Posted by: vmbhonde | मे 11, 2010

चिन्मय मिशन

चिन्मय मिशन

स्वामी चिन्मयानंद भारताचे एक महान संत होते की ज्यांनी अविरत पणे चार दशकांपर्यंत संपूर्ण विश्वांत सगळ्या वर्गांत व समुहांत वेदांताचा शांति व सुखाचा संदेश पोहोचविण्याचं काम केलं होतं. त्यांचा जन्म ८ मे १९१६ रोजी केरळ मध्ये एर्नाकुलम शहरांत बाळकृष्ण मेनन या नांवाने झाला होता. ते सुक्ष्मातिसुक्ष्म गोष्टींचं लक्ष ठेवणारे हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. एका संतांनी या मूलाचं भविष्य महान अध्यात्मिक संत म्हणून केलं होतं. कायदा व साहीत्याच्या डीग्रींनी त्यांचं समाधान नाही झालं. त्या वेळी चालू असलेल्या स्वातंत्र्यलढ्यांविषयी आकर्षण झाल्याने ते १९४२ च्या भारत छोडो या चळवळीत पडले. गरीबी, दमन, भूकमारी, जेलवास आणि मृत्यु या सर्व विषयांचा जवळून परिचय झाल्याने ते चिंतनशिल झाले. ब्रिटिश रूल सारख्या विवादास्पद गोष्टींविषयी साहसिक  तसेच स्फोटक-प्रेरक लेखांसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांच्यातील पत्रकार मोठ्या महंतांच्या दंभाला उघडे करू इ्छित होता.  आणि म्हणून  स्वामी शिवानंदांची भेट घेण्यास ते ऋषिकेश ला गेले. त्यांच्या बरोबरच्या सत्संगाने त्यांचं परिवर्तन झालं. मेमन मध्ये असलेली नास्तिकता  लोप पावली. स्वामीजींनी त्यांना २५-२-१९४९ रोजी दिक्षा देवून त्यांचे नांव चिन्मयानंद सरस्वती ठेवलं. त्यांची तपश्चर्या हिमालयांत आणखी दृढ झाली. तेथे त्यांना त्यांचे गुरु स्वामी तपोवन महाराज यांनी आत्मज्ञान दिलं.  त्यांनी त्यांना खर्या भारताला समजून  घेण्यासाठी संपूर्ण भारत भ्रमण करण्यास सांगितले.

एक वर्षाच्या भ्रमणानंतर स्वामी चिन्मयानंदांनी पूण्याच्या गणपती मंदिरांत स्वतःचं प्रथम प्रवचन चला, आपण हिंदु होऊ या या विषयावर दिले. आणि याप्रमाणे डीसेंबर १९५१ मध्ये चिन्मय मिशनचा जन्म झाला. त्यानंतर स्वामींनी फिरता फिरता लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्शून ,हावर्ड चे विद्वान, तसेच एम.आय.टी आणि दुसर्या विख्यात उच्चदर्जाच्या अमेरिका व युरोपच्या विश्वविद्यालयां मध्ये वेळोवेळी जाऊन -प्रवचनं करुन ते विश्वप्रसिद्ध झाले. स्वामी चिन्मयानंद  आणि भगवदगीता व उपनिषद हे समानार्थी शब्द झाले. त्यांनी भारतीय  संस्कृती व अध्यात्मामध्ये परत नवचैतन्य आणलं ज्याची त्यावेळी जरूर होती. शिकागोच्या सर्वधर्म परिषदेच्या १९९३ या शताब्दी वर्षाच्या समारोहासाठी अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली होती, परंतु ३-८-९३ रोजी त्यांनी महासमाधि घेतली. त्यांनी २५० पेक्षा जास्त ग्रंथ लिहीले आहेत आणि खूप सर्व अध्यात्मिक ग्रंथांवर टीका लिहील्या आहेत.

त्यांचे शिष्य पू.स्वामी तेजोमयानंदजी हल्ली चिन्मय मिशनचे प्रमुख आहेत. फिजीक्स व मेटा फिजीक्स मध्ये स्नातक झाल्यावर १९७० मध्ये त्यांनी ब्रह्मचारी म्हणून सांदिपनी साधनालय मुंबई येथे सुरुवात केली.ते पण इंग्लीश, हिंदी , मराठी, व संस्कृत मध्ये निष्णात असून त्यांनी वेदांतावर खूप सर्व टीकाग्रंथ लिहीले आहेत. चिन्मयमिशनचा मुद्रा लेख आहे “जास्तीत जास्त लोकांना  जास्तीत जास्तवेळे साठी परमानंदाची प्राप्ति करविणे “.

चिन्मय मिशन अध्यात्मिक उन्नति व भारतीय संस्कृतिला नव चैतन्य देण्यासाठी समर्पित आहे. ती एक सर्जनात्मक रीतीने सर्वांचं चांगलं करण्याची चळवळ आहे, जी मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्शते आणि संपूर्ण विश्वांत व्याप्त २५० हून जास्त केंद्रांतर्फे अध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यांच संचालन करते. चिन्मय बाल विहारांत ५ ते १३ वर्षांच्या मुलांचं साप्ताहिक सहमिलन असतं, ज्याच्यात त्यांना नैतिक व सांस्कृतिक मूल्यांचं ज्ञान देण्यांत येतं. चिन्मय युवा केंद्रांत १६ ते २८ वर्षांचे तरूण भाग घेतात. स्वाध्याय वर्गांत नियमित ज्ञान चर्चा, भक्ति संगीत,आणि सामाजिक उत्थानासाठी विविध सांस्कृतिक प्रवृत्ति योजण्यांत येतात.  वानप्रस्थ संस्थानांत वृद्धांना अध्यात्मिक विकास व जनसेवा द्वारा प्रोत्साहित करण्यांत येते. संपूर्ण भारतांत अशी ४० हून जास्त केन्द्र आहेत. धर्मसेवक तालीम च्या गृहस्थाश्रमींसाठी सांदिपनी आश्रमांत ३-३ महिन्यांची शिबीरं योजीली जातात. त्यानंतर ते आपापल्या गांवी जाऊन वेदांताचे वर्ग चालवतात. पोष्टाने चालणार्या चिन्मय कोर्सचा लाभ जगांतील ५०००० पेक्षा जास्त लोकांनी घेतला आहे. हा वेदांताच्या मुख्य सिद्धांतांवर आधारित कोर्स आहे.

खेडोपाडी राहणार्या हजारोंसाठी चिन्मय मिशन लहान मोठ्या अनेक संस्था चालवतं.उदा. चिन्मयारण्यम-आंध्रप्रदेश, सिद्धबारी-हिमाचल प्रदेश, लाटीकाटा – ओरीसा.  स्वास्थ्य केंद्रां तर्फे वैद्यकीय सेवा पण देण्यांत येते. ज्यांत चिन्मय मिशन हॉस्पिटल मुख्य आहे. भारतांतील बर्याच ठीकाणी पितामह सदन [ सिनियर सिटीझन होम ] चालतं. अनाथाश्रम पण चालतात. पूर, भूकंप, कारगील युद्ध इत्यादि संकट समयी चिन्मय मिशनने लाखो रूपयांची मदत केली आहे. शैक्षणिक क्षेत्रांत ८० चिन्मय विद्यालयं, एक आंतरराष्ट्रीय शाळा व ६ चिन्मय कॉलेजं पण कार्यरत आहेत. चिन्मय विझन प्रोग्राम देशांतील २५०० हून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये लागू केला आहे. खेड्यांतील गरीब मुलांना हरिहर शाळांतर्फे  मोफत शिक्षण व व्यावसायिक शिक्षण दिलं जातं.

चिन्मय मिशन तर्फे केलेल्या ज्ञानयज्ञ व अध्यात्मिक शिबिरांचा लाभ संपूर्ण जगामध्ये लाखो लोकांनी घेतला आहे आणि स्वतःची अध्यात्मिक उन्नति करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदु संस्कृतिचा ध्वज विश्वांत फडकविणार्या चिन्मय मिशन ला शतशः प्रणाम.

विलास भोंडे

४-५-२०१०

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: