Posted by: vmbhonde | एप्रिल 19, 2010

अफलातून लिंक्‍स्‌…!

अफलातून लिंक्‍स्‌…!

 
 चेतन पाटील (अमेरिका) यांनी आपल्यापैकी बहुतेकांना कधी ना कधी भेडसावलेली अडचण  सोडवण्याचा मार्ग दाखवलाय. कॉम्प्यूटर वापरताना टायपिंगचा वेग वाढविण्याचे शास्त्रशुद्ध  शिक्षण तुम्हाला या वेबसाईटवरून ऑनलाईन घेता येईल. त्यामुळे पाहाच.
> लिंक – http://www.powertyping.com/
 
 अर्जुन मराठे (ब्रुनेई) यांनी एक उपयोगी वेबसाईट पाठवलीय. आपल्या मेलबॉक्‍स्‌मध्ये एखादा मेल  असा येतो, की ज्याच्या मालकाचा पत्ता लागत नाही. अशा वेळी ई मेल नेमका कुठून आलाय, हे  शोधण्यासाठी सोबत दिलेली वेबसाईट नक्की उपयोगी ठरेल.
> लिंक – http://www.ip-adress.com/trace_email/
 
 संदीप खोत (ऑग्स्‌बर्ग, जर्मनी) यांना समधूर मराठी गीतांचा गोडवा एका वेबसाईटवर
सापडलाय. एखाद्या गाण्याची चाल मनात गुंजत असते…शब्द अंधारात चाचपडत असतात.  अशावेळी ही वेबसाईट तुम्हाला देईल, गाण्याचे संपूर्ण बोल आणि त्याबद्दलची सारी माहिती.
> लिंक – http://www.aathavanitli-gani.com/

 देवेश कुलकर्णी (सिऍटल, अमेरिका) यांनी दिलेली वेबसाईट तुम्हाला अमेरिकेतील बॅंकींग  व्यवस्थेबद्दल पुरेसे शिक्षण देईल. ज्या त्या वयोगटानुसार माहितीचे वर्गीकरण वेबसाईटवर आहे.  बॅंकींगमधील अवघड वाटणाऱ्या गोष्टींचे सुलभ स्पष्टीकरण नक्कीच वाचनीय आहे.
> लिंक – http://www.handsonbanking.com/en/
 
 संजय गडगे (आळेफाटा, जुन्नर, पुणे) यांनी सर्वांनाच गरजेची अशी वेबसाईट शेअर केलीय. तुम्ही  तुमच्या कॉम्प्यूटरवर राहून सहकाऱ्यांचा, मित्रांचा कॉम्प्यूटर ऍक्‍सेस करू शकता. ऑफिसमध्ये  वापरण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना ही साईट अधिक सोयीची ठरेल.
> लिंक – http://www.teamviewer.com/index.aspx
 
 सुहास भट यांनी पाठविलेली लिंक आवर्जून पाहा. अमेरिकेतील एमआयटी ही जगप्रसिद्ध शिक्षण  संस्था. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि नोबेल विजेते घडविणारी. या संस्थेचे अनेक अभ्यासक्रम ऑनलाईन आहेत, जे इथे पाहता येतील.
> लिंक – http://ocw.mit.edu/OcwWeb/web/home/home/index.htm
 
 रावसाहेब साठे यांनी लहान मुलांसाठी गेम्सचा खजिना सादर केलाय. लहान मुलांना खिळवून ठेवेल
  अशीच या वेबसाईटची रचना आहे. वैज्ञानिक गोष्टींवर आधारित हे गेम्स्‌ उगाचा
 हाणामारीच्या व्हिडिओ गेम्स्‌पेक्षा निश्‍चित छान वाटतील. घरी जरूर वापरून पाहा.
> लिंक – http://pbskids.org/

 मंगेश पाटील यांनी शेअर केलेय न्यूजपेपर्सचे म्युझियम. जगभरातील वर्तमानपत्रे या लिंकवरून शोधणे
 अधिक सोपे. जगाच्या नकाशावर, विशेषतः अमेरिकेच्या, क्‍लिक करून हव्या त्या भागातील
 वर्तमानपत्र इथे शोधता येईल.
> लिंक – http://www.newseum.org/todaysfrontpages/flash/
 
 मंगेश दामले यांनी मुंबईतील बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांसाठी बेस्ट उपक्रमाची अत्यंत उपयुक्त
 लिंक शेअर केलीय. मुंबईत बसने प्रवास करायचा असेल, तर या वेबसाईटवरून तुम्ही तुमच्या
 मार्गावर किती आणि कोणत्या बसेस आहे, हे पाहू शकता.
> लिंक – http://www.bestundertaking.com/transport/index.htm
 
 किरण माळी यांनी शेअर केलेली वेबसाईट ग्रिटींग्ज्‌ कार्डस्‌ची आहे. या साईटचे वेगळेपण म्हणजे,
 इथे प्रत्येक चित्राचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले दाखवले आहे. एक गंमत म्हणून ही वेबसाईट पाहू
 शकता आणि ग्रिटींग्ज्‌ शेअर करू शकता.
> लिंक – http://www.lakecards.com/

 महावीर छाजेड (कनेक्‍टिकट, अमेरिका) यांनी भन्नाट लिंक शेअर केलीय. साईट जरी लहान
मुलांसाठीची असली, तरी थोरा-मोठ्यांनीही आपल्या इंग्रजीची चाचणी यावर घेऊनच पाहावी.
 स्पेलिंगचे छान छान गेम्स इथे आहेत. घरात चिमुकल्यांना साईट दाखवावीच एकदा.
> लिंक – http://www.bigiqkids.com/onlinespellingbee/
 
 धनाजी मुसळे (कॅलिफोर्निया, अमेरिका) यांनी नव्या वर्षात नवे संकल्प करणाऱ्यांसाठी छान
 वेबसाईट पाठवलीय. बिझनेस, जॉबमध्येही प्रोजेक्‍टच्या ट्रॅकिंगसाठी साईट उपयोगी आहे.
 स्वयंशिस्तीचे हे ऑनलाईन पाठ साऱ्यांनीच घ्यावेत, असे आहेत.
> लिंक – http://rootein.com/
 
 पंडित संदीप शास्त्री (अमेरिका) यांनी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी धार्मिक कार्याची
 सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भारतीय संस्कृतीतील प्रथा, विधायक परंपरा, धार्मिक
 कार्यासाठी अमेरिकेतील भारतीयांसाठी ही साईट जरूर उपयुक्त आहे.
> लिंक – http://www.hindupriest.us
 
 नितिन अंबिके यांनी एक सुंदर साईट दिलीय. प्रत्येकाला विशिष्ट ‘ब्रॅंड’ आवडतो. हा ब्रॅंड
 आपल्या ओळखीचा होतो तो लोगोतून. लोगोशी आपले नाते जोडले जाते. अगदी सोप्या स्टेप्स्‌मध्ये
 तुम्हालाही तुमचा लोगो डिझाईन करता येईल. पाहा तर करून.
> लिंक – http://www.logoease.com/
 
 स्नेहल पाटील यांनी शेअर केलीय ‘ग्रीन लाई’साठीच्या सुंदर टीप्सची लिंक. या लिंकवर आहेत,
 पन्नास अशा टीप्स्‌ ज्या वापरून तुम्ही तुमचे आणि पर्यायाने परिसराचे जीवन पर्यावरण अनुकूल
 बनवू शकाल. ई बुक्‍स फॉर्ममधील या टीप्स्‌ जरूर वाचाव्यात.
> लिंक – http://www.morganstanley.com/about/community/littlegreenebook/
 
अभिजित चिणे यांनी लहान मुलांसाठी रंगांचा खजिना शोधलाय. साईटवर खूप सारी चित्रे आहेत.
 त्यातील हवी ती निवडून इथं मुलं चित्रे ऑनलाईन रंगवू शकतात. साईटवर मुला-मुलीच्या नावे
 अकाऊंट उघडलेत, तर त्यात त्यांनी रंगवलेली चित्रे स्टोअरदेखील होतील.
> लिंक – http://www.thecolor.com/

 प्रशांत तापकीर यांनी भारतीयांना भारतीयांचा सर्वांगिण इतिहास उलगडून दाखविणारी
 वेबसाईट शेअर केलीय. शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना इतिहास समजून घेण्यासाठी ही वेबसाईट
 जरूर वापरता येईल.
> लिंक – http://www.indianchild.com/history_of_india.htm
 
 आदित्य फावडे यांनी शेअर केलेली वेबसाईट म्हणजे ऑनलाईन रिसोर्स मटेरियला खजिना आहे.
 विशेषतः तुम्ही विद्यार्थी असाल किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यास करीत असाल, तर या
 वेबसाईटवरील डिस्कशन जरूर पाहा. तुमच्याही शंका तिथे मांडा आणि मिळवा उत्तरे.
> लिंक – http://www.studytemple.com/forum/
 
 हरिश सूर्यवंशी यांनी दिलेली वेबसाईट कदाचित तुमच्या “इन-बॉक्‍स’मध्ये एखाद्या वेळी आलेलीही  असेल. भारतातील बिझनेस शोधण्यासाठी साईटचा वापर करून पाहा. विशेष म्हणजे निवडक  शहरांमधील सर्व माहिती उपलब्ध ठेवण्याचा प्रयत्न साईटवर जरूर झाला आहे.
> लिंक – http://wwww.justdial.com/

 शेखर पोंक्षे (सातारा) यांनी भारतात सेल्स टॅक्‍स भरणाऱ्यांसाठी लिंक पाठवलीय. अर्थातच सेल्स टॅक्‍सशी तुमचा संबंध असेल, तरच लिंकचा उपयोग आहे. “टीआयएन’ इथे फीड केला, की  तुम्हाला परराज्यात मटेरियल पाठवताना, आणताना अडचण येणार नाही.
> लिंक – http://www.tinxsys.com/TinxsysInternetWeb/searchByTin_Inter.jsp
 १. तुम्हाला एखादा ई मेल येतो…त्यावर सचिन तेंडूलकरचे घर म्हणून ढीगभर फोटो असतात.  आता हे फोटो खरे की खोटे…? शोधता येईल. तशा ‘सत्याचा न्यायनिवाडा’ करणाऱ्या  वेबसाईटस्‌देखील आहेत.
> लिंक – http://www.truthorfiction.com/ किंवा http://www.hoax-slayer.com/

 २. ‘लालटेन’ म्हणजे कंदील. अंधारात चाचपडताना कंदीलाच्या उजेडात वस्तू कधी शोधली असेल,  तर लक्षात येईल कंदीलाचे महत्व. हेच नाव घेऊन नवीन सर्च इंजिन भारतात विकसित झालेय.गुगलचाच वापर करून विशिष्ट वेबसाईटमधील माहिती या सर्च इंजिनमधून शोधणे सोपे आहे.
> लिंक – http://www.laalten.com/ 
 ३. आणि ही एक मजेशीर आणि धमाल वेबसाइट. इथे शेकडो इफ्फेक्‍टस आहेत. आवडता इफेक्‍ट निवडा  …फोटो अपलोड करा…आणि अनुभवा धमाल…
> लिंक – http://www.photofunia.com
 नुपूरा गुंथे यांनी ‘महाभारत’, ‘रामायण’ पाहणाऱ्या पिढीला सुखावणारी लिंक शेअर केलीय. ‘  दूरदर्शन’च्या जमान्यात काही काळ रमायचे असेल, तर ही लिंक जरूर पाहा. बी. आर. चोप्रा  आणि रामानंद सागर यांनी एककाळ साऱ्या देशाला या मालिकांच्या रुपाने मोहित केले होते.
> लिंक –
> http://www.bharatmovies.com/videos/tv/mahabharat/mahabharat-videos-watch-
> online.htm
> http://video247.tv/?p=4806
 
 शरद भोसले यांनी रक्तदाते आणि गरजूंसाठी अफलातून लिंक मिळवलीय. या वेबसाईटची ‘कॅच लाईन ‘ सुंदर आहे. अनोळखी लोकांमध्ये मैत्र जोडणारी ही वेबसाईट फक्त पाहूच नका, तर शक्‍य तितक्‍या लोकांना शेअर करण्याच्या दर्जाची जरूर आहे.
> लिंक – http://www.friendstosupport.org/index.aspx
 
 निलेश कोद्रे (जपान) यांनी मराठी, हिंदी नाटक-चित्रपटांची वेबसाईट शेअर केलीय. विशेष  म्हणजे, तुम्हाला गुजराती चित्रपट, नाटकांची आवड असेल, तर त्यांचीही माहिती या साईटवर मिळेल. जोडीला चित्रपट परीक्षणे आहेतच.
> लिंक – http://www.ibollytv.com/
 
 नितीन रुद्रवार यांनीही मराठी चित्रपटांसाठीचा खजिना दिलाय. मराठी चित्रपटसृष्टीच्या
 सर्व ताज्या घडामोडी, टॉप टेन, रिव्ह्यू, प्रोमोज्‌ या साईटवर पाहायला मिळतील. मराठीत
 सध्या ‘हॉट’ चित्रपट कोणता आहे आणि कोणता येऊ घातलाय, हेही तुम्हाला इथे पाहाता येईल.
 (विनायक पतंगे, नितीन कुलकर्णी, यांनीही हीच वेबसाईट पाठवलीय.)
> लिंक – http://www.marathimovieworld.com/
 
 नितिन यांनी शेअर केलेली आणखी एक साईट आहे, जी कदाचित माहितीतली असेल. या साईटवर  आहे गाण्यांची दौलत. हिंदीबरोबरच मराठीतली अव्वल, दर्जेदार गाणी इथे स्टोअर आहेत.  तुमच्याकडे आयफोन असेल, तर मस्तच. इथून गाणी डाऊनलोड करता येतील.
> लिंक – http://www.dhingana.com/
 
 विहंग घाटे यांनी दिवसभर सातत्याने कामात असणाऱ्यांना, विशेषत: संगणकावर काम
 करणाऱ्यांना विरंगुळा पाठवलाय. या साईटवर दृष्टीभ्रम, बुद्धीभ्रम करणारे खेळ, गणिती कोडी  आणि डोक्‍याला ताण देणारे ब्रेन गेम्स आहेत. सोबत आहे, सुविचार आणि जोक्‍सदेखील !
> लिंक – http://brainden.com/
 
निलेश जोशी यांनी सारे ‘ई पेपर्स’ एकाच ठिकाणी मिळणारी वेबसाईट दिलीय. या साईटवर  तुम्ही तुमच्या शहरानुसार ‘ई पेपर’ निवडून पाहू शकाल. तुम्ही अमेरिकेत असाल, तर तेथील कोणते ‘ई पेपर’ पाहात येतील, हेही तुम्हाला याच वेबसाईटवर मिळेल.
> लिंक – http://www.epapergallery.com/index.htm
 
निलेश यांनीच पाठवलेली आणखी एक साईट ‘ऑनलाईन फोटो एडिटिंग’साठी उपयुक्त आहे. ऍडोब  फोटोशॉप ओपन करून तिथे फोटो एडिट करण्याचा त्रास या वेबसाईटमुळे नक्कीच वाचेल.  ऍडोबमध्ये नसलेल्या क्रॉपींगमधील काही सुविधा इथे आहेत.
> लिंक – http://www.pixlr.com/editor/
 
 नितीन कुलकर्णी यांनी संस्कृत भाषेची ठेवा ‘ई सकाळ’च्या वाचकांसमोर ठेवलाय. ही प्राचीन  भाषा आणि तिचे महत्व वादातित. रोजच्या वापरातील काही शब्दांना संस्कृत पर्याय इथे तपासू  शकता. इंग्रजी आणि युनिकोडमधूनही या वेबसाईटवर सर्च देता येतो.
> लिंक – http://spokensanskrit.de/
 
 भगवंत कुलकर्णी यांनी यु ट्यूबवरील व्हिडिओ डाऊनलोड करण्याचा प्रश्‍न सोडवलाय. तुम्ही  मोझिला फायरफॉक्‍स ब्राऊजर वापरत असाल, तरच या ‘ऍड ऑन’चा फायदा आहे. मोझिलाच्या  अनेक ‘ऍड ऑन्स्‌’पैकीच हा एक आहे. मोझिला असेल, तर जरूर ट्राय करा.
> लिंक – https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/3006
 सतीश पिंपरकर यांनी जगाचे घड्याळ आपल्या समोर मांडले आहे.
> लिंक http://www.timeanddate.com/worldclock/
  गौरव तायवडे यांनी आपल्यासमोर फन फोटो बॉक्स मांडला आहे.
> लिंक http://www.funphotobox.com/

 विजय कुमार (तैवान) यांनी आपल्यासमोर कॉम्प्युटरचा आयपी मॅसेज शोधण्यासाठी लिंक मांडली  आहे
> लिंक http://www.getip.com/

suhas patil” <surapasa@hotmail.com      25/3/10

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: