात्मिक सफलते साठी हेच सर्व गुण अनिवार्य आहेत.

धर्म आपल्याला नैतिक सिद्धांत देण्यासाठी व मनाला ईश्वरा कडे वळवण्यासाठी उपयोगी झाला आहे. परंतु तो आपणांस बहीर्मुखी बनवितो. अध्यात्मिकता सांगते की जर ईश्वर सर्वत्र आहे तर तो आपल्या आंत पण आहे. म्हणून आपण अंतर्मुख होऊन त्याला आंत शोधूया.

सहज मार्गाचे पहिले गुरु श्री रामचंद्र महाराज, फतेहगढ चे[उ.प्र] होते, त्यांना लोकं प्रेमाने लालाजी म्हणत. त्यांनी प्राणाहुतिची प्राचीन पद्धति पुनः संशोधित केली. प्राणाहुति म्हणजे गुरुंच्या अध्यात्मिक शक्तिचं जिज्ञासुच्या हॄदयांत संचारण [ tansmit ] करणे . शाहजहांपूरचे श्री रामचंद्रजी श्री लालाजींचे सर्वांत निष्ठावान शिष्य व उत्तराधिकारी होते. प्रेमाने सर्वजण त्यांना बाबुजी म्हणत. त्यांचं जीवन पण सांसारिक समस्या व आपल्या साथीदारांसाठीच्या उत्तम त्यागासाठी आदर्श होतं. त्यांनी प्राणाहुति पद्धतिला  पूर्णताप्रदान केली आणि १९४५ मध्ये आपल्या गुरुजींच्या स्मॄतिमध्ये श्री रामचंद्र मिशनची स्थापना केली होती. वर्तमान अध्यात्मिक गुरु श्री पार्थसारथी राजगोपालाचारी चेन्नईचे निवासी आहेत. ते पण एक आदर्श गॄहस्थ जीवन जगून या संस्थेचे संचालनाचे काम ८३ व्या वर्षी पण करीत आहेत. ते TTK या कंपनी मधून कार्यपालक नियामक [ Executive Director ] म्हणून निवॄत्त झालेले आहेत. त्यांच्या अथांग अध्यात्मिक प्रयत्नांमूळे संपूर्ण जगांत १०० देशांमध्ये मिशनचं काम पसरलेलं आहे. भारतांत पण त्याची अंदाजे १००० केंद्र आहेत.

पशु मानवांतून मनुष्य मानव व त्यांतून दिव्य मानव असा सर्वांचा प्रवास करविण्यासाठी मिशन यशस्वी रीतीने कार्य  करीत आहे. त्याबरोबर सेवाकीय क्षेत्रांमध्ये पण आपला वाटा उचलत आहे. कारगील युद्ध, पूर, भुकंप सारख्या आकस्मिक संकटांच्या वेळी लाखो रूपयांची मदत मिशनने केली आहे. चेन्नई मध्ये ओमेगा लालाजी मेमोरीयल स्कूल ची स्थापना करून शैक्षणिक क्षेत्रांत पण आपलं योगदान देत आहे. शाळेंत अंदाजे ८०० विद्यार्थी हॉस्टेलच्या सुविधेसह स्वतःचा शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक विकास साधत आहेत. पूज्य चारीजींच्या मार्गदर्शना खाली तयार केलेल्या शाळेचा विशिष्ट अभ्यासक्रम चमत्कार सर्जन करीत आहे. चेन्नाई मध्येच राहत दराचे व काही मोफत दवाखाने पण चालू आहेत.भारतातील खूप सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी संस्कार आणि मूल्य आधारित शिक्षणक्रमाचे वर्ग मिशनचे अभ्यासी चालवितात. ज्यामुळे पाठ्यपुस्तक आधारित शिक्षणाबरोबर मूल्य आधारित जीवन घडविणे पण होत आहे. शिक्षकांसाठी पण या अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण देण्यांत येतं. निरनिराळ्या कंपन्या व संस्थांमध्ये ताण मुक्ति साठीचे सेमिनार तसेच ध्यानाच्या बैठकी देण्यात येतात, ज्यामुळे समाजाचं मानसिक आरोग्य सुधरेल. मनाच्या नियमना मुळे व्यसन मुक्ति आंदोलन पण चालते. जातिभेद, रंगभेद, भाषाभेद दूर होऊन समाजांत ऐक्य वाढून संपूर्ण विश्व एका कुटूंबांत परिवर्तित व्हावे यासाठी पूरते प्रयत्न मिशन करीत आहे. विश्व शांति स्थापनासाठी दिव्यशक्तिचा प्रयोग पण होतो आहे.

सहज मार्ग मानतो की ईश्वरा बरोबर एकरूप होणे हेच मनुष्य जीवनाचं अंतिम लक्ष आहे. ईश्वर कोण्या एका धर्माचा देव नाही, पण तो तर रूप रहीत, नाम रहीत व गुण रहीत  परमतत्व आहे जे संपूर्ण सर्जन करणारं आहे. आपल्या भौतिक प्रवॄत्तिं बरोबरच ईश्वर मिलन शक्य आहे ज्यासाठीचं संतूलन श्री रामचंद्र मिशन देतं. मिशनच्या प्रयत्न्नांनी लवकरच विश्वशांति स्थापली जावो आणि जगांतील सर्व मानवांचं अध्यात्मिक उन्नतिच्या शिखरावर आरोहण होवो हीच प्रार्थना.

विलास भोंडे

९-५-२०१०


Responses

  1. Khoop sundar lehitat tumhi. kuthun mahiti milavtat he?


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: