Posted by: vmbhonde | मे 11, 2010

व्यक्ति विकास केन्द्र–आर्ट ऑफ लिविंग

व्यक्ति विकास केन्द्र–आर्ट ऑफ लिविंग

श्री श्री रविशंकरजींना कोण ओळखत नाही !  निरनिराळ्या वेळी मानवतेला नवी दिशा देण्यासाठी परम चैतन्याचं पृथ्वीवर अवतरण होत असतं. आधुनिक युगांत ते दिव्यता, सहजता, सरळता, आत्मियता व प्रेमाच्या भावनेला स्वतःमध्ये समावून पृथ्वीवर जीवनाला एक उत्सव करण्यासाठी आले आहेत. त्यांचा जन्म १३-५-१९५६ रोजी दक्षिण  भारतांतील एका श्रीमंत व सुसंस्कृत कुटूंबांत झाला. चार वर्षाचे असतांना त्यांना गीतेचे श्लोक पाठ होते. लहानपणी खूप वेळा त्यांना तासन तास ध्यानमग्न अवस्थेत पाहीलं गेलं होतं. ध्यान व पूजा हे त्यांचे आवडते खेळ होते. ते पुष्कळ वेळा म्हणत असत की समग्र विश्व हे माझे कुटूंब आहे आणि खूप सर्व लोकं माझी वाट पहात आहेत.

सतराव्या वर्षी त्यांनी आधुनिक विज्ञान व वेदांचं अध्ययन समाप्त केलं. त्यानंतर कांही वर्षे संत समागम व एकांत साधनेत गेली. गहन ध्यान, मौन आणि साधने नंतर सहज स्फूरण पावलेली श्वासोश्वासाची सुदर्शन क्रीया ही त्यांची जगाला दिलेली अमूल्य भेट आहे. १९८४ पासून श्री श्री रविशंकरजींनी विश्वकल्याणा साठी तसेच असंख्य लोकांना ताण व चिंतेतून मुक्त करण्यासाठी सर्वत्र देश विदेशी परिभ्रमण सुरु केलं. १९८६ मध्ये त्यांना भारत सरकारने योगशिरोमणी ही पदवी दिली, १९९८ मध्ये युनोच्या सामान्य सभेला त्यांनी संबोधन केलं. तसेच २००० साली राष्ट्रसंघाच्या धर्मगुरूंच्या विश्वशांति परिषदेत त्यांनी दिलेलं प्रवचन फारच असरदार होतं. WHO च्या सल्लागार समितिमध्ये पण त्यांचं स्थान आहे. ते मनुष्य जीवनाच्या उत्थानाचं महान कार्य करीत आहेत. त्यांच्या सत्संगात येणारी प्रत्येक व्यक्ति स्वतःच्या हृदयांत नवीन प्रेम, प्रकाश व जागृतिचा अनुभव करते. त्यांचे युवावस्था, श्वेत वस्त्र परिधान व ज्ञानाची सखोलता पाहून दक्षिणामूर्ति ची कल्पना साकार होते. त्यांच्यांत बुद्धाची शांति, येशु ख्रिस्ताची करूणा , श्रीकृष्णाची नटखट वृत्ति आणि आदि शंकराचार्यांच्या ज्ञानाचे दर्शन होते.

व्यक्ति विकास केंद्र हे सरकारमान्य चॅरीटेबल ट्रस्ट आहे, ज्याची स्थापना १९८२ मध्ये केली होती. आणि आज संपूर्ण जगांत १४६ देशांमध्ये ५००० केंद्रांद्वारा निरनिराळ्या सेवा कार्यांनी लाखो लोकांचे जीवन सुगंधित करीत आहे. आर्ट ऑफ लिविंग [ जीवन जगण्याची कला ] हे व्यक्तिच्या सर्वांगीण विकासा साठी रचलेलं अत्यंत असरकारक प्रशिक्षण आहे. त्यांत शिकविण्यांत येणारी सुदर्शन क्रीया ही श्वासोश्वासाची संपूर्ण वैज्ञानिक, विशिष्ट व शक्तिशाली प्रक्रीया आहे. त्यांवर बर्याच वैज्ञानिक संस्थांमध्ये रीसर्च झाले आहे आणि खूपशा रोगांवर मानसिक व शारीरीक फायदे झाले आहेत असे परीमाण आले आहेत. आर्ट ऑफ लिविंग फौंडेशन तर्फे आयोजित बरेच कार्यक्रम मोठमोठ्या कंपन्यांच्या अधिकार्यांना लाभान्वित करीत आहे.उदा. वोल्टास, टेल्को, टीस्को, इसरो, गोदरेज, इन्डीयन ऑईल, हींदुस्थान पेट्रोलियम, विप्रो, इन्फोसीस इ. समाजातील सर्वांत तिरस्कृत जेल कैद्यांच्या विकासासाठी पण कोर्स आयोजित केले जातात.

गुजरातमध्ये ५ H प्रोग्राम आधारित निरनिराळ्या सेवांमध्ये ३१० वॅक्सीनेशन कॅम्प[११२०५ मुलं], ७६५ मेडीकल कॅम्प[२९९१४ पेशंट], ९६९ मोतिबिंदु ऑपरेशन, २७९ पोलीयो ऑपरेशन, १५०२८ स्वच्छता कॅम्प, ३१०,००० वृक्षारोपण, ८ टन देशी खतांचं उत्पादन, ५२९३ शेतकर्यांची सेंद्रीय शेती, ६४ शौचालयं, बरेचसे तलाव, चेकडॅम, आडबांध इत्यादि सेवा कार्य करण्यांत आली आहेत. अतिवृष्टी, पूर, वावटळ, भूकंप इ. संकटांच्या वेळी पण केंद्रातर्फे मदत मिळते. गुजरातच्या भूकंपाच्या वेळी अमदाबाद मध्ये २०००० माणसांसाठी स्वयंपाकघर चालविले होते. संपूर्ण नाना दहिसरा गांव दत्तक घेऊन ११३ घरं बांधली होती. तसेच १२ शाळा व २ हॉस्टेल बांधली. अशी दुसर्या प्रदेशांत पण मदत केलेली आहे.

संपूर्ण भारतात २५ राज्यांमध्ये २६००० पेक्षा जास्त गांवांमध्ये ५ H कार्यक्रम चालतात. २०६६० मेडीकल कॅम्प मध्ये २२,३०,००० पेशंट नी लाभ घेतला आहे. ३४३१० सफाई कॅम्प योजले. २५०० शौचालय बनविले. ५०० गोबर गॅस प्लांट टाकले. शैक्षणिक क्षेत्रांत श्री श्री रविशंकर विद्यामंदीर तर्फे बर्याच ठीकाणी शाळा चालतात. बंगलोरला वेद विज्ञान महाविद्यापीठांत १९८४  पासून ७०० मुलांसाठी फुकट शाळा चालते आहे. श्री श्री रविशंकर जुनियर कॉलेज , बंगलोर मध्ये पण सायन्स, आर्टस व कॉमर्स चे कोर्स चालतात. श्री श्री मिडीया स्टडी अंतर्गत पत्रकारत्वचा पोस्ट ग्रॅज्युएट डीप्लोमा कोर्से पण सुरु झाला आहे. खेड्यांतील भगिनींना स्वावलंबी करण्यासाठी निरनिराळे उद्योग शिकविण्यांत येतात. रूरल डेवेलपमेंट प्रोग्राम अंतर्गत खेड्यांतील नवतरूणांसाठी मार्केटींग, मॅन्युफॅक्चरींग व शेती विषयक वेगवेगळे कार्यक्रम चालविण्यांत येतात. आयुर्वेदिक कॉलेज, चिकीत्सालय इ. पण बर्याच ठीकाणी चालतात.

आर्ट ऑफ लिविंग च्या निर्निराळ्या प्रशिक्षण कोर्सांमध्ये शेकडोंनी व्यक्ति तयार होत आहेत, जे समाजाच्या विविध विस्तारांना उन्नत करण्याच्या प्रक्रीयेसाठी काम करतात. सेवा, साधना, सत्संग व ज्ञान या जीवनाच्या चार आधारांवर समाज जीवनाची रचना करणार्या श्री श्री रविशंकरजींना कोटी कोटी प्रणाम

विलास भोंडे

५-५-२०१०

Advertisements

Responses

 1. MAZA ART OF LIVING CHA CORSE ZALA AHE MALA GURUJINA PRSHN VICHRAYCHA HOTA MALA KAHI PROBLEMS AAHET ME KASE VICHRU?

 2. mala khup chan vatle!!!

 3. I impress from u r art of living concept. It give us power. It increase our confidence.
  But I have one problem which share with u i.e. how to concentrate our work? I will try my best but I made lot of mistakes in my work. I am sincere about my work also.
  Plz give my questions answer.

 4. jay gurudeo
  me art of living cha basic course kela aahe to mala khaup mast vatla mazth khup badal zala aahe

 5. I am enjoy the art of living, & its vary fanstatic.

 6. me pokharkar sangita me narayangaon khodad come year house .
  mala khup trshas hoto mala kanacha tras ahe . beacuse answer dhy.

 7. i am on right path who gave me a lot that what i was serching far. the word can not fulfill my feedback.

  Pravin Deshukh

 8. Jai gurudev!!!


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: