Posted by: vmbhonde | मे 11, 2010

विवेकानंद केंद्र

विवेकानंद केंद्र

१९६३ मध्ये स्वामी विवेकानंदांच्या प्रशंसकांनी त्यांची जन्म शताब्दी उजविण्याचा संकल्प केला. त्याबरोबरच कन्याकुमारी च्या समुद्रांत असलेल्या ज्या खडकावर ध्यान मग्न अवस्थेंत स्वामीजींना कार्यदिशा संकेत प्राप्त झाला होता, तेथे ऐतिहासिक स्मारक बनविण्याची योजना पण तयार केली गेली. परंतु अमूक स्थानिक विधर्मी नागरिकांनी त्याचा विरोध केला. त्या वेळी एक कर्मठ समाजसेवी श्री एकनाथजी रानडे यांनी स्वामी विवेकानंदांच्या ओजस्वी आव्हानांचं एक संकलन तयार केलं होतं. म्हणून त्यांचा संपर्क करून स्वामीजींच्या विचारांवर आधारित एक योजना बनविली आणि शिला स्मारकाचा कार्यभार एकनाथजींना सोपला. त्यांनी ३० लाख सामान्य व्यक्ति, केंद्र आणि सर्व राज्य सरकारं, व उद्योगपतींच्या योगदानाने धन राशी एकत्रित करून इंजिनियरींग व वास्तुकलेच्या दॄष्टी ने विस्मयकारी अप्रतिम सौंदर्ययुक्त तसेच भारताच्या उन्नतिचे प्रतिक असे शिला स्मारक निर्माण केलं. २ सप्टेंबर १९७० रोजी हे शिला स्मारक भारताचे राष्ट्रपति आणि श्री रामकॄष्ण मठाच्या अध्यक्षांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित केलं गेलं.

देशांतील नागरिकांमध्ये संपूर्ण परिवर्तनाच्या क्रांतिचा शंखनाद करण्यासाठी तसेच भारत व विश्वाला नवी दिशा प्रदान करण्याच्या उद्देश्याने ७-१-१९७२ ला अध्यात्म प्रेरित सेवा संगठनाच्या रूपांत विवेकानंद केंद्राची स्थापना कन्याकुमारी येथे झाली. हे केंद्र संन्यासी नाही परंतु  जीवनव्रती कार्यकर्ता तयार करतं. जे स्थानिक शुभचिंतक व अंशकालीन सेवाभावी कार्यकर्त्यांच्या सहयोगाने भारताच्या कानाकोपर्यांत स्वामीजींच्या चारीत्र्य निर्माण व राष्ट्र पुनरूत्थानाच्या कार्यांत गति प्रदान करतं. विवेकानंद केंद्राच्या भारतांत २२५ हून अधिक शाखा कार्यरत आहेत, ज्या भारताच्या १७ राज्यांत काम करतात. कन्याकुमारीच्या समुद्र किनारी १०० एकर भुक्षेत्रांत ही आत्मनिर्भर संस्था स्थापलेली आहे. विवेकानंदपूरम च्या क्षेत्रांत एक स्थायी चित्र प्रदर्शनी आहे, ज्यांत भारताचा इतिहास, व स्वामीजींच जीवन आणि संदेश दर्शविणारी चित्रे प्रदर्शित केलेली आहेत. येथे २५००० पेक्षा जास्त पुस्तके असलेलं विशाल ग्रंथालय पण आहे. या ठीकाणी स्वाभाविक व नैसर्गिक रीतीनेच अध्यात्मिक शांतिचा अनुभव होतो.

केंद्र द्वारा संचालित मुख्य राष्ट्रीय कार्यामध्ये शिक्षण प्रमुख स्थानी आहे. १९७४ पासून देशाच्या व्यूहात्मक दॄष्टीने महत्वाचं स्थान असलेल्या अरूणांचल प्रदेशाला केंद्राने आपलं कार्यक्षेत्र बनविलं आहे, जेथे १८ आवासिय  व २ बिन आवासिय विद्यालयं चालत आहेत. त्याशिवाय अंदमान, आसाम, तामिलनाडु मध्ये विद्यालयं स्थापन केली आहेत. ग्राम्य क्षेत्रांतील मुलांसाठी १०० बालवाड्या चालविल्या जातात. उत्तर पूर्वी क्षेत्राच्या सांस्कॄतिक वारशाचं संशोधन-संवर्धन करून त्याला लिपीबद्ध करण्याचं काम विवेकानंद केंद्र संस्कति संस्थान, गुवाहटीच्या तर्फे होत आहे. अरूणांचलच्या निवाश्यांना संघटीत करणे, त्यांना आत्मनिर्भर करणे, व्यक्तित्व विकास करून त्यांचा राष्ट्र निर्माणाच्या कार्यांत सहयोग घेण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. उदा. नेत्र चिकीत्सा, स्वास्थ्य चेतना, बाल शिबीर, कार्यकर्ता प्रशिक्षण, साहीत्य विक्री, पर्यावरण शिबीर, राष्ट्रीय एकता शिबीर, समाज सेवा शिबीर, भारत दर्शन तसेच पदयात्रा इ. ” उपेक्षित ग्रामिण समाजाच्या जागरणाद्वारे नव भारताचं अवतरण होईल ” या स्वामीजींच्या कथनानूसार तामिलनाडुचे ५ जिल्हे- कन्याकुमारी, तुतुकडी, तिरूनेलवेली, चिदंबरम व रामनाथपुरम येथे, बिहारच्या सिंहभूम मधील चांडील गांवांत, आसाम मध्ये विविध ठीकाणी, मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर जिल्ह्यांत ग्राम विकास कार्यक्रम संचालित होत आहेत. ग्रामवासीं मध्ये सामाजिक व सांस्कॄतिक जागरणा साठी  पोषक आहारयुक्त बालवाडी, बालसंस्कार केंद्र, स्वास्थ्य  प्रशिक्षण, युवा प्रेरणा शिबीर, पुस्तकालय, पर्यावरण विकास शिबीर,आणि वॄक्षारोपणाचे कार्यक्रम पण योजिले जातात. नैसर्गिक संसाधनांच संरक्षण व संवर्धन यासाठी वैकल्पिक उर्जा साधनं- बायो गॅस, सौर उर्जा व अन्य नैसर्गिक साधन स्त्रोतांचा उपयोग तसेच स्थानिक कच्च्या मालाचा उपयोग करून ग्रामिण पुरूष- स्त्रियांना  स्वावलंबी बनविण्याच्या दॄष्टीने लघु कुटीर उद्योग व हस्त शिल्प कार्य पण सुरु झाले आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत बायो गॅस संयंत्र, कमी किंमतीची शौचालयं, उन्नत चुल्हा, इ स्थापित केलं जातं.

विवेकानंद केंद्राने आपल्या २५ वर्षां मध्ये कोकडालूर या ठीकाणी  वैदिक विझन फौडेशन ची स्थापना केली आहे. त्याचा उद्देश्य भावी पीढी मध्ये आपल्या ॠषि मुनि-मनिषींच्या दिव्य विचारांचा प्रचार-प्रसार करण्याचा आहे. केंद्रा द्वारे दर वर्षी वेगवेगळ्या ठीकाणी मेडीकल सेंटर्स चालविली जातात, आय कॅंप होतात. गरजूंसाठी मेडीकल व शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करण्यांत येते. अमॄत सुरभी, अन्नपूर्णा सारख्या योजनांच्या अंतर्गत हजारो किलो धान्य एकत्र करून वितरित केलं जातं. नुमालीगढ येथे बरेच मोठे हॉस्पिटल चालविण्यांत येते. ज्यामध्ये हजारोंनी रोगी लाभ घेतात. केंद्रा तर्फे जल संसाधन, सेंद्रिय खतं व सजीव शेती या विषयांत पण बरेच काम होते.

चला, आपण पण या राष्ट्र कार्या मध्ये आपले योगदान करू

स्वामीजींच्या विचारांचे कांही महत्वपूर्ण अंश—

 • आम्हाला असे सर्वांगपूर्ण शिक्षण पाहीजे, जे आम्हाला मनुष्य बनवेल,
 • आगामी ५० वर्षांसाठी आपलं राष्ट्रच आपलं देवता आहे.
 • समस्त मानव जाति आणि पशु पक्षी आपले ईश्वर आहेत,
 • आणि या सर्वांच्या आधी प्रथम पूज्य आहेत आपले स्वतःचे देशबंधू
 • दरीद्री नारायणाची सेवा हीच खरी प्रभु सेवा आहे.
 • हे मानवा, प्रथम तू अनुभूति करून घे की मी ब्रह्मा पासून अभिन्न आहे [ अहं ब्रह्मास्मि ] आणि नंतर संपूर्ण ब्रह्मांड ब्रह्मच आहे [ सर्वं खल्विदं ब्रह्मं ]
 • उत्तिष्ठ, जाग्रत, प्राप्यवरान्निबोधत…..

 

विलास भोंडे

१०-५-२०१०

Advertisements

Responses

 1. काय सांगू लेखाबद्दल….उत्तम? खूप दिवसांनी स्वामीजीं ची आणि केंद्रा ची माहिती वाचतोय.
  खूप छान वाटतंय.
  असेच मला लेखांबद्दल कळवत जा.
  मकरंद


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: