Posted by: vmbhonde | एप्रिल 8, 2010

हे देवा, तूं असतांना ही अवस्था कां आहे ?

हे देवा,  तूं  असतांना  ही अवस्था कां आहे ?

सत्यं वद धर्मं चर  हे ब्रीदवाक्य असतांना असत्य व अधर्म कां बळावला आहे ?

कॄण्वंतो विश्वमार्यम  ही उद् घोषणा असतांना अनार्य व असभ्य संस्क्रुति कां सर्वत्र राज्य करीत आहे ?

वसुधैव कुटुंबकम  हे ध्येय  असतांना कुटुंब व्यवस्था छिन्नभिन्न  कां झाली आहे ?मनभेद-मतभेद, भांडण, द्वेष कां वाढला आहे ?

तत्वमसि  हे समजत असतांना  क्षूद्रता , मनोदौर्बल्य  कां  दिसते  आहे ?

ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्या हे माहीत असतांना सर्वजण आसक्तित  कां  अडकले आहेत ?

सर्वं खल्विदं ब्रह्मं हे जाणत असतांना उच्चनीचता, भेदभाव  कां मानला जातो  आहे ?

अहं ब्रह्मास्मि ही अवस्था असतांना तुझं -माझं  कां होत आहे ?

एकं सत विप्राः बहुधा वदन्ति हे तत्वज्ञान असतांना  हा धार्मिक उन्माद कां दिसतो  आहे ? तुझा देव- माझा देव वेगळा कां झाला आहे ?

कर्मण्येवाधिकारस्ते  हा उपदेश असतांना  सर्वजण फळाच्या अपेक्षेने कां वागत आहेत ?

गौतमबुद्धाची करुणा कोठे गेली ?  जितेन्द्र महावीराची अहिंसा कोठे आहे ? येशुख्रिस्ताचे प्रेम कुठेच कां दिसत नाही ? महंमद पैगंबराचा बंधुभाव कुठे आहे? गुरु गोविंदसिंहाचे शौर्य व धर्मप्रेम कां लुप्त होत आहे ?

हे कन्हैया- कान्हा असं म्हणून ममता वर्षविणारी यशोदा, हे राम- राम म्हणत वात्सल्य दाखविणारी कौसल्या असतांना मात्रुत्वाची अवस्था अशी कां आहे ?

राम – लक्ष्मण – भरत सारख्यांचा भ्रात्रुभाव हा आदर्श असतांना प्रत्येक जण आपल्या भावाचा वैरी कां झाला आहे ?

कॄष्ण सुदाम्याची मैत्री अजरामर असतांना मित्रांचा विश्वासघात कां होत आहे ?

वसिष्ठ, विश्वामित्र, सांदिपनी, चाणक्य, समर्थ रामदास स्वामी, रामकॄष्ण परमहंस या सारख्या  गुरुंचं दर्शन कां दुर्लभ होत आहे ?

राम, कॄष्ण, चंद्रगुप्त, शिवाजी, स्वामी विवेकानंद, यांच्या समकक्ष शिष्य कां दुर्मिळ झाले आहेत ?

ज्ञानेश्वर, तुकाराम, नरसी मेहता, तुलसीदास, सूरदास, कबीरदास, चैतन्य महाप्रभु सारख्या भक्तांची चरित्रे फक्त वांचनापूरती कां मर्यादित झाली आहेत ?

राणाप्रताप, शिवाजी, झांशीची राणी , वीर सावरकर, भगतसिंह, चन्द्रशेखर आझाद, सुभाषचन्द्र बोस यांची देशभक्ति आमच्या ह्रदयांत एखादी ठिणगी केव्हा जागॄत करु शकणार आहे ?

विवेकानन्द व अरविंद यांच्या स्वप्नाप्रमाणे भारतमातेची विश्वगुरु पदावर स्थापना केव्हा होणार आहे?

विलास भोंडे  ८/४/१०

Advertisements

Responses

  1. सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । याची प्रचिती यावी म्हणून हे असच होत राहणार आहे,होत आहे,होत राहील! जेजे होईल ते पहावे चित्ती असो द्यावे समाधान ! बाकी काही नाही.देवाला कशातच स्वारस्य नाही.चांगलं किंवा वाईट असं काही नाहीच.हेच सत्य. हेच सत्य़ ! हेच स—त्य—!!!!!!!!!!!
    अनंत


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: