Posted by: vmbhonde | मे 11, 2010

ब्रह्माकुमारीज

ब्रह्माकुमारीज

जीवन आनंदाचा पर्याय झाला पाहीजे हे मनुष्याचं चिरकालीन स्वप्न आहे. व्यक्ति, परिस्थिती त्याचा अभिगम तसेच त्याची अभिव्यक्ति- या सर्वांची बेरीज म्हणजे जीवन. विज्ञाना द्वारा झालेल्या भौतिक प्रगतीने परिस्थितीला सुविधात्मक केली आहे. पण व्यक्तिच्या जीवना कडे पाहण्याची द्रुष्टी सुविधांना सुखमय करू शकत नाही. त्यामुळे संघर्ष व ताण, दुःख, अशांति, अनेक रोग तसेच असंतोष आणि असुरक्षिततेचा अनुभव होत असतो. या सर्वांत व्यक्ति केंद्र स्थानी असते. सकारात्मक विचारसरणी , खर्या व चांगल्या व्यक्तिमत्वाची शिकवण आणि संपूर्ण आरोग्याच्या प्राप्तीसाठी अध्यात्मिक जागॄतीची आवश्यकता आहे. उच्च चारित्र्य व जीवनाच्या नैतिक मुल्यांच्या अविचल स्थानाला स्विकारण्याची जरूर आहे. अनेक शिक्षण केंद्रामध्ये उपजिविकेसाठीचं शिक्षण तर दिलं जातं, पण जीवन जगण्याची कला शिकण्यासाठी राजयोगाच्या अभ्यासाची जरूर आहे. राजयोगाच्या नियमित अभ्यासाद्वारे सर्व संघर्ष व समस्यांचं समाधान मिळतं. तसेच जीवनाच्या उच्चतम आनंदाचा, सुख व संतोषाचा अनुभव येतो. प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालया तर्फे राजयोगाचं विनामूल्य शिक्षण देण्यांत येते.

या संस्थेची स्थापना १९३७ मध्ये हल्लीच्या पाकीस्तानांतील सिंध प्रांतांत झाली. त्यावेळी सिंध मधील हिंदु समाजाची धार्मिक अवस्था फारच खराब झाली होती. भक्ति म्हणजे फक्त पूजा-पाठ, पण बरोबर मनांत धनलोभ, व्यापारांत कपट, व्यवहारांत क्रोध, घर-संसारांत मोह आणि मन वासनांनी भरलेलं असायचं. तेव्हां हैदराबाद सिंधच्या  दादा लेखराज ज्यांचा जन्म १८७६ मध्ये कॄपलानी  कुळांत झाला होता आणि जे स्वतःच्या चमत्कारिक बुद्धि व सतत पुरुषार्था द्वारा गव्हाच्या एका सामान्य व्यापार्यातून प्रसिद्ध सोने-चांदी-हिरे-मोती यांचे फार मोठे व्यापारी झाले होते, त्यांना त्यांच्या वयाच्या ६० व्या वर्षी अचानकच अद्वितीय अनुभव झाला आणि भगवान विष्णूच्या चतूर्भूज रूपाचा साक्षात्कार झाला. परमपिता शिव भगवानांनी त्यांच्यांत प्रवेश करून जगाला अध्यात्मिक रस्त्यावर नेण्यासाठी कार्य करण्याचा संदेश दिला. एके दिवशी त्यांनी भविष्यांत होणार्या महाविनशाचं स्वप्न पाहीलं आणि त्यांच मन व्यवसायांतून उठलं. स्वतःचा सर्व पैसा ईश्वरीय सेवेंत  लावण्याचं नक्की करून त्यांनी स्वतःच्या घरीच ओम मंडळी  या नांवांने सत्संग सुरु केला. हळु हळु त्यांत ३००-४०० भक्तगण एकत्र होऊ लागले. ज्या मुली व स्त्रिया तेथे येत त्यांना त्या वेळच्या समाजाचा फार विरोध सहन करावा लागला. म्हणून दादांनी त्यांच्यासाठी स्वतःच्या महाला सारख्या विशाल घरांतच राहण्याची व शिक्षणाची व्यवस्था केली. बोर्डींगची दिनचर्या खूप सात्विक ठेवण्यांत आली. सनातनी लोकांचा विरोध इतका वाढला की  एके दिवशी त्यांच्या सत्संग भवनाला आग सुद्धा लावण्यांत आली. घरा बाहेर पिकेटींग करण्यांत आलं. परंतु दादा भक्कम उभे राहीले.

फाळणी नंतर १९५० मध्ये ते स्वतःच्या सर्व ब्रह्मकुमारी  व कुमारां बरोबर भारतांतील आबु येथे आले. बराच त्रास व समस्या सहन करून स्वतःचे कुटूंबीय व ब्रह्मकुमारीच्या सहकार्याने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची स्थापना केली आणि  राजयोगाच्या शिक्षणाने नैतिकता व जीवन मूल्यांचा व्यवहारू संदेश सर्वांना दिला. ते सांगत असत की विश्वशांतिच्या स्थापने साठी तर सर्व प्रथम व्यक्तिच्या मनांत शांति असणं आवश्यक आहे. त्यांच्या अविरत सेवेमुळे लहान रोपट्यांतून विशाल वटवॄक्षाचं रूप धारण केलेल्या, विश्वभरांत १३० देशांमध्ये असलेल्या ८५०० सेवाकेंद्रां द्वारा स्वपरिवर्तन , स्वानुशासन,जीवनांत दिव्य गुण आणि मुल्यांची धारणा तसेच राजयोगा तर्फे समाजाला उन्नत बनविणारी ही एक अध्यात्मिक संस्था तयार झाली आहे. समाजाच्या सर्व क्षेत्रांना समावून घेऊन मेडीकल, प्रशासक, इंजिनियर, वैज्ञानिक, महीला, युवा, समाज सेवा, ग्राम विकास, मिडिया, स्पोर्टस, बीझीनेस इत्यादि १८ वाहीन्यां मधून व्यक्तित्व विकास व समाज उत्थानाचे कार्य होत आहे. संस्था युनिसेफच्या व युनोच्या आर्थिक-सामाजिक सल्लागार समितीची सदस्य आहे. मॉरिशियस सरकारने हीला ‘वर्ल्ड स्पिरिचुअल युनिवर्सीटी” म्हणून मान्यता दिली आहे. तेथे ३ दिवसांच्या राजयोग शिबीरांचं नियमित आयोजन होतं. विविध क्षेत्र जसे की, मेडीकल, लीगल, ईंजीनीयरींग, शिक्षण, राजकीय, युवा, मुलं, महीला, व्यापारी, कला, साहीत्य यांवरील निरनिराळ्या विषयांवर सेमीनार, वर्कशॉप, चर्चा इत्यदिं चं आयोजन केलं जातं. शहरांत तसेच ग्राम्य विस्तारांत विश्व नव निर्माण, मानव एकता, ग्राम विकास, संपूर्ण आरोग्य, शिक्षणाची नवी दिशा, नारी उत्थान, पर्यावरण जागॄति इत्यादि प्रदर्शनं भरली जातात. कारखाने व ऑफिसिस मध्ये मानवीय संबंध,सेल्फ/स्ट्रेस/कॉनफ्लीक्ट/माईंड/ टाइम मॅनेजमेंट., पॉझीटीव्ह चेंज कोर्स, कर्म फीलॉसॉफी, मेडिटेशन व मेडीसीन, व्यसन मुक्ति इत्यादि विषयांवर ट्रेनिंग प्रोग्राम केले जातात

ब्रह्माकुमारीज मानतात की, ५००० वर्षांचं मानव संसार चक्र आत्ता त्याच्या अंतिम चरणांत आहे. विज्ञान व टेक्नोलॉजी तर्फे अनेक सुविधांमुळे आभासी सुख आणि अल्पकालीन आनंद यांचा डोंगर केला आहे. परंतु  मनुष्य अनेक विकराळ समस्या– भुक, गरीबी, बेरोजगारी, प्रांतवाद व आतंकवाद –समोर संघर्ष करीत दुःख, अशांति, असुरक्षा व ताण या सर्वांचा सतत अनुभव करीत आहे. व्यक्तिगत मानव आणि समग्र विश्व महा संकटाच्या/ महा परिवर्तनाच्या समोर उभे ठाकले आहे.  तेव्हा आशेचं एक किरण….विश्वाच्या क्षितिजावर परम पवित्र सर्व शक्तिंच्या बीजरूप विश्व कल्याणकारी विश्वपिता ज्ञान सूर्य परमशक्तिचा उदय झाला आहे. परम पिता सर्व मानव आत्म्यांना प्रेम व करूणेसह संदेश देत आहेत ” हे माझ्या बाळांनो, सर्व दुःख , अशांति, समस्या, नकारात्मक विचार आणि काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, आळस इत्यादि विकार व देह अभिमान युक्त व्यवहार अर्थात कर्म आहे. पवित्रताच सुख-शांतिची जननी आहे. विचारांना सात्विक सकारात्मक करण्यासाठी मला ओळखा. मला शरण या, माझ्या तर्फे दिल्या जाणार्या ज्ञानाला ऐका, जीवनांत धारण करा आणि मन माझ्यांत लावा . पवित्र व्हा, राजयोगी व्हा आणि या विश्वांत परत सुखमय संसार बनविण्याच्या माझ्या कामांत सहभागी व्हा.”

विलास भोंडे

९-५-२०१०


Responses

 1. It is really a mind blowing work done by the NGO. your study is also good. i am happy by reading this.

 2. वैदिक धर्माचे तुकडे
  वैदिक आर्य हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ ,संप्रदाय आहेत. परंतु ते सर्व एकोप्याने नांदत होते .
  परंतु अलीकडे इंग्रजांच्या डिवाईड अँण्ड रूल ह्या नियमाने सरकार ,संस्था ,आणि इतर प्रसिद्धी प्रिय
  असणाऱ्या लोभी लोकांनी त्यात वेगवेगळे संप्रदाय निर्माण करून आणखी हिंदू धर्माचे तुकडे केले .
  जय गुरुदेव .स्वाध्याय ,सत्संग ,गायत्री परिवार ,प्रजापिता ब्रह्मकुमारी ,सर्वे धर्म समभाव असे अनेक पंथ
  निर्माण करून लोकांना संभ्रमात पाडून मूळ वैदिक आर्य हिंदू धर्मामधून वेगळे केले आहे.अशा
  कार्यामुळे संस्थापकांनी वैदिक, सांख्य. आणि वैज्ञानिक तत्वांचा काला करून लोकांसमोर मांडला
  त्यात बरेच अज्ञानी बळी पडले.त्यांनी वेदशास्त्र ,पुराने अभंग गीता इत्यादीचे पुरावे सादर करून
  स्वमत सिद्धांत मांडले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: