Posted by: vmbhonde | मे 11, 2010

माता अमॄतानंदमयी देवी

माता अमॄतानंदमयी देवी

केरळच्या समुद्र किनार्या जवळच्या एका दूरच्या खेड्यांत जन्मलेल्या माता अमॄतानंदमयी देवी लहानपणापासूनच गरीबांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करून राहीलेल्या आहेत. बालपणीच ईश्वर स्वतःमध्येच आहे ह्याची त्यांना जाणीव होती. बरेच वेळा त्या खोल ध्यानांत उतरत असत. दुसर्यांना मदत करण्याच्या हेतूने त्या कितीतरी वेळा ज्याला आवश्यकता आहे अशांना घरांतील वस्तू काढून देत असत. लहानपणी त्या खूप हुशार विद्यार्थीनी होत्या.एक वेळा वाचून त्यांना सर्व आठवण रहायचं. पण आई आजारी राहात असल्याने त्यांनी चौथी पासून शाळा सोडून दिली. विश्वा बरोबर स्वतःच ऐक्य अनुभवल्या पासून आपल्या जीवनाचा हेतू मानवतेचं उत्थान आहे हे त्यांनी जाणलं. सर्वांना कोणत्याही परिस्थितीत मदतरुप होण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे लोकं त्यांना प्रेमाने अम्मा म्हणू लागले. हळु हळू त्यांनी आपल्या अध्यात्मिक मिशन अंतर्गत संपूर्ण जगांत सत्य, प्रेम, आणि करूणेचा संदेश देण्यास सुरुवात केली. गेल्या ३८ वर्षांत त्यांनी शारीरिक रीतीने २८० लाख पेक्षा जास्त भक्तांना प्रेमाने आलिंगन देऊन दुःखांसाठी सांत्वना दिली आहे. त्यांचा प्रेमळ स्पर्श लाखो लोकांच्या जीवनांत शांतता व शितळता आणतो.

जेव्हां विचारण्यांत आलं, त्या म्हणाल्या की प्रेम हाच धर्म आहे. त्यांचे स्वतःचे कोणीच गुरु नाही व त्यांनी वेद उपनिषदांचं पण शिक्षण घेतलेलं नाही, तरी सुद्धा नेहमी जे सनातन सत्य अंतर्द्रुष्टीने स्वतः अनुभवलं आहे तेच सांगतात. खरोखर त्या अद्वैत सिद्धांत स्वतः जगत आहेत. भक्त त्यांना मानवतावादी, मित्र, गुरु व ईश्वर निरनिराळ्या रीतीने ओळखतात. परंतु त्या एक माते प्रमाणे सर्वांनाच पुत्रवत प्रेम करतात व त्यांची काळजी घेतात. त्या म्हणतात की आपल्या बरोबर चालणारी कोणी व्यक्ति खाड्यांत पडली तर आपण ” त्याचं नशीब तो भोगतोय, आपण काय करणार” असं म्हणून त्याला तसंच सोडत नाही, पण त्याला वर काढून आपल्या बरोबर घेऊन मार्ग आक्रमण करतो. कारण हाच आपला धर्म आहे. डाव्या हाताला लागले तर उजवा हात त्याला मदत करतो, त्या प्रमाणे  प्रत्येकाने, देवाने सर्जित केलेल्या या सॄष्टीत सर्वांची सेवा कर्तव्य म्हणून केलीच पाहीजे. त्यांनी इतके सर्व सेवा प्रकल्प सुरु केले आहेत की जे पाहून खरच आपले डोळे आश्चर्य चकीत होतात.

१] सांस्कृतिक आणि अध्यात्मिकः भजन कीर्तन, पूजा अर्चा, होम हवन, मंत्र जप, आपले १६ संस्कार इत्यादिं विषयी त्या आपल्या प्रवचनांत सांगतच असतात, ते कशा साठी, त्याचा फायदा इ.  पण त्याच्या बरोबर आपल्या परंपरा, कर्मकांड, आपले उत्सव, त्यांचा खरा अर्थ, महत्व हे सर्व पण त्या सर्वांना समजावून सांगत असतात. त्यांनी सर्व संग्राहक अमॄताध्यान पद्धति पण विकसित केली आहे. अमॄता कीर्ती पुरस्कार अंतर्गत त्यांनी २००१ पासून आज पर्यंत १० विद्वान महात्म्यांना रु.१२३४५६/- चा पुरस्कार, सरस्वती प्रतिमा आणि प्रमाणपत्र सनातन धर्माच्या प्रचार प्रसारा साठी दिले आहे.

२] पर्यावरणः याच्या अंतर्गत अमॄतावनम, हरीत तीरम, पर्यावरण केन्द्र, ग्रीन मित्र, पवित्र वॄक्ष समूह इत्यादि बरेच कार्यक्रम चालतात.

३] शैक्षणिकः १९९६ मध्ये स्थापन केलेल्या अमॄता विश्व विद्यालयांत १०० प्रकारचे अभ्यासक्रम चालतात. त्याचे तामीलनाडू, केरळ व कर्नाटकांत १५  ठीकाणी परिसर आहेत. अमॄता विद्यालया अंतर्गत ५३ शाळा चालत आहेत. तसेच केरळ मध्ये अद्वितीय असे संस्कॄत विद्यालय कार्यरत आहे. ईसरो बरोबर संकलन करून सेटेलाईट आधारित ई शिक्षण, ग्रामीण विस्तारां साठी पण चालविले जात आहे.

४] स्वास्थ्यः कोची मध्ये १६०० अंथरूणांचं हॉस्पिटल- अमॄता इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्सिस हजारो रोग्यांची सेवा करित आहे. बर्याच ठीकाणी चॅरीटेबल दवाखाने , त्रिवेन्द्रम मध्ये एडस साठीचं केंद्र,  मुंबई मध्ये कॅन्सर हॉस्पिटल, बर्याच स्थानांवर फिरते दवाखाने पण अम्मां तर्फे चालविले जातात.

५] नैसर्गिक संकटेः  गुजरात मधील भुकंपाच्या वेळी अम्मांनी १२०० घरं  बांधून दिली होती. २००८ मध्ये बिहार मधील पुरग्रस्तां साठी रु २ कोटी दिले होते. सुनामी तसेच वावटळी च्या वेळी पण त्यांनी बरीच समाजपोयोगी पूनर्वसनाची कामं केली होती.

६] समाज उत्थान कार्यक्रमः विद्या अमॄतम अंतर्गत त्या शैक्षणिक शिष्यवॄत्त्या देतात. अमॄता कूटीर मध्ये गरीबां साठी मोफत आवास योजना चालते. त्या शिवाय   आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक अमॄता श्री सारख्या प्रकल्पांच्या द्वारे गरीबांसाठी  अन्न धान्य, कपडे, आवास, स्व-रोजगारी, अनाथालय इ. चालवितात. जनसेवा हीच प्रभुसेवा हा मंत्र अम्मांनी खरोखर चरितार्थ केला आहे.

” जगांत कमीत कमी एका रात्री साठी प्रत्येकाला भीती शिवाय झोप मिळो, एक दिवसा साठी प्रत्येकाला पोटभर जेवण मिळो व एक दिवसा साठी हींसेमुळे कोणी दवाखान्यांत न येवो  हे माझे स्वप्न आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एक दिवसा साठी निस्वार्थ भावाने दरीद्री नारायणाची सेवा करायला पाहीजे….प्रेम हेच जीवनाचं खरं लक्ष आहे. त्यांत कोणतीही जाति, पंथ, रंग, धर्म, राष्ट्रीयता आड येत नाही. सर्वजण प्रेमाच्या एक सूत्राने बांधलेले आहेत…हाच माझा संदेश आहे  …”  … अम्मा

विलास भोंडे

८-५-२०१०

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: