Posted by: vmbhonde | मे 11, 2010

रामकॄष्ण मठ व रामकॄष्ण मिशन

रामकॄष्ण मठ व रामकॄष्ण मिशन

भारताचे सुपूत्र स्वामी विवेकानंदांचे ग्रुरु श्री रामकॄष्ण परमहंस यांना कोण ओळखत नाही ! त्यांच्याच प्रेरणेने विवेकानंदांनी हिंदु धर्म व संस्कृतिचा झेंडा साता समुद्रापार फडकविला आणि भारताच्या अगदी गरीब व पददलीत व्यक्तिला जागृत करण्याचा प्रयत्न केला. प.पू. रामकृष्णांच्या महसमाधि नंतर बर्याच वर्षांनी रामकृष्ण मठाची स्थापना झाली ज्याचा उद्देश्य भारताचं अध्यात्मिक जागरण करून दरीद्रीनारायणाची सेवा करणं होतं.

श्री रामकृष्णांचा जन्म १८-२-१८३६ रोजी एक गरीब पण पवित्र ब्राह्मण कुटूंबांत कामारपुकूर या गांवी झाला जे कोलकताहून ६० किमि दूर आहे. त्यांच्या वडीलांच नांव क्षुदिराम व आईच चंद्रावती होतं. रामकॄष्णांच्या जन्माच्या आधी त्यांच्या आई वडीलांना स्वप्नांत देवाने दर्शन देवून स्वतः त्यांचा पूत्र म्हणून अवतार घेण्याचा संकेत दिला होता. लहानपणा पासून रामकॄष्ण ईश्वराकडे पूर्ण समर्पित होते, ज्यामुळे त्यांना भौतिक जगांत बिलकुल रस नव्हता. त्याच प्रमाणे त्यांनी सामान्य शिक्षण पण घेतलं नव्हतं. बरेच वेळा पूजा अर्चा व कीर्तनांत स्वतःचं देहभान विसरून ध्यानावस्थेत जात असत. त्यांचे मोठे बंधू कोलकता मध्ये असल्याने रामकॄष्ण पण कोलकता येथे जाऊन १९ व्या वर्षी काली मातेच्या मंदिरांत पूजारी म्हणून काम करू लागले. त्यांचं आधी नांव गदाधर होतं. ते राम, कॄष्ण इत्यादि महापुरुषांच्या चरित्रांवर नाटकं करीत असत. त्याचप्रमाणे विविध देवतांची उत्तम चित्रे व मातीच्या मूर्ति पण तयार केरीत असत. त्यांचे लग्न श्री शारदादेवीं बरोबर झाले होते , परंतु त्यांना तिच्यांत कालीमातेच दर्शन व्हायचं. अंदाजे १२ वर्षांच्या साधने नंतर त्यांनी ईश्वर साक्षात्काराचा अनुभव केला. त्यांनी ख्रिश्चन व इस्लाम धर्माचा अभ्यास करून जाणलं की सर्व धर्म- संप्रदाय- पूजा पद्धति एकाच परमतत्वाला मिळविण्याचा प्रयत्न करतात. ते या निर्णयावर आले की मानव जीवनाचं अंतिम लक्ष ईश्वर प्राप्तीच आहे. ईश्वर एकच आहे व तो कोणत्याही मार्गाने प्राप्त होऊ शकतो. सर्व धर्म खरे आहेत . हॄदयांत पवित्रता व ईश्वरा विषयीचा विश्वास कोणालाही ईश्वर साक्षात्कार करवुं शकतो. प्राणिमात्रांत देवाला पाहणे हाच खरा धर्म आहे. नरेन्द्रनाथा सारखे बरेच तरूण रामकॄष्णांची भाव समाधि, ईश्वरा विषयीची आस्था, स्वभावाची सरळता इ. मुळे आकर्षित झाले व त्यांचे शिष्य झाले.

१८८६ मध्ये त्यांनी महासमाधि घेतली आणि विवेकानंदां सारख्या नव तरूणांवर भारताच्या उत्थानाची कामगिरी सोपली. जानेवारी १९०१ मध्ये रामकॄष्ण मठ व १९०९ मध्ये रामकॄष्ण मिशन ची स्थापना करून सर्व तरूण सन्यासी मित्रांनी सेवाकार्यांची सुरुवात केली. ते मानत होते की सगळ्या आत्म्यांमध्ये परमात्म्याचा अंश आहे ज्यामुळे कोणी पण व्यक्ति दिव्यता प्राप्त करू शकते. मुख्य चार योग–राजयोग, ज्ञानयोग, भक्तियोग व कर्मयोग यांच्या तर्फे ईश्वर प्राप्ती संभव आहे. ईश्वर एकच आहे पण सर्वजण वेगवेगळ्या नावांनी त्याला ओळखतात. कोणतेही काम हे पवित्र आहे व तीच खरी पूजा आहे. जनसेवा हीच प्रभुसेवा आहे. गरीब , पददलीत, दीन, दुखी लोकांची सेवा हा अध्यत्मिकतेचाच भाग आहे. अशा उच्च विचारांनी स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या संन्यासी गुरुबंधूं नी रमकॄष्ण मठ व मिशन चं काम १०० वर्षांपूर्वी सुरु केलं आणि आज १५० हून अधिक केंद्रांमधून भारतांत व परदेशांत अध्यात्मिक, सांस्कॄतिक व सेवा कार्य होत आहेत.

बरीच केंद्रं बाळ संघ व युवक संघाच्या प्रवॄत्ति चालवतात ज्यांत वेगवेगळ्या संस्कार व सांस्कॄतिक प्रवॄत्तिंचं संचालन होतं. मिशनतर्फे भूकंप, वावटळ, पूर इ. नैसर्गिक संकटांच्या वेळी आत्तापर्यंत अंदाजे १००० गांवांमध्ये करोडो रूपयांची मदत लाखो लोकांपर्यंत पोहोचविली आहे. मिशन तर्फे १५ हॉस्पिटल [ २००० अंथरूणं ], १२० आउट डोर दवाखाने, आणि ४६ फिरते दवाखाने चालविले जातात ज्यांत लाखो लोकं लाभ घेत असतात. शैक्षणिक क्षेत्रांत १२ कॉलेज, ४२८ शाळा, ११९ छात्रालयं व ६ अनाथाश्रम पण सेवारत आहेत. ग्रामीण आणि वनवासी क्षेत्रांत पण मिशनतर्फे बर्याच कार्यक्रमां मधून करोडो रूपये खर्चले जात आहेत. त्याशिवाय पल्लीमन्गल प्रवॄत्तिमध्ये विविध क्षेत्रांत अनेक गांवांना आवरून घेतले आहे ज्यांत पुस्तकालयं, दूध व टीफीन वितरण केंद्रं, कमी कींमतीची पक्की घरं, विहीरी खोदकाम आणि ग्रामीण उद्योगांचा समावेश होतो.

श्री रामकॄष्ण आणि स्वामी विवेकानंदां सारख्या अध्यात्मिक विभुतिंच्या दैवी शक्तिच्या जोरावरच भारतवर्ष  पुन्हा विश्वगुरु पदावर आरूढ होणार आहे. आपण पण अशा संस्थांमध्ये सहभागी होऊन  हिंदु समाजाच्या उद्धाराच्या कार्यक्रमांत मदतरूप व्हावे हीच अभ्यर्थना.

विलास भोंडे

६-५-२०१०

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: