Posted by: vmbhonde | मे 11, 2010

नवी भोजनप्रथा

नवी भोजनप्रथा

युगांपासून आपण जेवण घेतो. सर्व वस्तूंचे गुणधर्म लक्षात घेऊन आहार नक्की करतो. तरी देखील हळु हळु समाजांमध्ये रोग व रोग्यांच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. औषध हेच आहार- जेवण होत आहे. पैसे खर्च होत आहेत. शारीरिक त्रासांनी दुःख वाढत आहे.  याचा कांही उपाय आहे ? काहीतरी कुठेतरी चुक होते आहे, पण ती काय आहे, कोठे आहे ?

श्री बी वी चौहाण जे गुजरात इलेट्रीसीटी बोर्ड मधून सुपरीटेंडंट इंजिनियर म्हणून निवृत्त झाले आहेत, त्यांनी खूप विचार केला. स्वतःला वेगवेगळे रोग होते. खूप कसरत केली, व्यायाम केला. रेकी, योग, प्राणायाम, आयुर्वेद, होमयोपथी, पाणी प्रयोग, शिवांबु प्रयोग– सर्व काही केलं. थोड्या वेळासाठी बरं वाटे , पण रोग निर्मूळ नव्हता होत. इतक्यांत ‘रसाहार’ वर एक पुस्तक हाती आलं  आणि नंतर राम चरित मानस आधारित भोजन प्रथेची गोष्ट समजली. भगवान कृष्ण गीतेमध्ये  पण स्वतः साठी ‘ पत्रं, पुष्पं, फलं, तोयं’ इतकंच मागतात.प्राचीन काळी  ऋषि मुनी कच्चा आहारच घेत असत व हजारो वर्षे निरोगी होऊन जगत असत. आधुनिक विचारधारा- वैज्ञानिक दृष्टीकोन यांमुळे सर्व गोष्टी समजत नव्हत्या. नंतर ९-९ वर्ष स्वतःवर प्रयोग करून पाहीले. अकल्पनीय लाभ झाला. रोगांच नांव निशाण राहीलं नाही. नंतर आपल्या घरच्यांना, ओळखिच्यांना सांगितलं. सर्वांच्या प्रयोगांतून सार काढून नंतर नवी भोजन प्रथा जाहीर केली. ते खूपच सोप्या भाषेंत सर्वांना समजवितात. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही, ऐका, समजून घ्या, प्रयोग करून पहा. ३/४ महीने पहा. फायदा झाला  तर चालू ठेवा नाही तर सोडून द्या. ते कोणत्याही प्रकारच्या जाहीरातिंत विश्वास ठेवत नाहीत. सेवाभावे कार्य करतात. कोणत्याही प्रकारे पैसे घेत नाहीत.

त्यांच्या प्रथेमध्ये कच्च्या भाज्या व फळं खाण्यावर  भार दिला जातो. देवाने सर्वांना खाण्यासाठी कच्च्या वस्तुच दिल्या आहेत. फक्त माणूसच शिजवून खातो. शिजविल्यामुळे आहारांतिल सर्व जीवनसत्वे नष्ट होतात. हे समझण्यासाठी एक प्रयोग करण्या सारखा आहे. धान्याचे दाणे घेवून काही भजून घेणे, काही शिजवायचे, काही तळणे, काही उकडविणे.  जमिनीत रोपल्यावर  फक्त कच्च्या धान्याच्या दाण्यातूनच अंकूर फुटेल , कारण त्यांत जीवन आहे, बाकी सर्व तर मृत आहार आहे. आपणां सर्वांना माहीत आहे की कच्च्याभाज्या व फळां मध्ये फायबर खुप असतात. ते पचायला खुप हलके व दुसर्या आहारासाठी पाचक असतात.त्यामुळे हा आहार घेण्याने पोट साफ राहते. म्हणून दुसरे रोग होण्याचे प्रमाण कमी होते. उच्चभ्रु लोकांमध्ये हल्ली कच्च खाण्याची व डाएट वर राहण्याची फॅशन झाली आहे. साखर आणि  मीठ पण खाऊ नये. अलोपथी मध्ये पण हे सांगितले आहेच. श्री चौहानांच्या प्रयोगा प्रमाणे दुध पण न प्यायले पाहीजे. ते म्हणतात, जेव्हां बाळाला दूधाची जरूर असते तेव्हा देव आईला दुध देतोच. तो आपली सर्व चिंता करीत असतो. आपणच निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ पोटांत ठासून ठासून भरतो आणि रोगांना आमंत्रित करतो. जेव्हा आपल्याला जरूर असते तेव्हा तहान लागते, भूक लागते. देवाने सर्व व्यवस्था नीट केलेली असते  , पण आपणच त्याच्या कामात अडचण उत्पन्न करतो.

म्हणून नव्या भोजन प्रथे प्रमाणे सकाळी काही खायचं नाही.पोटाला आराम द्यायचा. उपास हे रोग निवारणाचं मुख्य शस्त्र आहे. १२ वाजता कच्चं खाणे, ज्यांत  सर्व प्रकारच्या भाज्या व फळं येतात. धान्य न घेणे, शिजवलेला आहार पण नाही. रात्री आपला नेहमीचा आहार घेणे चालेल. त्यांत पण शिजविलेलं जेवण कमी व भाज्या जास्त. लवकर आणि चांगल्या  परिणामासाठी सकाळ संध्याकाळ कच्चंच खायचं. ९/१० दिवसांत  एकदा उपास करणे. शक्य असेल तर सुरूवातीला १-२ महीने रोज एनीमा घेणे, ज्यामुळे पोट  स्वच्छ होईल आणि  जूना मळ निघून जाईल.

कच्चं खाण्यात सर्व प्रकारच्या भाज्या/कंदमूळं जसं की बटाटा, कांदा, कोथिंबीर, पुदीना, मिरची, आलं, लसूण, रताळी, भोपळा,  तोंडली, गिलकी,  दुधी, काकडी, कारली, करटोली, परवर, भेंड्या, चवळी, पालक, अळु, तांदुळजा, मेथी, कोबी, फ्लॉवर, लिमडा, तुळस, मुळा, बेलाचं पान, गाजर, बीट, आंवळा, शेवग्याच्या शेंगा, टॉमेटा, वांगं इत्यादी. फळांमध्ये ज्या त्या ऋतु प्रमाणे, जे सोप्या रीतीने मिळेल, स्वस्त मिळेल ते सर्व घेऊ शकतो. उदा. केळी, पपई, सफरचंद, संत्री, चिकु, अननस, डाळिंब, मोसंबी, नासपती, टरबुज  इ. सकाळी उपासाची सवय हळुहळु करावी. १-१ तास च्हा-नाश्त्याची वेळ  उशिराची करत जावी. जेणे करून १२ वाजेपर्यंत पोटांत काही जाणार नाही, पाणी पण नाही. कच्चं खायला सुरुवातीला आवडत नसेल तर सर्व वस्तुंवर स्वादीष्ट चटणी बनवून टांकु शकतो. संचळ, काळं मीठ, लिंबू, हिंग, जिरं, ओवा, मिरे, लवंग इ घेऊ शकतो. कायम साठी लिंबू, मध, आलं, वरियाळि[बडीशेप] इत्यादी पाण्याबरोबर घेऊ शकतो. सर्व प्रकारचे रसाहार करू शकतो.

ज्यांनी ज्यांनी हा प्रयोग केला आहे, त्यांनी आश्चर्यकारक परिणाम मिळविले आहेत. बरेच सगळे रोग जसे की बी.पी, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, असीडीटी, कमी/जास्त वजन, बद्धकोष्ट, वाताचे दुखणे, डोकेदुखी, सर्दी खोकला, अस्थमा, कंबरदुखी, सांधे दुखी, अलेर्जी, त्वचा रोग, डोळ्याचे रोग, थायरॉइड, टी.बी, हृदय रोग, कॅन्सर पर्यंतच्या रोगांवर याच्या मुळे फायदा झाला आहे, अणि ते पण थोड्याच दिवसांत,/ महीन्यांत.  माझी खूप जूनी असीडीटी पण बरीच बरी झाली आहे. सुरुवातीला कदाचीत थोडी तकलीफ  झाली म्हणजे शौचाला जास्त होणे, सर्दी खोकला, डोकेदुखी, त्वचेवर खाजणे इ. तरी घाबरू नये, ही सर्व आधीची जुनी घाण निघून जाते आहे असं समजावं .

म्हणून वाचकांना माझी नम्र विनंती आहे की एकदा हा प्रयोग स्वतः करून पाहणे. काही पण विचारायचे असल्यास श्री बी.वी.चौहाण यांचा अमरेली [गुज] येथे संपर्क करावा. ते नेहमीच सेवा तत्पर असतात. त्यांचे फोन नं ०२७९२-२२६८६९ आणि मोब. नं  आहेत ९२२८४३३८९९, ९३२८०७०२८९, ९४२६१२७२५५.

त्यांची काही सूत्रे…

उपास उत्तम, खाणं खराब                                            कच्चं तेच खरं, शिजविलं की घाण

श्रमानंतर भोजन, भोजनानंतर आराम                              रस तेथे कस, दळ तेथे मळ

मीठ, साखर, सोडा व दूध [ परक्या आईचं ] हे सर्व पांढरं विष आहे

शिजविलेलं अन्न मृत आहे, कच्चं अमृत आहे                    औषधांत स्वास्थ्य नाही, राहत आहे

सर्वेपि सुखिनः संतु, सर्वे संतु निरामयाः

विलास भोंडे

३/५/२०१०

Advertisements

Responses

 1. I agree with this conceptually as I follow most of it. OK with lots of fruits and veggies. But I see some problems – No dairy and no cooking (means no beans/lentils/daalee/usalee) is a problem as that would bring down daily protein content to zero. That’s not good. Add dairy. Milk, dahi, taak. No problem with any of that. About cooking – anything that can be eaten raw, raw is fine (applies to many veggies) but when not possible to eat raw then cooking is not always bad (agree that over-cooking is bad). Cooking is the only way to eat beans/lentils/daalee/usalee which gives you lots of proteins and fiber and is all good. Just my 2 cents.

  • u may think of having sprouts. anyway thanks for comments

 2. I like very much. We many times do as he has suggested. I fully agree with Mr. Chavan.

 3. I obviously will try his theory.

 4. I knew about this as you had told me to follow it. I did it for a few months and found that it works very nicely. It contributed to my weight-loss substantially. However, I found it rather difficult to continue for various reasons.

 5. It is realy interesting to understand the logic to become fit and healthy. This is very simple “eat healthy to become/remain healthy”. very good.

  • thanks a lot for your comment

 6. New generation needs to be told about the benefits of healthy eating to develop a healthy lifestyle.

 7. UTTAM LEKH

 8. ATI UTTAM LEKH

  • thanks for the comments

 9. very good sug.for my enter life

 10. I WILL TRY

 11. very good all Point. thanks


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: