Posted by: vmbhonde | मे 11, 2010

गायत्री परिवार

गायत्री परिवार

देशांत लाखो गायत्री उपासक आणि त्यांच्या यज्ञ संस्कृतिचं उत्थान करणार्या वेदमूर्ति पं श्रीराम शर्मा व वंदनीया माताजींना कोण ओळखत नाही ? आचर्यांनी स्वतःच्या ८० वर्षांच्या जीवनांत खरोखर ८०० वर्षांपेक्षा अधिक वेळेचं कार्य केलं आहे असं वाटतं.

१९३७ मध्ये “अखंड ज्योति” या मासिकाचं प्रकाशन मथुरे हून झालं तेव्हां पासून आज पर्यंत त्याच्या माध्यमातून भारतीय धर्म आणि संस्कृतिच्या प्रतिकांचं मर्म समजवणं, गंगा, गायत्री, गीता आणि गाय यांचं महत्व लोकांना सांगणं, स्वस्तिक, तुळस, मूर्ति, मंदिर, तिर्थ, यज्ञ, पर्व-उत्सव इत्यादींचं विवेचन करणं– असे अथाग प्रयत्न त्यांनी केले. गायत्री तपोभूमि-मथूरा स्थापन करण्याचा आचार्यांचा उद्देश्य जगा मध्ये आस्तिकता, अध्यात्म दर्शन, गायत्रीचा प्रचार प्रसार, व्यक्तिला मनुष्य जीवनाच्या गरीमेचा बोध करविणे, तसेच समाजाला विकृती मुक्त बनविण्याचा होता. त्यांनी महत्वाच्या निधिरूपाने  ४ वेद, १८ पुराण, १०८ उपनिषदं, योग वासिष्ठ, २० स्मृति, ६ दर्शनं, व २४ गीता सहीत अनेक आर्ष ग्रंथांचे लोक भोग्य भाषांतर केलं. १९८० पासून देशांत विविध ठीकाणी गायत्री शक्ति पीठांची स्थापना करण्याचा विडा त्यांनी उठविला. १९८६-८७ मध्ये देशभरांत १०८ कुंडी गायत्री महायज्ञ व राष्ट्रीय एकता संमेलनांची मालीका चालविण्यात आली. गायत्रीतीर्थ शांतिकुंज – हरिद्वार ला विशाल जागेवर निर्मित अध्यात्मिक संस्थान आजसुद्धा सर्वांसाठी प्रेरणारूप आहे.

आचार्यांनी स्थापलेल्या महत्वाच्या ६ संस्था पुढील प्रमाणे आहेत

युगतीर्थ आंबलखेडा – आग्रा

अखंड ज्योति संस्थान व गायत्री तपोभूमी – मथूरा

शांतिकुंज, ब्रह्मवर्चस शोध संस्थान आणि देव संस्कृति विश्वविद्यालय – सर्व हरिद्वार

यांच्या तर्फे खूप सर्व धार्मिक, अध्यात्मिक, व समाजोपयोगी कार्यक्रम चालतात. उदा. गायत्री मंत्र साधनेचा प्रचार प्रसार, अखंड जप तसेंच यज्ञ संस्कृतिचं जागरण, सामाजिक समरसता, दैववादाला नकार, सामाजिक कुरीतींचा त्याग, निरक्षरता विरोध, व्यक्ति-परिवार-समाज निर्माण, स्वार्थ नाही परमार्थ, स्वास्थ्य संरक्षण, गो संरक्षण व गोपालन, वृक्षारोपण आदि.

युग निर्माण योजना अंतर्गत ७ आंदोलनं चालतात

साधनाः यांत उपासना, साधना व आराधना या तिन्ही क्रिया होतात. –इष्ट देवाची उपासना, आपल्या जिवनाची साधना आणि मनुष्यांची आराधना.  स्वतः श्रेष्ठ व्यक्ति व्हा व दुसर्यांना श्रेष्ठ बनवा हेच गायत्री परिवाराचे लक्ष आहे

शिक्षणः निरक्षरतेचा कलंक दूर व्हायलाच पाहीजे. गायत्री परिवार धंदा-रोजगार करणार्या अशिक्षित लोकांसाठी रात्रीशाळा व मुलांसाठी बाळसंस्कार शाळा पण चालवतं

स्वावलंबनः आपला देश ग्राम्य व शेतीप्रधान आहे. गावांकडे परत या असे अभियान चालविण्याची जरूर आहे. ग्राम्य कुटीरोद्योग स्थानिक संसाधनांवर आधारित व शेती पूरक-सहाय्यक असावे. गोपालनाला ग्रामिण स्वावलंबनाचे केंद्र केले पाहीजे. गायत्री  परिवार  आवश्यक तालीम व्यवस्था पण करतं. गौ आधारित शेती, उर्जा व उद्योगच गावांना स्वावलंबी बनवतील. कुटीरोद्योग उत्पादीत सामानाच्या विक्रीची व्यवस्था पण होत आहे.

पर्यावरणः शक्य असेल तोपर्यंत प्रदूषण करूच नये. ‘उपयोग करा व फेकून द्या’ ही संस्कृति बहीष्कृत केली पाहीजे. वैकल्पिक उर्जा, सौर उर्जा यांचा उपयोग वाढविला पाहीजे. शक्य तेथे सार्वजनिक वाहनांचा उपयोग करावा. वृक्षारोपण हा जीवनमंत्र  करणे. जन्म दिवस, लग्न तिथी, पुण्य तिथी, रक्षाबंधन व दुसर्या धार्मिक आणि राष्ट्रीय उत्सवांच्या दिवशी वृक्षारोपण व संवर्धन करण्यासाठी संकल्प घेणे. घाण-कचरा यांचा सुव्यवस्थित निकाल.

नारी जागरणः स्त्रियांचं स्वास्थ्य, शिक्षण व आर्थिक स्वावलंबन खूपच महत्वाचं आहे. गायत्री परिवार यांसाठी प्रोत्साहन, प्रशिक्षण, मार्गदर्शन व आवश्यक साधनं एकत्र करण्यास मदत करतं.

स्वास्थ्यः स्वच्छ शरीर, स्वच्छ मन व सभ्य समाज हे मूळभूत सिद्धांत आहेत. त्यासाठी  आहार विहार, रहणी करणी, साफ सफाई, व्यायाम, आयुर्वेदिक औषधोपचार आदिंसाठी लोकशिक्षण देण्यात येतं. आयुर्वेदिक औषधांचं उत्पादन व प्रचार प्रसार केला जात आहे

कूरीतींचं निर्मूलन व व्यसन मुक्तिः तंबाखु, गुटखा, दारू, च्हा, कॉफी, थंड पेये इत्यादिंमुळे शरीरस्वास्थ्य बिघडते त्यासाठी लोक शिक्षणाचा प्रयत्न चालु आहे. गायत्री परिवाराच्या कार्यक्रमांमध्ये लाखो लोकांनी संकल्प पूर्वक व्यसनांचा त्याग केला आहे. अंधविश्वास , हुंडा, दाग दागिने, महाग व खूप वस्त्रांची खरीदी, खर्चिक लग्न, मोठे भोजन समारंभ, जेवतांना ताटली मध्ये टाकणं, भूत प्रेत व दैववादाची मान्यता, बालविवाह, लहान मुलगी व म्हातार्याचं लग्न, अस्पृश्यता, पडदा प्रथा, पशुबळी, भिक्षा वृत्ति इत्यादि दूर करण्याचे आंदोलन चालू आहे.

लाखो साधकांच्या विशाल गायत्री परिवाराला लाखो प्रणाम

विलास भोंडे

४-५-२०१०

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: