Posted by: vmbhonde | मे 11, 2010

श्री मां आनंदमयी

श्री मां आनंदमयी

३०-४-१८९६ रोजी खेओरा नांवाच्या छोट्याशा गांवी [ जे आज बंगलादेश मध्ये आहे ]  एका पवित्र ब्राह्मण कुटूंबांत त्यांचा जन्म झाला. त्यांचं नांव निर्मला सुंदरी देवी ठेवण्यांत आलं. १० महीन्यांच्या त्यांची लोकांनी देवीचा अवतार म्हणून पूजा केली होती. दोन वर्षांच्या वयाला एका कीर्तनांत त्या ध्यानांत गेल्या होत्या आणि त्यांच्या आईच्या मांडीवर पडल्या होत्या. लहान मुलगी म्हणून त्या इतक्या सुंदर व निष्पाप होत्या की संपूर्ण गांवांत सर्व लोकं त्यांन खूप प्रेम करीत असत. त्या पण सर्वांना मदतीसाठी नेहमी तयार असत. सर्व मुलां पेक्षा त्यांचा स्वभाव खूप वेगळा होता.  त्या कधीच  मस्ती करत नसत पण नेहमी हसतमुख व आनंदी राहात. ज्यामुळे लहानपणी त्यांना सर्वजण ‘मानुषकाली’ [ मनुष्य रूपांत काली मां ] म्हणत. त्यांचे वडील वैष्णव म्हणून चांगले भजन गायक होते. निर्मलाचं लग्न रमणि मोहन चक्रवर्तीं बरोबर तेराव्या वर्षी झालं. ते शक्ति उपासक होते. आदर्श गॄहीणी म्हणून  त्या घरचं सर्व काम उदा. केर वारे, स्वयंपाक, विहीरीतून पाणी खेचून काढणं इ करीत असत. पण त्या नेहमी हसतमुख असत व सर्व कामं स्वतः होऊन मागून घेत. नेहमी हसतमुख, आनंदी व पवित्र व्यक्तित्व पाहून सर्वजण  त्यांना ‘खुशी मां ‘म्हणत असत. घरकाम करीत असतांना पण त्यांचं ध्यान लागत असे. १९१८ पासूनच बाजीतपूर मध्ये [ढाका जवळ ]  त्यांच्या अध्यात्मिक क्रीया प्रदर्शित होऊ लागल्या होत्या. १९२२ मध्ये  मीच पूर्ण नारायण आहे असा साक्षात्कार त्यांना झाल्याने त्यानी स्व दिक्षा [गुरु शिवाय] घेतली. पोलीओ झालेल्या मुलीला चांगले करणे , काली पूजा करतेवेळी बकरा कापला पण त्यांतून रक्त न येणे इ. बरेच चमत्कार त्यांनी केले. स्वतःच्या पतिला त्या भोलानाथ म्हणत ज्यांनी  १९३८ मध्ये देह सोडला.

जनता जनार्दनाची सेवा हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. गरीब व पददलीत समाजासाठी  बरीच कामं  त्यांनी केली. १९२७ मध्ये त्या एकदा १३ दिवस आणि नंतर पुन्हा एकदा २३ दिवसासाठी अन्न पाण्या शिवाय राहील्या होत्या. त्या स्वतः काही शिकल्या नव्हत्या, तरीदेखील अध्यात्मिकते मध्ये बरेच संत महात्मा त्यांना आदर देत असत आणि त्यांच्या कार्यक्रमां मध्ये श्री मां उपस्थित राहतील असा प्रयत्न करीत असत. त्यांना नेहमी आचार्य सभेंत पण आमंत्रित करण्यांत येत असे. प्रभुदत्त ब्रह्मचारी तसेच स्वामी करपत्रीजी महाराज यां सारख्या राष्ट्रीय संतांबरोबर पण त्या सहयोग करीत असत. त्यांचा धर्म व अध्यात्म हे सामान्य माणसाच्या सुख दुःखा बरोबर जोडलेलं होतं. गरीबांच्या सेवे वर त्या नेहमी जोर देत असत. श्रीमती कमला नेहरू त्यांच्या वर्षानुवर्ष भक्त राहील्या. पं. जवाहरलाल नेहरू, डॉ राजेन्द्र प्रसाद , वी वी गिरी, कैलाशनाथ काटजु, इंदीरा गांधी, गुलझारीलाल नंदां सारखे कितीतरी  राष्ट्रीय नेते श्री मां च्या दर्शनाला नेहमी येत असत. त्यांना बर्याच वेळा राष्ट्रपति भवनांत व पंतप्रधानांच्या निवास स्थानी आशिर्वाद देण्यासाठी आमंत्रित करण्यांत येत असे. १९८२ मध्ये त्यांच्या वयाच्या  ८६ व्या वर्षी श्रीमां आनंदमयी यांनी महासमाधि घेतली.  परंतु त्यांच्या मागे गरीबांच्या उद्धारा साठी बरेच प्रकल्प व कार्यक्रम त्या सोडत गेल्या.

भारतभरांत त्यांच्या २६ आश्रमां तर्फे  बर्याच अध्यात्मिक व सामाजिक प्रवृत्ति होत आहेत, ज्याचं लक्ष समाजोपयोगी कामं करण्याचं आहे. वाराणसी मध्ये स्थापलेलं माता आनंदमयी हॉस्पीटल हजारो गरीब रोग्यांची सेवा करीत आहे. मां आनंदमयी कन्यापीठ, वाराणसी अंतर्गत एक मोठं छात्रालय तसेच शाळा व कॉलेज चालविण्यांत येतं. जेथे प्राथमिक शाळेपासून एम ए, पी एच डी पर्यंतचं शिक्षण देण्यांत येतं.  विद्यार्थीनींना आधुनिक शिक्षणा बरोबर ध्यान, जप, योग, शिवणकाम, स्वयंपाक, संगीत  इत्यादिंचं पण  शिक्षण दिलं जातं. त्यांच्या भोपाळ आश्रमांत पण जुलै १९९८ पासून आठव्या इयत्ते पर्यंत अंदाजे ७०० विद्यार्थ्यांसाठी एक शाळा चालते. ही शाळा झोपडपट्टी विस्तारांत आहे, ज्यामुळे त्यांत गरीब व मागासलेल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळतो. ज्यांना घरांत चांगले संस्कार मिळत नाही,ज्यांचे वडील दारू पिणारे,जुगार खेळणारे आहेत अशा मुलांना सुधरवून समाजात चांगले नागरिक तयार करण्याचे काम येथे होत आहे. देहरादून मध्ये असलेली मां आनंदमयी मेमोरीयल स्कूल पण पहीली ते बारावी पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी संस्कार सिंचनाचं काम करीत आहे. या सर्व शाळा व दवाखान्यांत गरीबांना मोफत सेवेचा लाभ मिळतो.

सुंदर पवित्र चेहरा, निष्पाप सरळ-सहज वर्तन, समाजांतील शेवटच्या माणसा साठी असलेली करूणा, सर्व संप्रदाय,पंथ यांच्या बरोबर उत्तम संकलन इत्यादि गुणांमुळे मां आनंदमयी वंदनीय होत्या. त्या म्हणत असत की ईश्वर एकच आहे आणि खर्या हॄदयानी केलेला कुठलाही प्रयत्न प्रभुप्राप्ति साठी सफळ होतो. म्हणूनच स्वामी चिन्मयानंदां सारख्या महान तत्वज्ञानी संतानी पण म्हंटलं होतं की ज्याप्रमाणे सूर्याच्या अस्तित्वासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता नसते त्या प्रमाणे श्री मां आनंदमयीं साठी पण कोणत्याही ओळखीची किंवा प्रमाणपत्राची जरूर नाही. .. अशा महान काली स्वरूप श्री मां ना आमचे कोटी कोटी  वंदन.

विलास भोंडे

६-५-२०१०

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: